चोर१- तुला सांगतो मित्रा आपली लय कडकी चाललेय.
चोर२- चिरकुट माणसांची पॉकेट मारणं सोड. पण तू ऐकत नाय. आपण बघ व्हीव्हीआयपी चोर आहोत.
चोर१- बरोबर आहे तुझं म्हणणं पण जनरल चोर असलं म्हणजे स्कोप खूप असतो. भरलेलं पाकिटं दिसलं की लागलीच मारलं.
चोर२- थिंक बिग यार. हल्ली भरलेल्या पाकिटात व्हीझिटिंग कार्र्डं असतात.
चोर१- तुझ्यासारखं व्हीव्हीआयपी चोर व्हायचं म्हणजे रोज पेपर वाचला पाहिजे, टी.व्ही.वरच्या न्यूज पाहायला हव्या. तू तर अधेमधे मंत्रालयात फेरफटका मारून येतोस. व्हीव्हीआयपींची चेहरेपट्टी करायची म्हणजे केवढी ही मेहनत. मग रेल्वे असो की पब्लिक मिटिंग बरोबर घुसून हात साफ करतोस.
चोर२- मेहनत हाय आणि नाव पण हाय. आता परवा सीएमच्या बायकोची पर्स ढापली. ४० कोरे गांधी अंदर केले. अरे हे काहीच नाही. जेथे ती पर्स मारली तेथेच माझ्या वडिलांनी नांदेडच्या एका माजी मुख्यमंत्र्यांचं पाकिट उडवलं होतं. आम्ही खानदानी व्हीव्हीआयपी चोर आहोत.
चोर१- छोट्या-मोठ्या माणसाचं पाकिट मारलं तर दोन कानाखाली खेचून सोडून देतात. एक दिवस अडचणीत येशील तेव्हा कळेल चोरा.
चोर२- छोड... छोड... अरे हीच तर खरी गंमत आहे. जेवढा मोठा व्हीआयपी तेवढी त्याचा खिसापाकिट खाली झाल्याची खबर दाबली जाते. आता सीएमच्या बायकोनं कुठं केली कंप्लेंट? पोलिस तपास कसला करणार?
चोर१- (चोर२ च्या खांद्यावर हात ठेवत) आता कसा आलास ताब्यात. मी इन्स्पेक्टर आ. बा. पाटील.
- चकोर
No comments:
Post a Comment