दहशतवादी हल्ले वारंवार घडत असल्याने मुंबईतील सामान्य माणूस हवालदिल झाला असला तर नवल नाही. परंतु आता अशा संकटांना तोंड देण्याची तयारी मुंबईकरांना करावी लागणार आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी केवळ सरकार व सुरक्षा यंत्रणांवर विसंबून राहणे परवडणारे नाही.
दहशतवाद पुनःपुन्हा मुंबईला गाठणार, हे स्पष्ट आहे. खुजे नेते, अकार्यक्षम प्रशासन आणि जनजीवनाशी संपर्क गमावून बसलेली पोलिस यंत्रणा मुंबईकरांना कोणतीही दिशा दाखवू शकणार नाही, हे आता सिद्ध झाले आहे. कॅमेऱ्यांच्या चकचकाटात हरवलेल्या राजकारण्यांनी मुंबईकरांच्या कुंडलीत दहशतवाद, अनागोंदी, अशांतता या ग्रहांबरोबर गर्दी केली असल्याने, यापुढे आपत्ती व्यवस्थापनाचे धडे नागरिकांना स्वत:च गिरवावे लागतील. सामान्य माणसाने स्वतःचे रक्षण स्वतःच करावे, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सांगून टाकलेच आहे. त्यामुळे यापुढे मुंबई फर्स्ट, डेमॉक्रसी वॉच अशा बड्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापनाचे आराखडे तयार करायला हवेत.
न्यूयॉर्कमध्ये ट्विन टॉवर उद्ध्वस्त झाले तेव्हा तत्कालीन महापौर रूडी गिलियानी रस्त्यावर उतरले होते. त्या काळी त्यांनी राबविलेले उपक्रम व्यवस्थापनशास्त्राच्या विद्यार्थ्यांना शिकवले जातात. मित्रपक्षांच्या फौजांना दुसऱ्या महायुद्धात माघार पत्करावी लागत होती, तेव्हा पंतप्रधान चर्चिल यांनी केलेली प्रेरणादायी भाषणे ब्रिटनच्या इतिहासातला गौरवाध्याय मानली जातात. मुंबईकरांचे नशीब तेवढे चांगले नाही. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या शहराने अन्य ठिकाणी दहशतवादी कारवायांना सामोरे कसे जातात त्याची उदाहरणे तपासून ती कृतीत उतरवणे, हाच पुढील वाटचालीचा मार्ग आहे. स्फोटाच्या घटनांचे वर्तमान अस्वस्थ करून जाते; पण त्यातून भविष्याचा हाका ऐकून पुढील आराखडे आखले जातात का, ते सर्वाधिक महत्त्वाचे ठरते. 26 /11 च्या हल्ल्यात आपल्या कार्यक्षेत्राची हद्द कोणती याचा जराही विचार न करता जीव धोक्यात घालून अतिरेक्यांशी लढलेले पोलिस अधिकारी सदानंद दाते इस्राईलमधील एक उदाहरण सांगतात- लहानग्या नातवाला घेऊन प्रवासाला निघालेल्या आजीबाईंना बसच्या पायऱ्यांवर कलिंगड दिसते. ते ओलांडून पुढे न जाता बाई अधिकाऱ्यांचे लक्ष वेधतात. तो टायमर लावलेला बॉम्ब असतो. वेळीच लक्षात आल्याने तो निकामी केला जातो. जीवनाची शाश्वती न उरलेल्या मुंबईकराला ही सावधगिरी यापुढे पावलोपावली बाळगावी लागणार आहे. चिंचोळ्या बेटावर जागा मिळेल तेथे वाढलेली वस्ती, हीच मुळी एक समस्या. प्रशासनासमोर कायम प्रश्नचिन्ह ठरलेली ही विस्तारवादी मुंबई गेल्या काही वर्षांत आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांच्या आव्हानाला सामोरी जाते आहे. अवाढव्य मुंबईत नित्यनेमाने वाढणारी वस्ती आपल्या पोटात कुणाकुणाला सामावून घेते, ते कळणे फार कठीण झाले असल्याने, आपत्ती व्यवस्थापनाचे धडे मुंबईला गिरवावे लागणार आहेत. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा मध्यंतरी तयार झाला होता; मात्र 13 जुलैसारखा प्रसंग ओढवला तर सरकारी व्यवस्थांपेक्षा नागरिकांचा सहभागच महत्त्वाचा ठरतो. रुग्णवाहिकांची चाके वाहतुकीत रुततात आणि खासगी टॅक्सीवाले जखमींना रुग्णालयात पोचवतात, असा अनुभव वारंवार मुंबईत अनुभवायला मिळतो. संकटात कुठलाही विचार न करता झोकून मदत करण्याची मुंबईकरांची वृत्ती कौतुकास पात्र असली तरी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महानगरात अशी वेळ येणे भूषणास्पद नाही. जे. जे. रुग्णालय वगळता, अन्य कुठल्याही सरकारी ठिकाणी समाधानकारक उपाययोजना पहिल्या चोवीस तासांत होऊ शकली नाही.
भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी मुंबईचा सर्वंकष आढावा घ्यायला हवा. पश्चिम आणि मध्य लोहमार्ग या मुंबईच्या धमन्या. दोन्ही मार्गांवरच्या प्रमुख रेल्वे स्थानकांवर रुग्णवाहिका आहेत असे सांगतात; पण वाहतुकीत त्या रुतून बसतात. आंतरराष्ट्रीय दर्जाचा टेंभा मिरविणाऱ्या महानगरासाठी ही स्थिती समाधानकारक नाही. त्यातच या दोन्ही मार्गांवर अद्याप कुंपण घातले गेलेले नाही. एखाद्या माथेफिरूने रूळांवर स्फोटके ठेवली तर काय घडू शकेल, याचा विचारही जिवाचा थरकाप उडवतो. दादरच्या टिळक पुलाजवळील कबूतरखान्याची घटना शक्तिशाली बॉम्ब वापरून घडली असती तर हाहाकार घडला असता. मुख्य शहराकडून उपनगरांकडे जाणाऱ्या बहुतांश मार्गांवर कायम कोंडी झालेली असते. चेंबूरपर्यंत उड्डाणपुलांचे जाळे उभारले गेले आहे खरे; पण एखाद्या आपत्तीप्रसंगी नागरिकांनी या रस्त्यांचा वापर कसा करावा, याचा विचारच प्रशासनाने कधी केला नाही. मुंबई अग्निशमन दल अव्वल दर्जाच्या लौकिकास पात्र आहे; पण बॉंबस्फोटाच्या हाताळणीची त्यांना सवय नाही. 26/11 च्या हल्ल्यानंतर राम प्रधान समितीची नेमणूक करण्यात आली होती. या समितीने समुद्रकिनाऱ्यावर 14 पोलिसकक्ष बांधण्याची सूचना केली आहे. त्यांतील जेमतेम 4 गेल्या 31 महिन्यांत बांधून झाले आहेत. गेल्या काही वर्षांत पोलिस यंत्रणेचा जनतेशी संपर्क तुटला. मुंबईसारख्या अवाढव्य महानगरात काय घडते आहे, याची अचूक माहिती खबरे पोलिसांपर्यंत पोचवू शकतात. यंत्रणा भ्रष्ट झाल्याचा समज पसरल्याने, जनता, खबरे पोलिस ठाण्यात जाण्यास कचरतात काय, याचाही विचार व्हायला हवा. 9 / 11 किंवा लंडनच्या मेट्रोतील घटनेनंतर या दोन्ही महानगरांमध्ये कोणतीही आगळीक घडलेली नाही. सरकारच्या प्रत्येक यंत्रणेत आढळणारा समन्वय, कायद्याची काटेकोर अंमलबजावणी आणि राजकीय पक्षांचा हस्तक्षेप नसल्याने ही कामगिरी साधली, असे या महानगरांचे प्रमुख नमूद करतात. आपण यातून शिकण्यासारखे बरेच आहे. प्रतिक्रिया यांना निवडून कुणी दिले? ज्यांना राजकारण, समाजकारण या पेक्षा दोन वेलची भाकरी महत्वाची वाटते आणि ती त्यांना निवडणुकीच्या काळात मिळते त्यांनी. सुशिक्षित माणसास मतदानाला जावसच वाटत नाही. शाळा सुरु होणार तोच मंत्री पाय घालतो बेस्ट ५, वर्षभर हे झोपलेले असतात. इतिहास मध्ये कोणता अभ्यास असावा हे ठरवणार ज्यांना इतिहास माहित नाही. रोड च कंत्रात देताना स्वताचे पैसे मिळाले कि नाही याचा पहिला विचार..भले तो पुन्हा करावा लागेल पुन्हा इंग्रजांना बोलावून घ्याल तर बर होयील कमीत कमी देशाच भाल तरी होयील परकीय नेत्यांच्या सुरक्षेवर खर्च करण्यासाठी सरकारची तिजोरी ओसंडून वाहते आहे,[ओबामा] मात्र भारतातल्या सामान्य लोकांच्या सुरक्षेसथि सरकारची तिजोरी खालीच आहे. जूं जनतेच्या जीवावर हि लोक नेते बनतात, नंतर त्यांनाच खायला उठतात. आदर्श भारताचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर हे कुठेतरी थांबायलाच हवे. आत्ता सरकारच्या नावाने खडे फोडायचे. निवडणुका आल्या कि मतदान मात्र ह्यांनाच. असे आम्ही हुशार मतदार. चांगला लेख आहे....great to sakal श्रीराम वैद्य यांचे म्हणणे खरे आहे अत्रेंनी तेंव्हाच कॉंग्रेस ला ओळखले होते. पुण्यातल्या झोपाद्पात्त्याना फक्त हेच जबाबदार आहेत. सामान्य पुणेकर कधीच यांना मत देत नाही मात्र आज पुण्यात ४२% लोकसंख्या झोपडपट्टीत राहते झोपडपट्टीतील १००% मते फक्त कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस ला जातात. या मुळेच इथे फक्त यांचेच सरकार येऊ शकते. पर्वतीच्या मागे असलेली झोपडपट्टी पहा म्हणजे लक्ष्यात येईल. आज अत्रे असते तर.... काल एका कार्यक्रमात राम प्रधान म्हणाले कि पोलिसांचे साधे सूत्र म्हणजे सामान्य माणसाचे जीव वाचवणे. या राज्यकर्त्यांनी पोलिसांना इतक्या फालतू इतर कामात अडकवले हि मूळ कामच पोलीस विसरले. व्यक्ती नवे सिस्टीम फेल्लुअर हेच सत्य आहे. ज्या तज्ञ माणसाने मुंबई व पुण्यात कोठे हल्ला होवू शकतो हे तेव्हाच सांगितले त्यावर कार्यवाही करण्यापेक्षा या मूर्खाना त्यावर राजकारण आणि सत्ता हेच महत्वाचे वाटते याची सर्व महाराष्ट्रीयांची मान शरमेने खाली गेली. मी तर म्हणेन लवकरात लवकर निवडणूक लढवा आणि ह्या भ्रष्ट सरकार ला पाडा तरच महाराष्ट्राचा थोडा तरी उद्धार होईन नाहीतर महाराष्ट्राचे बिहार युपी व्हायला थोडाच उशीर आहे. मला वाटत कॉंग्रेस मध्ये देश सांभाळण्याची कुवत संपलेली आहे. तरी येथून पुढे कधीही कॉंग्रेस ला मत देणार नाही एक वेळ राष्ट्रवादी ला मत देईन पण कॉंग्रेस ला नक्की nahi हे सुरु असतांना cricket च्या निवडणुका होतात ....आणि निर्लज्ज राजकारणी तेथे पण हजेरी लाऊन जातात ....पैसे खा पैसे खा आणि पैसे खा .....पहिले स्वताचे, मग पक्षाचे , मुग गावाचे ....आणि मग वेळ उरला तर जनतेचे बघा ....कधी कधी वाटते लोकशाही येवून भारतात चूक झाली आहे चाबकाने फोड आता यांना सर्व राजकरण्याच्या विषयीचा राग सर्वांच्या मनात व लक्षात येतो. परंतु या सर्व लोकांना आपणच निवडून देतो हे कसे विसरतो? वर्षानु वर्ष हेच चालू आहे. अनेक संधी येऔनही आपणा त्याच त्याच चुका करतो, मग आपल्या रडण्याला काय अर्थ आहे? त्याच त्याच प्रतिक्रिया, त्याच्त्याच प्रकारे वेगवेगळ्या प्रसंगी? आपण मतदार मूर्ख आहोत.. अशा नेत्यांना निवडून deto अभिजित सर, मी तुमच्या मताशी सहमत आहे. आघाडी ला ब्लामे करून फयदा नाही, याला आपण मतदार जवाबदार आहेंत, मतदान करताना ६०% मतदार मतदान कोण किती पैसे वाटतो, किती पार्ट्या (किती दारू पाजतो) त्यला वोट करतो आणि ५ वर्षा साठी गुलाम होऊन बसतो, सर्व कडूनही हें चित्र मी मतदार झालें तेवा पासून पाहेतो आहें. पैहेलें मतदार जगला पाहिजें, नाही तर जें होईल ते निमुट पाने बघेतले पाहिजे. अभिजित च्या मताशी सहमत सत्य परिस्थिती कथन करणार लेख. पण हा लेख वाचून गेंड्याच्या कातडी असलेल्या नेत्यांना फरक पडेल का ? जनता किती दिवस असा अत्याचार सहन करणार आहे कुणास ठावूक. दोन्ही सरकारी त्यांची लायकी दाखवली आहे. आता जनतेने शहाणे बनून आपली चूक सुधारावी हि विनंती!!!!! काँग्रेसचे नेते एवढा प्रचंड अपमान होऊन सुद्धा सत्तेला एखाद्या "मुंगळया" सारखे का चिकटून राहतात याचे कारण मी तुम्हाला सांगतो. सत्तेवर असताना सुद्धा जवळपास प्रत्येक नेत्याच्या/मंत्र्याच्या अनेक भानगडी उजेडात येत आहेत. सत्ता हातात असल्याने त्याना त्यावर काहीतरी "नियंत्रण" करता येते, सत्ता गेली की त्यांची पाळता भुई थोडी होईल, केवळ याच मुळे ते लाज सोडल्यासारखे सत्तेला चिकटून आहेत." काँग्रेस सरकार विरुद्ध १९५५-६० च्या सुमारास आचार्य अत्रे यांनी काढलेले उद्गार आजही काँग्रेसला तंतोतंत लागू पडतात. अरे सत्ता देउन जनतेने चुक केली सर्व पक्षाचे पुढारी /आमदार/खासदार/मंत्री /चमचे ह्यांना सामुहिक फाशी द्यावी इतकेच नाही तर त्यांचे जवळचे नातेवाईक व भ्रष्ट अधिकारी यांचा वरही अशीच कारवाई केल्यास ह्या लोकांनी देशाची वाट लावली त्याची शिक्षा मिळेल / हि सर्व मंडळी देशद्रोही आहेत / दलाल आहेत त्याच्या पाठींब्या शिवाय असले प्रकार होणे शक्य नाही . हे लोक सत्ता व पैशासाठी स्वतःच्या आईला विकायला कमी करणार नाहीत तर देशाभिमान व देशप्रेम कुठे असणार जेव्हा पासून काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सत्तेवर आली तेव्हापासूनच महाराष्ट्राच्या राजकारणाची अधोगती सुरु झाली हे वास्तव आहे या आघाडीतील अंतर्गत संघर्षामुळेच राजकीय व सामाजिक, आर्थिक प्रगतीत महाराष्ट्राने तळ गाठला आहे. ही आघाडी केवळ सत्तेच्या हव्यासापोटीच जन्माला आली आहे त्यामुळे जनतेने या आघाडीकडून काही अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही. अरे यांच्या हाती सत्ता देउन जनतेने चुक केली आत्ता काय उपयोग ही यांची लायकी चांगला लेख आहे, आघाडी एकत्र आली ती फक्त पैसे खाण्यासाठी, मन्त्रांची काय बायका पोर या स्पोतात मेली नाही.....आणि ती मारणार पण नाही कारण सुरक्षा तशी ठेवली या लोकांनी स्वताच्या परिवाराची पण तशी सुरक्षा हे लोक राज्याची नाही ठेवू शकत.
आबा नुसते गोड बोलून नाही चालणार.... आयुष्यभर माहितीच घेत राहणार का ? कृती करा.... आबा कुठे आहात तुम्ही...व्हा अक्क्रमक विकास साठी पण ...जसे सभे मध्ये आक्रमक होता भाषणाला, तसे काम पण आक्रमक करा ...मस्त वाटेल आम्हाला. मग हा निधी तसाच पडून असावा आता या साठी पोलीस आधुनिकीकरण निधीवापर नावाचे खाते आणि त्यासाठी एक मंत्रिपद निर्माण करावे लागेल का
On 16/07/2011 11:06 AM Maharashtriy said:
मृणालिनीतायींनी
On 16-07-2011 02:52 AM vijay said:
या
On 16/07/2011 02:19 AM Vaibhav Deshpande said:
अहो प्रश्न परत तोच. नेत्यांचे पाय चाटून आणि चपला उचलून मंत्री होयचा आणि काहीही अनुभव नसलेल्या परदेशी बी आणि तिच्या मुलाचे ओंगळवाणे लुब्रेपणा करायचा आणि आपण ह्या असल्या नेत्यांकडून नेतृत्वाची अपेक्षा करायची. हि आपली चूक आहे. असल्या काहीही नेतृत्व गुण नसलेल्या मंत्र्या संत्र्यान कडून कसला डोंबला काय होणार. मारणारी जनताच काही प्रमाणात ह्याला जबाबदार आहे. कोणालाही जातीपातीच्या आधारावर निवडून द्यायचा मग भोग त्याची हि फळा रे या सर्व जन या गेटवे वर या आपण मेणबत्ती लाऊया काळी फीत लाऊया आली मिली गुप चिली परत जा पुन्हा भेटूया बोंब स्फोट झाला कि या सर्व जन या आपण मेनबत्ती लाऊया. अनेक गोष्टींचा योग्य उहापोह केला आहे.परप्रांतीयांचे व बांगलादेशींचे लोंढे रोखले पाहिजेत हे राज ठाकरेंचे म्हणणे रास्त आहे.शेवटी किती लोकांना मुंबई सामावून घेणार?त्यालाहि काही मर्यादा हवी.प्रशासन कोलमडून पडते.लोकांना आपत्कालीन व्यवस्थेची जाणीव करून दिली पाहिजे.पोलीस यंत्रणा भ्रष्टाचारमुक्त असणे फार जरुरीचे आहे.
On 16/07/2011 07:12 AM Dilkhulas said:
On 16/07/2011 09:12 AM sandip said:
On 16/07/2011 05:24 AM Sachin said:
On 16/07/2011 06:10 AM ravi said:
On 16/07/2011 07:23 AM Sharad said:
On 16/07/2011 08:09 AM subhash said:
very nice .....
On 16/07/2011 07:35 AM abhijit ligde said:
On 16/07/2011 08:12 AM SHIVRAM VAIDYA said:
"
On 16/07/2011 08:09 AM kashinath said:
On 16/07/2011 08:31 AM SUNIL MANTRI, CHICAGO, USA said:
On 16/07/2011 08:41 AM Milind Jawale said:
On 16/07/2011 09:14 AM chetan said:
On 16/07/2011 09:26 AM sandip Patil said:
On 16/07/2011 09:33 AM kanchan said:
are
On 16/07/2011 09:28 AM Nilesh said:
On 16/07/2011 09:42 AM shashi Patil said:
On 16/07/2011 09:43 AM Yogi said:
On 16/07/2011 09:43 AM sameer said:
On 16/07/2011 09:43 AM anil said:
On 16/07/2011 09:50 AM Mayur Sonawane said:
On 16/07/2011 10:08 AM Satish Deshpande said:
On 16/07/2011 10:28 AM Padmakar said:
On 16/07/2011 10:28 AM dashrath said:
On 16/07/2011 10:28 AM sandeep said:
On 16-07-2011 10:54 AM mrs.Geeta N.Raut said:
On 16/07/2011 11:04 AM sham Keluskar said:
No comments:
Post a Comment