- जी स्पेक्ट्रम घोटाळ्यात अपेक्षेप्रमाणे ए. राजा यांनी पंतप्रधानांना गोवलेच. आपण या प्रकरणातून वाचत नाही हे लक्षात आल्यानंतर पंतप्रधानांचे नाव घेणे हाच आपला बचाव आहे, हे राजा यांनी ओळखले. राजा यांनी टु जी स्पेक्ट्रमचा लिलाव करताना जे काही केले ते पंतप्रधानांच्या संमतीने केले की नाही याचा शोध तपास यंत्रणा करतीलच. पण सहकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराकडे दीर्घकाळ कानाडोळा केला की स्वच्छ माणसावरही कसे शेकू शकते हे राजा यांनी पंतप्रधानांचे नाव घेतल्याने स्पष्ट झाले आहे. केंदात काँग्रेसला पुरेसे बहुमत नसल्याने आघाडीचे राजकारण करावे लागले हे खरे, पण त्याचा अर्थ आघाडीतील पक्ष सत्तेचा वापर भ्रष्टाचारासाठी करू लागले तर त्याकडे कानाडोळा करावा असा नव्हे. पंतप्रधानांनी आपल्या सहकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला ठामपणे विरोध करणे आवश्यक होते. मनमोहन सिंग यांनी ते केले नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर ते अनेक विजय मिळवत असले तरी अंतर्गत कारभारावरून त्यांचे नियंत्रण सुटत गेले व त्याचा गैरफायदा केवळ युपीएतील पक्षांनीच नाही तर त्यांच्या पक्षातील काही मंत्र्यांनीही घेतला व मन:पूत भ्रष्टाचार केला. पंतप्रधानांनी त्यांच्या कारकीदीर्च्या पहिल्या टप्प्यात चांगला कारभार करूनही दुसऱ्या टप्प्यातील निष्क्रियतेमुळे त्यांच्या संपूर्ण कर्तृत्वावर पाणी पडले आहे. आता ए. राजा त्यांच्या जबानीचा वापर पंतप्रधान, गृहमंत्री यांच्याविरोधात राळ उठविण्यासाठी करतील. ते आणखी कुणाची नावे घेतात ते पाहावे लागेल. यातून राजा वाचतील की नाही हे सांगता येत नसले तरी त्यांना पाठीशी न घालणाऱ्यांविषयी संशयाचे वातावरण निर्माण करण्यात मात्र ते यशस्वी होतील. राजा यांचेच अनुकरण सीबीआयच्या चौकशीत अडकलेले अन्य मंत्री व राजकारणीही करतील. अशा परिस्थितीत पंतप्रधान, गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी करून विरोधक गोंधळ माजवतील. या सर्व गोंधळामुळे एकंदरच देशाची आथिर्क परिस्थिती, दहशतवाद, महागाई या सर्व प्रश्ानंची चर्चा मागे पडून फक्त राजकीय रस्सीखेच आणि आरोप-प्रत्यारोप सुरू होतील. मंत्र्यांच्या कारभारावर पंतप्रधानांनी वेळीच बारीक लक्ष ठेवले असते तर टु जी घोटाळ्याचे प्रकरण घडलेच नसते. आता भोगा आपल्या कर्माची फळे
No comments:
Post a Comment