Total Pageviews

Thursday, 11 August 2011

CORRUPT TRAFIC DEPARTMENT

वैभव रामकृष्णन हा ज्या रिक्षातून शाळेत जात होता त्याला टँकरने धडक दिल्यामुळे तो आणि त्याच्या सोबतची एक मुलगी बाहेर फेकली गेली. टँकरखाली सापडून वैभव ठार झाल्यावर त्याच्या चालकाला चोप देऊन टँकर जाळून टाकण्याचा आणि चालकाला बदडून काढण्याचा ‘कार्यक्रम’ झाला परंतु तेवढय़ाने अशा अपघातांची मालिका संपणार आहे काय, या प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे.
शाळकरी मुलांची रिक्षातून होणारी वाहतूक कितपत सुरक्षित आहे, रोज सकाळ-सायंकाळ बेबंद वाहतुकीच्या जाळ्यात सापडणारे चिमुकले जीव किती सुरक्षित आहेत, या प्रश्नांनी पालकवर्ग हैराण झाला असल्यास नवल नाही. ठाणे महानगरपालिकेसमोर 13 वर्षे वयाच्या शालेय विद्यार्थ्यांच्या करुण मृत्यूमुळे हे प्रश्न परत एकदा पुढे आले आहेत. वैभव रामकृष्णन हा ज्या रिक्षातून शाळेत जात होता त्याला टँकरने धडक दिल्यामुळे तो आणि त्याच्या सोबतची एक मुलगी बाहेर फेकली गेली. टँकरखाली सापडून वैभव  ठार झाल्यावर त्याच्या चालकाला चोप देऊन टँकर जाळून टाकण्याचा आणि चालकाला बदडून काढण्याचा कार्यक्रमझाला परंतु तेवढय़ाने अशा अपघातांची मालिका संपणार आहे काय, या प्रश्नाचे उत्तर नाही असेच आहे. ठाण्यातील अपघाताला टँकरचालकाचा बेदरकारपणा जसा कारणीभूत आहे तेवढीच रिक्षाचालकाची बेफिकिरी. शाळकरी मुलांची नेआण करणारे रिक्षाचालक कुठेही, कोणतेही नियम पाळत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मुळात याबाबत सरकारच्या वाहतूक विभागाचे धोरणच संदिग्ध आहे. तीनचाकी वाहनांतून विद्यार्थ्यांची ने-आण करण्यास सरकारने मज्जाव केला आहे. तसेच शाळकरी विद्यार्थ्यांसाठी चारचाकी बस असावी, असे स्पष्ट निर्देश असल्याचे सांगण्यात येते. तसे असेल तर राज्यभर लाखो रिक्षांतून विद्यार्थ्यांची रोज ने-आण कशी करु दिली जाते? नियम धाब्यावर बसवण्याची हिंमत रिक्षाचालक कसे करू शकतात? शालेय विद्यार्थ्यांसाठी रिक्षाचालकांना सूट, सवलत देण्यात आल्याचा राज्य परिवहन विभागाने काही खुलासा केला असल्याचे तरी ऐकिवात नाही. सूट दिली असेलच तर तीन आसनी रिक्षात सात-आठ तर सहा आसनी रिक्षात 10 ते 15 विद्यार्थी कोंबण्याचा प्रकार कुठल्या नियमात बसतो? स्कूल बससंदर्भात परिवहन खात्याने बसगाडीच्या रंगापासून, ती पंधरा वर्षाहून जुनी नसण्यापर्यंत पाच-पंचवीस अटींची नियमावली केली आहे त्याची अमलबजावणी होते की नाही याची शहानिशा करण्याची जबाबदारी कोणाची समजायची? आरटीओ, रिक्षाचालक वा शाळा व्यवस्थापन यापैकी कुणालाही विचारले तर प्रत्येक जण कानावर हात ठेवतो. नवी मुंबईत मारुती व्हॅनमधून शाळकरी मुलांची ने-आण होते. सीएनजी गॅस सिलिंडरवर फळ्या टाकून 15-16 विद्यार्थ्यांना बसवले जाते. लहान जिवांशी हा खेळच म्हणायचा. दोन वर्षापूर्वी अशा सिलिंडरचा स्फोट होऊन दोघांचा जीव गेला, तरीही कुठलीही सरकारी यंत्रणा हे रोखण्यासाठी पुढे आली नाही. अपघात होवोत की जाळपोळ होवो ढिम्म हलायचेच नाही असे निर्ढावलेपण आल्यावर अशा दुर्घटना वारंवार होतच राहणार

No comments:

Post a Comment