Total Pageviews

Saturday 30 July 2011

DEFINING SPIRITUAL HEALTH

मानसिक आरोग्य म्हणजे काय हे आपण सहज सांगू शकतो, पण मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय? मानसिकरीत्या स्वस्थ कोणाला म्हणावे?
W.H.O. या जागतिक संस्थेनुसार केवळ आजाराचे नसणे म्हणजे स्वास्थ्य नव्हे. त्यासोबत भावनिक वा आत्मीक सुखही असावे लागते, अशी व्यक्ती कोण वा ती कशी वागते याबाबत आता जाणकारांत एकमत आहे.
१) अशी व्यक्ती प्रसन्न, समाधानी, आशावादी वा उत्साही दिसते.
२) अशा व्यक्तीचे जवळच्या लोकांशी असलेले संबंध निकोप व सकस असतात.
३) अशा व्यक्तीस आपल्या भावना सहजरीत्या वा यशस्वीरीत्या हाताळता येतात व कठीण प्रसंगांचा सामना समर्थपणे करता येतो.
४) अशा व्यक्तीस आयुष्य अर्थपूर्ण वाटते वा आवडीच्या कामात संपूर्णपणे समरस होता येते.
म्हणजेच आजाराच्या नसण्यापलीकडे जाऊन या व्यक्तींमध्ये अजूनही बरेच काही असावे लागते, असते.
अशा भाग्यवान व्यक्तींच्या वागण्यात एका प्रकारची तृप्ती दिसून येते. ही मंडळी उतावीळ किंवा घाईत दिसत नाहीत. नव-नवीन अनुभवांचा आस्वाद घेण्याची त्यांची तयारी असते. रोजचे जगणे त्यांना आनंदी वाटते व भविष्य आशादायी. ही मंडळी मोकळेपणाने हसू शकतात- स्वत:वरही! या मंडळींचे वर्णन ‘स्वत:त मस्त’ असेही करण्यात येते.
विपरीत परिस्थितीशी सामना करण्याचे चिवट बळ त्यांच्यात दिसून येते, पण फक्त तेवढेच नाही, तर अशा परिस्थितीतून एखाद्या चेंडूप्रमाणे वर उडून पुन्हा पूर्वपरिस्थितीत परतण्याचा दणकटपणाही त्यांच्यात असतो  (resilience). त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीत एक विशिष्ट प्रकारची ध्येयनिष्ठा वा ध्येयासक्ती पाहायला मिळते. आपल्या सर्व कामांना वा परस्परसंबंधांना ही माणसं अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतात. लोक जोडण्याची कला त्यांच्यात प्रकर्षांने जाणवते.
पण परस्परसंबंध जपणे जसे महत्त्वाचे तसेच स्वत:ची काळजी घेणेदेखील महत्त्वाचे असते आणि म्हणूनच ही मंडळी काही छंद मोठय़ा हौसेने जोपासतात. यापैकी काहींसाठी तर त्यांचे कामच त्यांचा छंद असतो. निवडलेल्या कामात (वा छंदातदेखील) नैपुण्य वाढविण्यात ते प्रयत्नशील राहतात. काळ-वेळ, तहान-भूक विसरून ते या कामांत स्वत:ला गुंतवू शकतात.
श्रम-निवांत व काम-विरंगुळाच्या वेळात साधण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो. वैयक्तिक आयुष्यातील हे दोन्हीही कप्पे त्यांना तेवढेच महत्त्वाचे वाटतात. ‘काहीतरी कमविण्यासाठी काहीतरी गमवावे लागते.’ या नियमानुसार ‘स्वत:चा वेळ’ जपण्यासाठी मग ते व्यावसायिक आयुष्यातील काही फायदेशीर शक्यतांवर पाणी सोडायलाही मागे-पुढे पाहत नाही.
कोणत्याही बदलास- मग तो वैयक्तिक असो, व्यावसायिक असो वा सामाजिक असो- हे घाबरत नाहीत. बदललेली परिस्थिती ही स्वत:तल्या क्षमता वाढविण्याची संधी आहे, असे समजून ते नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यात स्वाभिमान व आत्मविश्वास तुडुंब भरलेला जाणवतो. त्याचबरोबरीने ते आपल्या सर्व गुण-दोषांसकट एक माणूस म्हणून स्वत:चा संपूर्ण स्वीकार करीत असतात. एक व्यक्ती म्हणून ते स्वत:ला कोणाहीपेक्षा कमी लेखत नाहीत, तसेच कोणलाही देवत्व बहाल करीत नाहीत.
मग तुमच्या-आमच्यासारख्यांनी हे गुण स्वत:त जोपासण्यासाठी किंवा असलेले गुण वाढविण्यासाठी काय करावे?
त्यासाठी आपल्याला अनेक पद्धती उपलब्ध आहेत.
काहींच्या मते योग, ध्यान, सेवा, दया, क्षमा व कृतज्ञता यातूनच हे साध्य करता येऊ शकते.
‘पॉझिटिव्ह सायकॉलॉजी’चे जनक डॉ. मार्टिन सेलिगमन यांच्या मते आपण स्वत:तल्या गुण-सामर्थ्यांना (सिग्नेचर स्ट्रेन्थ) ओळखून त्यांचा विकास केला पाहिजे. त्यांच्या मते आपल्याला आपले काम (किंवा छंद) इतक्या तल्लीनतेने करता आले पाहिजे, जणू ध्यानावस्थाच. यालाच ते flow  असे संबोधतात व याहीपुढे जाऊन ‘भव्य’ अशा कोणत्याही अर्थपूर्ण उद्दिष्टास स्वत:ला नि:स्वार्थीपणे वाहून घेतले पाहिजे (meaning)). या दोन्हीही अवस्था (flow and meaning) स्वत:त प्रयत्नपूर्वक जोपासता येतात व याच आयुष्यास आनंद देतात.
डॉ. अ‍ॅलबर्ट एलिस यांनी हेच सर्व एका मानवतावादी, लवचिक, विवेकी व विज्ञानाधारित विचारसरणीद्वारेही करता येते, असे सांगणारी  फएइळ (REBT (Rational Emotive Behaviour Training) नावाची वैचारिक पद्धत लोकांसमोर मांडली.  फएइळ नुसार आयुष्यात क्लेश अटळ आहे, पण त्याचा आपल्याला कितपत त्रास होईल हे मात्र आपण ठरवू शकतो. स्वत:चा व इतरांचा माणूस म्हणून स्वीकार व न बदलता येणाऱ्या परिस्थितीचा बिनशर्त स्वीकार आपला मानसिक त्रास कमी करू शकतो.
REBT याला विवेकशुद्ध विचार असे नाव देते. विवेकशुद्ध म्हणजे लवचिक, कोणताही कट्टरपणा टाळणारा, वास्तवावर आधारित, विज्ञाननिष्ठ व स्वत:चे हित व ध्येय जपणारा. लगेच मिळणारे सुख व काही विलंबानंतर मिळणाऱ्या सुखामधून लांब पल्ल्याने मिळणारे सुखच शक्य तोवर निवडावे. स्वत:चे हित हे बऱ्याच अंशी सामाजिक हितावर अवलंबून असते हे ओळखून डॉ. एलिस यांनी  responsible hedonis ही संकल्पना मांडली- म्हणजे स्वत:चे हित जपावे पण सामाजिक भान बाळगून. REBT
पद्धत शिकण्यास सोपी आहे व तिच्या अवलंबाने रोजच्या जीवनातील क्लेश बऱ्याच अंशी कमी करता येतात. मानसिक स्वास्थ्य जरी फक्त मनोक्लेश व मनोविकाररहित जीवन नसले तरी क्लेशरहित मनच उत्साही राहू शकते व अर्थपूर्ण जीवनाचा शोध घेऊ शकते. नाही का

No comments:

Post a Comment