आयएसआय एजंट फाय याच्या पैशातून झालेल्या परिषदांना दिलीप पाडगावकर, कुलदीप नय्यर आदींची हजेरी
पाकिस्तान व आयएसआय यांची बेकायदेशीरपणे पाठराखण केल्याबद्दल अटक करण्यात आलेला अमेरिकेतील काश्मिरी फुटीरतावादी सय्यद गुलाम नबी फाय याने आपल्या समर्थकांना पाठविलेल्या निधीचा काही वाटा काश्मीर प्रश्नावर आंतरराष्ट्रीय परिषदा आयोजिण्यात खर्ची पडल्याचे उघड झाले आहे. फाय याच्या पुढाकाराने झालेल्या या परिषदांना वक्ते म्हणून हजेरी लावलेल्या मान्यवरांमध्ये काश्मीरप्रश्नी केंद्र सरकारने नियुक्त केलेले संवादक दिलीप पाडगावकर, दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजेंद्र सच्चर, ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर आणि कार्यकर्ते गौतम नवलखा यांचा समावेश होता. काश्मीर प्रश्नावर भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांतील महत्त्वाच्या व्यक्तींच्या, तसेच मानवी हक्क चळवळीतील कार्यकर्त्यांच्या सहभागाने दरवर्षी परिषदेचे आयोजन करणारी व्यक्ती, अशी फाय याची भारतातील ओळख आहे. तथापि, त्याचा आयएसआयशी संबंध असल्याची कल्पना नव्हती, असे या परिषदांना उपस्थित राहिलेल्या बहुसंख्य मान्यवरांनी म्हटले आहे. फाय याच्या पुढाकारातून आतापर्यंत काश्मीर प्रश्नावर ११ परिषदा पार पडल्या आहेत. या परिषदांना जे भारतीय उपस्थित राहिले, त्या सर्वाना अमेरिकेच्या प्रवासासह सर्व खर्च देण्यात आला

No comments:
Post a Comment