प्रति,
रियाजजी भटकळसाहेब
सप्रेम जय महाराष्ट्र,सर्वप्रथम काल झालेल्या मुंबईवरील बॉम्बहल्ल्याबद्दल आपल्याला मन:पूर्वक धन्यवाद!
आपल्याला आश्चर्य वाटले असेल की, मी आपल्याला धन्यवाद का देतो आहे? साहेब, परवा आपण दादर कबुतरखान्याजवळ केलेला स्फोट २० मिनिटे अगोदर झाला असता तर डिसिल्वा हायस्कूलची आमची मुले सापडली असती म्हणून उशिरा केलेल्या स्फोटाबद्दल शतश: धन्यवाद!
कालच सर्व टीव्ही चॅनलवर आपले प्रवक्ते युवराज गांधी यांनी स्पष्ट केले, ‘‘मुंबईचे इराण-इराक, अफगाणिस्तान झाले आहे व असे बॉम्बस्फोट वारंवार होत राहाणार’’ तेव्हाच आपल्या सामर्थ्याची आम्हाला कल्पना आली व आम्ही मान्य केले की अजमल कसाबजी यांच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ आपण केलेली ही फटाक्यांची आतषबाजी होती.
तरी भटकळसाहेब आपणास आम्हा मुंबईकरांची नम्र विनंती आहे की, निदान जसे औदार्य आपण दादर स्फोटात दाखवले तसेच यापुढे सर्व बॉम्बस्फोट आपण निदान शनिवार किंवा रविवारी कराल कारण कामावरून येणार्यांची व शाळकरी मुलांची गैरसोय नको.
भटकळसाहेब पत्राचे उत्तर जरूर कळवा अथवा आपले समर्थक युवराज गांधींकरवी चॅनलवर निवेदन करा की भविष्यात आपले मनसुबे काय आहेत? निदान मुंबईकर बॉम्बस्फोटदिनाचा बँक हॉलिडे साजरा करतील.
धन्यवाद,
आपला विनम्र,
मुंबईकर
प्रत रवाना -
१) अजमलजी कसाब
२) अफजलजी गुरू
३) लश्करे तोयबा
४) युवराज गांधी
(‘सामना’चे वाचक किरण सुर्वे यांनी ‘सामना’ला पाठविलेले पत्र
No comments:
Post a Comment