काँगेस पक्षाचे सरचिटणीस दिग्विजयसिंह उर्फ दिग्गीराजा पुन्हा बरळले.अर्थातच ते नेहमीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपला निशानाबनविण्यास चुकले नाहीत. त्यांचीही मजबुरी असेल कदाचित्! हायकमांडला खुशकरण्यासाठी काय काय करावे लागते, त्याचा समृद्ध अनुभव त्यांच्या पाठीशीआणि गाठीशी आहेच.
तसं पाहायला गेलं तर, कोंग्रेस पक्षाने युवराजांना सांभाळण्यासाठीठेवलेला हा 'बाब्या' आहे. (सांभाळ करणारी ती 'बाई' आणि सांभाळ करणारा तो'बाब्या'.) त्यामुळे अर्थातच युवराजांचे मन रिझवण्यासाठी आणि श्रेष्ठींचीमर्जी सांभाळण्यासाठी इतरांना वाकुल्या दाखवणे, विदुषकी चाळे करणे,चमचेगिरी करणे अशी खुशमस्करीची कामे त्यांना पार पाडावी लागत आहेत.
आताहा बाब्याचा उल्लेख केलेला गंमतीदार भाग बाजूला ठेवला तर, सातत्याने अतिशयवेगळ्याप्रकारची वादग्रस्त विधाने करून येनकेनप्रकारे प्रसिद्धीच्या झोतातराहण्याचा प्रयत्न करणाऱ्या दिग्गीराजाबाबत कोंग्रेसने आजपर्यंत मौन कापाळले आहे? या मौनावरून अशी विधाने करण्यासाठी पक्षाची त्यांना फूस आहे,हेच सिध्द होते. आणि दिग्गीराजांना सांभाळून घेण्यासाठी इतर प्रवक्त्यांनाबरीच कसरत करावी लागते, त्याचे कारण शेवटी आपला तो पक्षश्रेष्ठींच्यामर्जीतला 'बाब्या'!
दिग्गीराजांनी जाहीरपणे असे आरोप करणे म्हणजेकेवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा प्रयत्न असेच म्हणावे लागेल. तसे नसतेतर त्यांनी तपासयंत्रणांना पुराव्यासह माहिती देवून एक जबाबदार नागरिक यानात्याने आपले कर्तव्य कोणताही गाजावाजा न करता पार पाडले असते, आणिपक्षश्रेष्ठींनीही त्यांना तसेच करण्याचा सल्ला दिला असता. पण असे घडतानादिसत नाही, कारण पक्षश्रेष्ठींना आणि दिग्गीराजांना दोघांनाहीजबाबदारीपेक्षाही विदुषकी चाळ्यांची सवय लागली आहे.
तपासयंत्रणांच्यादिग्गीराजाविषयीच्या भूमिकेबद्दलही शंका उपस्थित होते. कारण दुसऱ्या इतरकोणी असे बॉम्बस्फोटासंदर्भात विधान, आरोप केले असते तर, तपासयंत्रणांनीत्याला केव्हाच 'उचलले' असते. पण दिग्गीराजा अजूनही 'मोकाट' कसे?बॉम्बस्फोटासंदर्भात असलेली माहिती दडवून ठेवल्याच्या आरोपाखाली त्यांनायाआधीच अटक व्हायला हवी होती.
पण असे घडले नाही आणि घडेल असेहीवाटत नाही. कारण दिग्गीराजा आपलेच आणि तपासयंत्रणाही आपलीच! मग त्यांनाहात लावण्याची हिंमत कोणाकडे आहे? सगळाच बेशरमपणाचा कळस आहे.
No comments:
Post a Comment