Total Pageviews

Wednesday, 13 July 2011

POLICE CORRUPTION EXCELLENT ANALYSIS IN SAMANA


पोलीस डायरी
गाईचे रक्त काढल्यावर काय होणार?वर्षीच्या जानेवारी महिन्यात कुलाब्याच्या ‘आदर्श’ घोटाळ्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह १३ जणांविरुद्ध नियमांचे उल्लंघन, अधिकाराचा गैरवापर, खोटी कागदपत्रे तयार करून कोट्यवधी रुपयांचे फ्लॅट स्वस्तात मिळविले या आरोपावरून सीबीआयने गुन्हा दाखल केला असतानाच मोबाईल कंपन्यांना कायद्याचे उल्लंघन करून परवाने देण्यात आले. यामुळे केंद्राचे १ लाख ७५ हजार कोटींचे नुकसान झाले असे उघडकीस आल्यानंतर २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात अडकलेल्या केंद्रीय मंत्री व खासदारांविरुद्ध सीबीआयने गुन्हे दाखल केले आणि सारा देश हादरून गेला. केंद्रीय दूरसंचारमंत्री ए. राजा व खासदार कनिमोझी यांच्यासह सुमारे डझनभर महत्त्वाच्या व्यक्तींना २ जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी अलीकडे अटक करण्यात आली, तर खासदार सुरेश कलमाडी यांना राष्ट्रकुल स्पर्धेत भ्रष्टाचार केला या आरोपावरून जेलमध्ये जावे लागले. या सार्‍या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना आज दिल्लीच्या तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले आहे. या व्हीआयपींची कारागृहात शाही बडदास्त ठेवली जाते, असा आरोप झाल्यानंतर तर सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायमूर्ती ब्रजेशकुमार गर्ग यांनी तिहार जेलला भेट देऊन सुरेश कलमाडींना चहा पाजणार्‍या तिहारच्या जेलरची काळ्या पाण्याच्या (पोर्टब्लेअर) शिक्षेवरच बदली केली. भ्रष्टाचार्‍यांविरुद्ध सार्‍या देशात संतापाची लाट उसळली असल्याचेच हे चित्र आहे. तरीही भ्रष्टाचार तसूभरही कमी झालेला नाही. उलट त्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचेच अलीकडील वाढत्या ‘ट्रॅप’वरून दिसून येत आहे.
गेल्या आठवड्यात इन्कम टॅक्स कमिशनर रामफूल मीना यांना एका सॉफ्टवेअर इंजिनीअरकडून सवादोन लाखांची लाच स्वीकारताना मुंबईतून अटक करण्यात आली. त्याआधी सीबीआयने पुण्यातून एका कस्टम अधिकार्‍याला १ कोटी १० लाखांची लाच स्वीकारताना अटक केली होती, तर गेल्या वर्षी महाराष्ट्र-गोवा परिक्षेत्राचे प्रमुख आयएएस अधिकारी बाली यांना २ कोटींची लाच घेताना सीबीआयने कुलाब्यातून अटक केली. आयकर आयुक्त रामफूल मीना यांच्या अटकेची चर्चा सुरू असतानाच मुंबईचे पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांनी ताब्यात घेतलेल्या मुंबई क्राइम ब्रँचच्या सी. बी. कंट्रोल खात्यातील पोलीस निरीक्षक भास्कर डेरे यास रविवारी एका व्यापार्‍याकडून खंडणी घेताना गोरेगाव पोलिसांनी अटक केली होती. आपल्या दुकानातील माल नकली व कालबाह्य आहे असे सांगून डेरे याने शकील अब्दुल्ला या व्यापार्‍याकडून गेल्या आठवड्यात १ लाख ४० हजार रुपये उकळले होते, परंतु दुसरा हप्ता स्वीकारण्यासाठी डेरे रविवारी गोरेगावला गेला आणि फसला. अति तेथे माती दुसरे काय? कारवाई करण्याऐवजी कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्यावर अशी गत होते. माणसाला पैशाची हाव, टेम्प्टेशन किती असावे? कुणालाही त्रास देऊन, छळून मिळविलेला पैसा कधीही टिकत अथवा पचत नाही हे जर डेरेला कळले असते तर त्याच्यावर अशी वेळ आली नसती. आज जगातील कोट्यवधी लोकांचे आयुष्य कल्पना करता येणार नाही इतके बदलले आहे. संगणक व मोबाईलने क्रांती केली आहे. जग तुमच्या मुठीत आले आहे. त्यामुळे आता तुमचा कोणताही गुन्हा सध्याच्या युगात पचणे फारच कठीण आहे. पोलिसांनी तर स्वप्नातही आता हेराफेरी करण्याचा विचार करू नये. नाहीतर अलीकडे कर्जतच्या रेव्ह पार्टीत सामील झालेला मुंबई क्राइम बँचच्या नार्कोटिक्स विभागाचा पोलीस निरीक्षक अनिल जाधव सहीसलामत सुटला असता. परंतु हॉटेलवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या रायगड पोलिसांनी अनिल जाधवला माफ केले नाही. त्याच्यावर कारवाई केली. म्हणजे जो चुकला, जो सापडला तो संपला हे आता प्रत्येक पोलिसाने समजले पाहिजे. एक काळ असा होता, पोलीस एकमेकांना सांभाळून घ्यायचे. पोलिसांची अब्रू जाऊ नये म्हणून गुन्हेगार पोलिसाला वाचवायचे. आता ते पूर्वीचे दिवस गेले. उलट गुन्ह्यात सापडलेल्या पोलिसावर अलीकडे प्रथम कारवाई केली जाते. त्यामुळेच अलीकडे भ्रष्टाचारात महाराष्ट्र पोलिसांनी आघाडी मारली आहे. दरवर्षी ‘ट्रॅप’मध्ये आघाडीवर असणार्‍या महसूल खात्याला पोलिसांनी केव्हाच मागे टाकले आहे. लोक आता जागृत झाले आहेत. त्यांना त्यांचे हक्क, मर्यादा त्यांना कळू लागल्या आहेत. ‘आरटीआय’मुळे लोकांना आता प्रत्येक गोष्टीची इत्थंभूत माहिती सहज मिळू लागली आहे. तेव्हा कोणताही शासकीय अधिकारी आता कुणाची दिशाभूल करून त्याच्याकडून पैसे उकळू शकत नाही. तसा प्रयत्न केलाच तर भास्कर डेरेसारखी अवस्था होऊ शकते. भास्कर डेरेला लोकांनी पाठलाग करून पकडले आणि गोरेगाव पोलिसांच्या स्वाधीन केेले. अशी वेळ कोणत्याही पोलिसावर येऊ नये. कारण आजही सामान्य लोकांचा पोलिसांच्या खाकी वर्दीवर विश्‍वास आहे. तेच सामान्यांना न्याय देऊ शकतात. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याला जागतात. एक दिवस जरी पोलीस रजेवर गेले तर सामान्यांची काय अवस्था होईल? त्यामुळे सर्वच ढेरे आणि जाधव नसतात. कायद्याचा बडगा दाखविणारे, ठोस कारवाई करणारे प्रामाणिक अधिकारीही या दलात आहेत.
आज आपली शासकीय यंत्रणाच सक्षम नाही. शासकीय यंत्रणा दुबळी, कुचकामी असल्यामुळेच सर्वत्र भ्रष्टाचार माजला आहे. शासकीय अधिकार्‍यांना पुरेशा सुविधा नसतील तर का नाही भ्रष्टाचार माजणार? का नाही सर्वत्र खाद्यपदार्थ, औषधे आदी नकली वस्तू बाजारात मिळणार? आज कायद्याची कुणाला भीती राहिली नाही म्हणूनच सर्वत्र बजबजपुरी माजली आहे. भास्कर डेरेने कायद्याचा बडगा दाखवून नकली व आऊटडेटेट माल विकणार्‍या व्यापार्‍यावर जर कारवाई केली असती तर त्याच्यावर जेलमध्ये जायची वेळ आली नसती. यशवंत सोनावणे या अप्पर जिल्हाधिकार्‍याला नाशिक मनमाडनजीक पोपट शिंदे या तेलमाफियाने जाळले नसते. तेव्हा काढायचे असेल तर गाईच्या आचळातून एकवेळ दूध काढा, पण तिचे रक्त काढू नका. रक्त काढायचा प्रयत्न केला की तुमच्या पेकाटात लाथ बसली म्हणून समजा

No comments:

Post a Comment