Total Pageviews

Tuesday, 26 July 2011

CELEBRATING KARGIL VICTORY BRIG HEMANT MAHAJAN IN MEDIA

http://72.78.249.107/esakal/20110726/4761668264342264288.htm
कारगिल दिवस' कार्यक्रमात शहीदांना अभिवादन
सकाळ वृत्तसेवा
Tuesday, July 26, 2011 AT 05:22 PM (IST)
पुणे - ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटी (एआयएसएसएमएस) व त्रिशक्ती फाउंडेशन यांच्यातर्फे मंगळवारी "कारगिल दिवस' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देशाच्या सीमेचे रक्षण करताना या युद्धात शहीद झालेल्या जवानांना विद्यार्थ्यांनी अभिवादन केले.

सोसायटीचे उपाध्यक्ष श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती, निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. बी. शेकटकर, फाउंडेशनचे अध्यक्ष निवृत्त कर्नल संभाजी पाटील, ब्रिगेडिअर एच. एच. महाजन, कारगिल युद्धातील वीरचक्र विजेते कर्नल गौतम खोत, सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे प्रमुख श्रीमंत महाराजकुमार मालोजीराजे छत्रपती, सचिव निवृत्त कॅप्टन शिवाजी महाडकर, निवृत्त लष्कर अधिकारी व विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते. कारगिलच्या युद्धाची माहिती व महत्त्व नव्या पिढीला समजावे, या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली. युद्धात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कारगिल दिवसाची माहिती शेकटकर व महाजन यांनी दिली. या प्रसंगी दाखविण्यात आलेल्या कारगिल दिवसाच्या ध्वनिचित्रफितीस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्रिशक्ती फाउंडेशनतर्फे साजरा करण्यात येणाऱ्या "विजय दिवस' या कार्यक्रमाची स्मरणिका व सीडीचे प्रकाशनही करण्यात आले. मंजूषा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. अजय पाटील यांनी आभार मानले.
On 26/07/2011 07:30 PM NITIN said:
वीर जवान तुझे सलाम ....जय हिंद जय महाराष्ट्र
On 26/07/2011 06:32 PM Rupesh Jadhav said:
जय हिंद जय महाराष्ट्र

No comments:

Post a Comment