Total Pageviews

Saturday, 25 June 2011

GOVT WILL ENSURE THAT ADARSHA BUILDING WILL DISAPPEAR TO PROTECT GUILTY

आदर्श'ची इमारतच बेपत्ता होणे बाकी सकाळ वृत्तसेवा मुंबई - "आदर्श'च्या भूखंडाशी संबंधित ब्रिटिशकालीन नकाशेही हरवल्याचे चौकशी आयोगासमोर उघड झाले. "आदर्श'शी संबंधित कागदपत्रे रेकॉर्ड हरवण्याची ही पाचवी वेळ असल्याने आता इमारत सोडून "आदर्श'शी संबंधित बरेच काही बेपत्ता झाल्याचे निष्पन्न झाले आहे.राज्यात राजकीय भूकंप घडविणाऱ्या, अशोक चव्हाण यांच्या मुख्यमंत्रिपदावर गंडांतर आणणाऱ्या आणि दोन माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक सनदी अधिकाऱ्यांभोवती चौकशीचा फास आवळणाऱ्या "आदर्श' प्रकरणाची नगरविकास खात्यातील फाईल आधी हरवली. नंतर केंद्रीय पर्यावरण मंत्रालयातील "आदर्श'ची फाईलही बेपत्ता झाली. मग या बेपत्ता प्रकरणात सेना दलाच्या फायलींचाही समावेश झाला. नगरविकास खात्याच्या ज्या संगणकावर आदर्शचा तपशील नोंदविला होता, त्याची "हार्ड डिस्क' गायब झाल्याचे आढळून आले आणि आता ब्रिटिशकालीन नकाशे, सर्व्हे शीट्‌सही हरवल्याचे उघड झाले आहे.
"
आदर्श गृहनिर्माण सोसायटी'च्या भूखंडाची 1847 पासून नेमकी काय स्थिती होती, हे दाखविणारे जुने नकाशे सर्व्हे शीट्‌स गायब झाल्याचे चौकशी आयोगासमोर उघड झाले आहे. आदर्श प्रकरणाची चौकशी करणाऱ्या द्विसदस्यीय न्यायालयीन आयोगासमोर शुक्रवारी "सिटी सर्व्हे अँड लॅंड रेकॉर्डस्‌'चे अधीक्षक संजय ढिकळे यांनी ही बाब उघड केली. शहरातील "लॅंड रेकॉर्ड' कार्यालयात हे ब्रिटिशकालीन जुने नकाशे होते. ते गायब झाल्याने आता अगदी पहिल्यापासून आदर्श भूखंड नेमका कोणाच्या ताब्यात होता याचा तपशील समजून घेणे कठीण झाले आहे. आयोगाचे वकील दिपेन मर्चंट यांच्या उलटतपासणीदरम्यान ढिकळे यांनी ही माहिती दिली. 1872 ते 1960 या कालावधीतील "आदर्श'चा भूखंड त्याभोवतीचे कुलाबा विभागातील नकाशे, तसेच सर्व्हे शीट्‌स ऑफिसात मिळत नाहीत, अशी कबुली त्यांनी दिली.
सर्वप्रथम 1874 मध्ये इंग्रजांच्या काळात मुंबईचे नकाशे शास्त्रशुद्ध प्रकारे बनविण्यात आले. त्यात कुलाबा विभागाचेही नकाशे होते. त्यानंतर 1882 मध्येही नकाशे बनविण्यात आले होते; मात्र हे नकाशे आता सापडत नसल्याचे ढिकळे यांनी सांगितले. त्यामुळे सध्या "आदर्श' इमारत उभी असलेला भूखंड तेव्हा कशा स्वरूपात होता त्याचे नकाशातील स्थान काय होते, तो भूखंड सेनादलाच्या ताब्यात होता की महसूल- वन विभागाच्या ताब्यात होता, याचा थांग लावणे कठीण बनले आहे. "आदर्श' त्याच्याभोवतीच्या जमिनीच्या 1872 ते 1960 या कालावधीतील सर्व्हे शीट्‌स आता सापडत नसल्याचे उघड झाले. 1872 मधील सर्व्हे शीट्‌स उपलब्ध आहेत, पण नंतरच्या गायब असल्याचेही ढिकळे यांनी निदर्शनास आणले.प्रतिक्रिया आजही इंग्लंड मध्ये त्या कागद पात्रांच्या प्रती नक्कीच मिळतील. इच्छा असेल तर चौकशी करा. असाच एक दिवस महाराष्ट्रच गायब होईल नकाशानबरोबर इंग्रजाना हि परत बोलवा संतोष said: या बातमीचा मथळा ही मागील एक-दोन दिवसात एका वाचकाने दिलेली प्रतिक्रिया आहे. त्या वाचकाला योग्य श्रेय द्या. दिस ईस पोलीतीकॅल पावओर/,,,,,??? कब तक परत परत गहाळ होणार्या वस्तूंमुळे दोषींना गुन्हा केल्याचे कबूल आहे हे ते स्वत: दाखवून देते आहे. एखादा घोटाळा कसा ओके करायचा याचे आदर्श उदाहरण या लोकांनी दाखवले आहे एकदम बरोबर बातमी आहे. आता फक्त आदर्श बिल्डिंग तेवढी गायब व्हायची राहिली आहे. सगळे अगदी राम भरोसे चालू आहे.
On 26/06/2011 05:21 AM prithviraaj chavan, Denver said:
On 26/06/2011 05:49 AM sanjay ranade said:
On 26/06/2011 06:47 AM arun said:
On 26/06/2011 07:00 ?? ayub khan said:
On 26/06/2011 08:13 AM
On 26/06/2011 08:29 AM atul said:
..................................
On 26/06/2011 09:06 AM mengal p. said:
gunhegar kon aahe va kiti motha aahe yacha vichar n karata tyala janmathep dyayala havi tarach lokancha kaydyavar vishwas basel.
On 26/06/2011 09:05 AM rajendra shirwale said:
On 26/06/2011 09:25 AM shirish said:

No comments:

Post a Comment