मुलांच्या वैवाहिक आयुष्यात हस्तक्षेप नको!
,अजितकुमार बिडवे, समुपदेशक (सहजीवन)
मुलांचं लग्न लावून दिल्यावर पालकांची जबाबदारी संपते असं नाही. उलट मुलांच्या अडीअडचणीला त्यांनी धावलंच पाहिजे. परंतु त्याचवेळी आपण मुलांच्या वैवाहिक आयुष्याच्या आड तर येत नाही ना , याचाही पालकांनी विचार करायला हवा... >> माझ्या मुलीचं दीड वर्षापूर्वी लव्ह कम अॅरेन्ज मॅरेज झालंय. तिच्या घरात सासूचा खूपच इन्टरफिअरन्स आहे. जावई उच्चशिक्षित, पण जुन्या विचारांचा आहे. बायकोने नोकरीऐवजी, घर सांभाळावं असं त्याला वाटतं. प्रत्येक गोष्ट आईच्या विचाराने करतो. मुलीने सासूबद्दल काही सांगितलं तर म्हणतो- आई वयस्कर आहे, दुर्लक्ष कर. माझी मुलगी पदव्युत्तर शिकलेली असूनही तिला नोकरी करू देण्यास तयार नाही. या सगळ्या गोष्टींचं मुलीवर दडपण येतंय. या परिस्थितीतून तिने कसा मार्ग काढावा?
- एका मुलीची काळजीग्रस्त आई, मुंबई
तुमच्या मुलीच्या लग्नाला दीडच वर्ष होतायत. लग्नानंतर मुलीने सासरी जाण्याची पध्दत आपल्याकडे आहे. साहजिकच दोन्ही घरांच्या लाइफस्टाइल, संस्कृती, आचार-विचार यात फरक असणं स्वाभाविक आहे. नवीन पद्धती शिकणं अवघड नसलं तरी, माहेरच्या पद्धती सोडण्याबाबत, विसरण्याबाबत मुलींना खूप अडचणी येतात आणि हे स्वाभाविक आहे. अशा वेळी दोन्ही कुटुंबातील वडीलधाऱ्या माणसांनी समजूतदारपणा दाखवणं अपेक्षित आहे. पण तसं घडत नसावं असं दिसतंय. काळानुरूप पतीपत्नीचं नातं अधिक दृढ व विश्वासाचं होत जातं. त्यानुसार ते उभयता आपली जीवनपद्धती स्वत:च निश्चित करतील. याबाबत त्यांना त्यांचं स्वातंत्र्य द्यायला हवं. अशा वेळेस तुमच्या मुलीच्या व जावयाच्या नात्यात बाधा येणार नाही, तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. नवविवाहितांनी एकमेकांना समजून घ्यावं, मोकळेपणाने सुसंवाद साधावा अशी परिस्थिती प्रयत्नपूर्वक निर्माण करायला हवी. शक्यतो आक्रमक भूमिकेऐवजी सामोपचाराची, पण आग्रही भूमिका तुम्ही स्वत: घेऊ शकता व तुमच्या जावयाला व विहिणबाईंना तशी जाणीव करून देण्याचा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही.
एकाच वेळी अनेक प्रश्नांचा गुंता वाढवण्याऐवजी एकेक प्रश्न सुरळीतपणे सोडवण्याची भूमिका घ्यायला हवी. मुलगी व जावई यांचे नातेसंबंध अधिक सृदृढ, निकोप व्हायला हवे. त्यानंतर मुलीच्या करियरच्या प्रश्नाची उकल समजूतदारपणे परंतु आग्रही भूमिका घेऊन करणं महत्त्वाचं आहे. तुमची मुलगी एकदा नोकरी/व्यवसायात स्थिर झाली की तिच्या सासूच्या भूमिकेत नक्कीच अपेक्षित बदल होईल असा विश्वास ठेवा. मात्र त्याचबरोबर घरातील वडीलधाऱ्यांना आदराने व प्रेमाने वागवणंही महत्त्वाचं आहे, याचंही महत्त्व मुलीला समजावून द्या.
>> आमच्या लग्नाला वीस वषेर् झालीत. दोन मोठी मुलं आहेत. माझ्या पतीचा स्वत:चा व्यवसाय आहे. सुरुवातीला व्यवसायात अस्थिरता होती. त्यामुळे खडतर दिवस काढावे लागले. वैयक्तिक आवडीनिवडींचा मी विचारच केला नाही. घरखर्चाबद्दल मला खूप तडजोड करावी लागली. आता व्यवसाय चांगला चालून उत्पन्नही चांगलं आहे. पण नवरा माझ्याशी नीट वागत नाही. मुलांची काळजी घेत नाही. घरात आजही दहा रुपये मनाप्रमाणे खर्च करता येत नाही. त्याचवेळी पती मात्र मित्रमंडळीमध्ये खूप खर्च करतात. मुलांच्या मागण्या पूर्ण करताना माझा जीव मेटाकुटीस येतो. कधी कधी खूप नैराश्य येते. विशेष म्हणजे पतीला कुठलंही व्यसन नाही. इतरांशी ते चांगले वागतात. मग मलाच त्रास का? या परिस्थितीतून कसं बाहेर पडायचंय?
- चारुलता शिंदे, कल्याण
गेली वीस वर्षं तुम्ही खूप त्रासात काढली आहेत व आजही परिस्थितीत मनासारखा बदल नाही. पण कृपया हताश व निराश होऊ नका. गेली वीस वषेर् आथिर्क परावलंबनामुळे तुम्हाला खूप त्रास झाला आहे. तेव्हा आता आथिर्क स्वावलंबनासाठी चिकाटीने प्रयत्न करा. त्यात सातत्य असणं गरजेचं आहे. सुरुवातीला कितीही छोटं काम करावं लागलं, कमी पैसे मिळाले तरीही प्रयत्नात खंड पडू देऊ नका. आपल्या ऐपतीनुसार व आवडीनुसार जे शक्य असेल त्या कामाला लगेच सुरुवात करा. अगदी फॉल बिडींग असो किंवा कोणताही गृहउद्योग असो. एका दिवसात बदल होईल असा चमत्कार अपेक्षित नसला तरीही आथिर्क स्वावलंबनामुळे घरातील महिलेकडे बघण्याच्या दृष्टिकोनात नक्कीच चांगला बदल होतो. सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. आपल्या प्रयत्नांना अनेकांचं सहकार्य मिळेल व नक्कीच यश मिळेल. त्यामुळे पतीच्या वागण्यातही बदल होईल. मुल मोठी असली तर त्यांनी त्यांच्या मागण्या अतिशय विनम्रपणे, गोडीत त्यांच्या वडिलांनाच सांगाव्यात यासाठी प्रयत्न करा. घरातील जमाखर्चाचा हिशेब ठेवा व तो दरमहा पतीला आग्रहाने दाखवा. मोठे, आकस्मिक खर्च येऊ शकतात याची जाणीव पतीला गोडीगुलाबीने करून द्या. त्यासाठी तरतूद करण्याची आवश्यकता पतीला पटवून देणंही महत्त्वाचं आहे. हे सगळं करताना कोणत्याही प्रकारे कटूता येणार नाही व विनाकारण वाद होणार नाहीत याची मात्र दक्षता घ्या.
>> आमच्या लग्नाला ३ वषेर् झालीत. लग्न झाल्यापासून बायकोचा वेगळं रहाण्याचा हट्ट होता. मी एकुलता एक मुलगा असल्याने ते शक्य नव्हतं. माझ्या बहिणीने सुद्धा बायकोला मिळून-मिसळून आनंदात रहा असं सागितलं. पण उलट माझी बायको बहिणीशी भांडली. तेव्हा आईने समजूतदारपणे मला बायकोबरोबर वेगळं रहायला सांगितलं. बायकोच्या पहिल्या डिलिव्हरीनंतर आम्ही वेगळं राहू लागलो. पण स्वच्छता ठेवणं, मुलाचा सांभाळ करणं बायकोला अवघड जात होतं. त्यामुळे मुलगा सतत आजारी पडायचा. तेव्हा तिला खूप समजावलं. पण उपयोग झाला नाही. त्यात पुन्हा दिवस गेले. दुसऱ्या बाळंतपणाला ती माहेरी गेली ती, बरेच महिने झाले तरी आलेली नाही. मला आमच्या व मुलांच्या भविष्याची काळजी वाटते. यातून मार्ग काढण्यासाठी कृपया मार्गदर्शन करावं.
- शैलेन्द शहा, भायंदर-ठाणे
आपण जी माहिती दिली आहे, त्यातून पत्नीची नेमकी तक्रार काय आहे, हे समजत नाही. तिच्या समस्या/अडचणी काय आहेत हे शांततेने तिला विचारा. त्यासाठी कोणताही पूर्वग्रह न ठेवता नेहमी वारंवार तिला भेटायला जा. तिने एकदम परत रहायला यावं असा हट्ट करू नका. कमी अंतराने तिला दोन बाळंतपणं करावी लागली. त्याचा तिच्या शरीरावर/मनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच वेगळं रहायला गेल्यावर एकदम सगळी जबाबदारी पार पाडणं तिला झेपत नसेल. सध्या तरी नियमित पत्नीला व मुलांना भेटण्याचा प्रयत्न करा. तिच्या व मुलांच्या आरोग्यासाठी शक्य तितकी जास्त मदत सर्वार्थाने करा.
संघर्ष व मतभेद टाळून पत्नीशी मोकळेपणाने सुसंवाद साधा. तुम्ही पती व मुलांचा पिता म्हणून प्रभावीपणे जबाबदारी पार पाडू शकता असा विश्वास तिला द्या. तिच्या आईवडिलांशी भांडण न करता आदराने संवाद साधा. तुमच्यासाठी दोन्ही मुल व मुलांची आई (पत्नी) अत्यंत महत्त्वाचे आहेत याची जाणीव तिला प्रयत्नपूर्वक करून द्या. पत्नीकडून तिच्या अडचणी/समस्या समजावून घेतल्यानंतर प्रामाणिकपणे त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेऊन प्रयत्न करा. मग तुमचे व पत्नीचे संबंध हळूहळू पूर्वपदावर येतील व ती नक्की तुमच्याबरोबर रहायला परत येईल असा दृढ विश्वास मनात ठेवा. तुमच्या व पत्नीच्या प्रश्नांमध्ये इतरांचा सहभाग कमीत कमी राहील यासाठी प्रयत्न करा.

No comments:
Post a Comment