Total Pageviews

Saturday, 30 July 2011

CORRUPT POLICE IN CHIKHALI

पोलिसच बघे होतात तेव्हा...
सकाळ वृत्तसेवा
Saturday, July 30, 2011 AT 01:00 AM (IST)
Tags: police,   pimpri
चिखली - नागरिकांकडून पोलिसांना दारूधंद्याबाबत माहिती कळविली जाते... काही वेळात गस्तीवर असलेले पोलिस तिथे येतात... पोलिस दिसल्यावर दारूअड्ड्यावरील लोक निघून जातात... अनेक नागरिक त्यांना पकडण्याची पोलिसांकडे विनंती करतात; मात्र, पोलिस बघ्याची भूमिका घेत तेथून काढता पाय घेतात. त्यानंतर नियंत्रण कक्षाला ही माहिती कळवणार असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. त्यानंतर पोलिस पुन्हा तिथे आले. त्यांनी नागरिकांना खडेबोल सुनावून नाइलाजास्तव कारवाई केली. हा प्रकार शुक्रवारी भोसरी ठाण्याच्या हद्दीत घडला. या कारवाईत गावठी दारूचे तीन कॅन, बाटल्या, प्लास्टिक मग, ग्लास पोलिसांनी ताब्यात घेतले. 

भोसरीतील पेठ क्रमांक 10 मध्ये अवैध दारूधंदे सुरू असल्याचे भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी पोलिसांना कळविले. काही वेळाने गस्तीवर असलेले भोसरी पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी बालाजी तडाखे, विठ्ठल जाधव, प्रमोद पटेकर हे व्हॅनसह त्या ठिकाणी आले. त्यांनी दारूअड्ड्यावर तर कारवाई केली नाहीच, उलट नागरिकांनाच शिवराळ भाषेत धमकावले; तसेच दारूअड्ड्यावर कारवाईचा आदेश नसल्याने आम्ही कारवाई करू शकत नाहीत. तुम्हाला गरज असेल, तर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना कळवा, पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार द्या, असे म्हणत ते निघून जाऊ लागले. तोपर्यंत दारूअड्ड्यावर दारू पीत बसलेले लोक निघून गेले; मात्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे शहर उपाध्यक्ष चंद्रकांत उदगुडे, संतोष यादव, संघटक शांताराम खुडे यांनी नियंत्रण कक्षाला कळविणार असल्याचे सांगितले. पोलिस पुन्हा घटनास्थळी येण्यास तयार झाले.
""तुम्हाला बावधन, चिखली, रावेत परिसरात असलेले गावठी दारूचे अड्डे दिसत नाहीत का? हिम्मत असेल तर तेथे जाऊन पाहा'', असे खडेबोल सुनावत नाइलाजास्तव त्यांनी दारूअड्ड्यावर कारवाई केली.
प्रतिक्रिया
On 30/07/2011 11:52 AM सतीश सोनवणे said:
""तुम्हाला बावधन, चिखली, रावेत परिसरात असलेले गावठी दारूचे अड्डे दिसत नाहीत का? हिम्मत असेल तर तेथे जाऊन पाहा'', असे खडेबोल सुनावत नाइलाजास्तव त्यांनी दारूअड्ड्यावर कारवाई केली.............."पोलिसच असे बोलायला लागले तर पाहायचे कुणाकडे..... अरे तुम्हाला माहित तर सारे आहे....मग का कच खाता?? " वाईट अतिशय वाईट .........कायदा आणि सुव्यवस्था महाराष्ट्रातील....आणखी काय पुरावे पाहिजेत? हि बातमी "सकाळ" ने छापली याबद्दल आभार..
On 30/07/2011 09:47 AM अनिरुद्ध दातार said:
अरे कारवाई केली तर हप्ता बुडेल न पोलिसांचा. कारवाई करायला ते दारू धंदा वाले काय सामान्य नागरिक आहेत का? कारवाई मधली दारू नष्ट केली का पोटात घातली?
On 30/07/2011 08:11 AM akshay.com said:
 पोलिसांनी कारवाई केल्यास राजकारणी लोकांचा होणारा हस्तक्षेप व त्यामुळे पोलिसांना होणारा त्रास कोणालातरी माहित आहे का? या सर्वांचे मूळ आहे ते राजकारणी मंडळी. का त्यांच्याबद्दल कोणीच काही नाही बोलत? भीती वाटते म्हणून? आज पोलिसांची अवस्था कोणीही यावे आणि टपली मारून जावे अशी झाली आहे. काय पटतय का?
On 30/07/2011 08:05 AM rahul said:
अवेध्य धंद्यांना सौरक्षण देणारी पोलिसच असतात.
On 30/07/2011 02:53 AM Vaishali said:
माझ्या आईच्या घराला एका ट्रक ने धडक देवून भिंत पडली. पोलीस कम्प्लेन केली तर पोलीस आले त्यांनी ट्रक वाल्याला १००० रुपये आईला द्यायला लावले आणि आई कडून २०० रुपये स्वत: घेवून गेले काय तर म्हणे त्यांना पोलीस ठाण्या मधून तिथे यावे लागले.

No comments:

Post a Comment