Total Pageviews

Friday, 15 July 2011

MUMBAI BLAST UPDATE IS GOVT FUNCTIONING

रांचीत बॉम्बस्फोट संशयिताला ताब्यात देण्यास नातेवाईकांचा नकार
मुंबई, दि. १५ (विशेष प्रतिनिधी) - १३ जुलैच्या बॉम्बस्फोटप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही, परंतु नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) देशभरात धाडी घालून अनेक संशयितांना ताब्यात घेतले आहे, रांची येथे घातलेल्या धाडीत मंजर इमामउद्दीन या तरुणाला एनआयएच्या ताब्यात देण्यास त्याच्या नातेवाईकांनी विरोध केल्याने रांचीत आज काहीसे वातावरण तंग झाले होते.मंजर इमामउद्दीन याच्या रांची येथल घरी धाड टाकली असता त्याचा भाऊ इसरल इमामउद्दीन याने मंजरला ताब्यात देण्यास विरोध केला. इसरल म्हणाला, मंजर हा गेल्या दोन वर्षांपासून परदेशात नोकरी करीत आहे. त्याचा कोणत्याही बॉम्बस्फोटात सहभाग नाही. जर तसे असेल तर आम्हीच त्याला ताब्यात देऊ असे ठणकावत मंजरला एनआयएच्या ताब्यात देण्यास नातेवाईकांनी नकार दिला. त्यामुळे एनआयएच्या पथकाला खाली हात परतावे लागले. एनआयएचे व्हीव्हीएस मूर्ती यांच्या मार्गदर्शनाखाली मंजरच्या घरी आज पहाटे छापा टाकण्यात आला होता.दनीश रियाज ऊर्फ सफी ऊर्फ अस्पाफ इक्बाल हा पूर्वीचासिमी’चा सक्रिय कार्यकर्ता आहे. त्याच्याही घरी धाड टाकली. एनआयएचा देशभरात धाडी घालून तपास सुरू असतानाच मुंबई क्राइम ब्रँच एटीएसनेही कंबर कसली आहे. मिळालेल्या पुराव्यावरून त्यांचाही सखोल तपास सुरू आहे, परंतु अद्याप एटीएस क्राइम ब्रँचच्या हाती काहीही लागलेले नाही अशी माहिती सूत्रांनी दिली.स्कूटरमुळे गूढ उकलेल?साखळी बॉम्बस्फोटांच्या ४८ तासांनंतर अखेर पोलिसांच्या हाती क्ल्यू सापडला आहे. झवेरी बाजार येथे बॉम्ब ठेवण्यासाठी वापरलेल्या ऍक्टिवा स्कूटरच्या मालकाचा शोध लागला असून यातूनच बॉम्बस्फोटाचे गूढ उकलेल, असा दावा तपास अधिकारी करीत आहेत.झवेरी बाजार येथे एका ऍक्टिव्हा स्कूटरवर छत्रीमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता. शक्तिशाली स्फोटामुळे स्कूटरचा फक्त सांगाडा उरला. नंबर प्लेट पण नष्ट झाली. पण चेसी नंबर मिळविण्यात पोलिसांना यश आले. या चेसी नंबरच्या आधारे तपास अधिकार्‍यांनी मालकाचा शोध लावला आहे. त्याच्या चौकशीतून स्फोटाचे धागेदोरे सापडतील, असे तपास अधिकार्‍यांनी म्हटले आहे. दरम्यान, ही स्कूटर एका व्यापार्‍याची असून त्याचा याच भागात व्यवसाय असल्याचे समजते. या व्यापार्‍याला चौकशीला बोलावणार असून त्यानंतरच सत्य काही ते समोर येईल, असेही काही अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. ऑपेरा हाऊस येथील बॉम्ब दोन मोटारसायकलच्या मध्ये ठेवण्यात आला होता. दोन्ही मोटारसायकलच्या मालकांची चौकशी सुरू आहे.स्फोट आरडीएक्सचा
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांसाठी आरडीएक्सचा वापर झाल्याचे उघड झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी अमोनियम नायट्रेटचा वापर झाल्याचे जाहीर केले होते. मात्र फॉरेन्सिक लॅबच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीनही ठिकाणी आरडीएक्सचाच स्फोट घडवून आणण्यात आला. मुंबईत आरडीएक्स आले कुठून याचा तपास पोलीस करीत आहेत.कसाब-अफजल गुरूच्या फाशीचे काय घेऊन बसलात!राजीव गांधींचे मारेकरी जिवंत आहेत
दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचे मारेकरीसुद्धा जिवंत आहेत, असे सांगत कॉंग्रेसचे प्रवक्ते शकील अहमद यांनी आज अजमल कसाब आणि अफजल गुरू या दोघा दहशतवाद्यांच्या फाशीचे तुम्ही काय घेऊन बसलात, असा सवाल येथे केला. मुंबईतील बॉम्बस्फोटांच्या पार्श्‍वभूमीवर त्या दोघांना फाशी कधी होणार, असा सवाल अहमद यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राजीव गांधी यांच्या मारेकर्‍यांना फाशी देण्यासाठी खुद्द कॉंग्रेसनेही पाठपुरावा केलेला नाही, असे शकील अहमद यांनी ऐकवले. यावेळी त्यांचा आविर्भाव हा कसाब-अफजल गुरू यांची फाशी विसरा असेच सुचवणारा होता
राष्ट्रवादीला
गृहखाते देऊन घोडचूक केली
मुंबई, १५ (प्रतिनिधी) - गृहखाते राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे सोपवणे ही घोडचूक होती. याबाबत फेरविचार करावा लागेल, असे सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. गृह, अर्थ नियोजन ही खाती मुख्यमंत्र्यांकडे नाहीत असे एकही आघाडी सरकार आपण पाहिलेले नाही, अशी टिपपणीही मुख्यमंत्र्यांनी केली.बुधवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमुळे मुंबईच्या सुरक्षा व्यवस्थेतला पोकळपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही टीकेच्या भडीमाराला सामोरे जावे लागत आहे. आपली बाजू मांडण्यासाठी, टीकेचा प्रतिवाद करण्यासाठी मुख्यमंत्री चव्हाण यांनी आज विविध वृत्तवाहिन्यांना विशेष मुलाखती दिल्या. पण ही सारवासारव करताना गृह, वित्त नियोजन ही खाती राष्ट्रवादीकडे सोपवण्याचा निर्णय चुकीचा होता, असे वक्तव्य एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.१९९९ मध्ये आघाडीचे सरकार स्थापन करताना खातेवाटपासाठी पूर्वीच्या शिवसेना-भाजपा युतीच्या खातेवाटपाचा फॉर्म्युला स्वीकारण्यात आला. त्यामुळे गृहखाते राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे गेले. ती मोठी चूक होती. त्याबाबत पुन्हा विचार करावा लागेल, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले. गृह, वित्त नियोजन खात्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असते. ही खाती मुख्यमंत्र्यांकडे नाहीत असे दुसरे कोणतेही आघाडी सरकार आपल्या ऐकिवात नाही, अशी टिपपणीही त्यांनी केली. मात्र त्याचवेळी हा काही फार मोठा मुद्दा नाही. दोन्ही पक्षांची संस्कृती एकच आहे, अशी सारवासारवही चव्हाण यांनी केली.महागाईप्रमाणे बॉम्बस्फोटांचे खापरही राष्ट्रवादीवर
केंद्रात कृषी अन्न नागरी पुरवठा खाते सांभाळणार्‍या शरद पवार यांच्यावर कॉंग्रेसने महागाईचे खापर फोडले होते. महागाईच्या मुद्यावर अडचण झाली की आघाडी सरकारात मर्यादा येतात असे सांगून शरद पवार यांच्याकडे याची जबाबदारी टोलवण्यात येत असे. पुढे पवार यांच्याकडील अन्न पुरवठा खाते काढून घेण्यात आले. तीच रणनीती अवलंबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बॉम्बस्फोटांमुळे होणार्‍या टीकेचा रोख राष्ट्रवादीकडे वळवण्याचा प्रयत्न केला आहे. गृहखाते राष्ट्रवादीकडे देणे ही घोडचूक होती या वक्तव्यामुळे आघाडीत वादंग होण्याची चिन्हे दिसत आहेत.मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची हवा
बॉम्बस्फोटांसाठी राष्ट्रवादीला दोष देणार्‍या पृथ्वीराज चव्हाण यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ केल्याची चर्चा होती. बॉम्बस्फोटांतील जखमींची विचारपूस करण्यासाठी आलेल्या कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे त्यांनी तसा प्रस्ताव ठेवला होता. मात्र सोनियांनी तो नाकारल्याचे सांगितले जाते. चव्हाण यांनी मात्र ही चर्चा फेटाळून लावली. आपण असा कोणताही प्रस्ताव ठेवला नव्हता असे त्यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांचे घूमजाव
राष्ट्रवादीकडे गृहखाते सोपवून मोठी घोडचूक केली, या वक्तव्यावरून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लगेच घूमजाव केले. असे आपण कुठेच बोललेलो नाही. गृहखात्याची जबाबदारी आर. आर. पाटील चांगल्या रितीने सांभाळत आहेत. मात्र काही वृत्तसंस्थांनी माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादीचे सर्व मंत्री सक्षमपणे काम करत आहेत आणि कॉंग्रेसबरोबर त्यांचे चांगले सहकार्य आहे’, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीशी पंगा घेण्याचे टाळले

No comments:

Post a Comment