Total Pageviews

Friday, 24 June 2011

INDIA FIFTH LARGEST DRUG ADDICT IN THE WORLD

अंमली पदार्थांचा भारताला विळखा हेरॉईन व्यवसायात स्थानिक गुन्हेगारांच्या टोळ्या कार्यरत न्यूयॉर्क
मादक पदार्थांचे माहेरघर असणाऱ्या दक्षिण आशियाई बाजारात येणारा हेरॉईनचा सगळ्यात मोठा साठा भारतातील स्थानिक गुन्हेगारांच्या माध्यमातून येत असल्याची खळबळजनक माहिती संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालात नमूद करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ड्रग्ज अँड क्राइमतर्फे (यूएनओडीसी) 'र्वल्ड ड्रग रिपोर्ट २०११' हा अहवाल नुकताच प्रकाशित करण्यात आला.
२००९ मध्ये दक्षिण आशियात तब्बल . अब्ज डॉलरच्या हेरॉईनची उलाढाल झाली, त्यातील . अब्ज डॉलर किमतीचे हेरॉईन भारतातून येत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आशिया खंडात हेरॉईनचे सर्वाधिक उत्पादन चीन, पाकिस्तान, इराण आणि भारतात होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. जगभरात हेरॉईनला मोठी मागणी असून, या अंमली पदार्थाच्या विक्रीसाठी आणि वाहतुकीसाठी दक्षिण आशिया हे सवोर्त्तम ठिकाण आहे. एकूण उत्पादनाच्या पन्नास टक्के उत्पादन एकट्या भारतात विक्री करण्यात येते.
दक्षिण आशियाई बाजारात खरेदी करण्यात येणारे बहुसंख्य हेरॉईन भारतातच विकण्यात येते. मात्र, त्याच्या उच्च दर्जामुळे तस्करांकडून ते अफगणिस्तानात विकण्यावर भर दिला जातो. पूवीर् अफगणिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर हेरॉईनचे उत्पादन घेतले जायचे. मात्र, सध्या हेरॉईन लागवडीत म्यानमारने (ब्रम्हदेश) आघाडी घेतली असून, २००९ मध्ये एकूण उत्पादनात २० टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली. म्यानमारने अफू लागवडीतही आघाडी घेतली आहे. २००७ मध्ये एकूण जागतिक उत्पादनाच्या टक्के असणारी लागवड २०१० मध्ये १२ टक्क्यांवर पोहोचली होती.
यूएनओडीसी'च्या अहवालानुसार जगभरातील १५ ते ६४ वयोगटातील .४९ ते .७२ कोटी नागरिक अंमली पदार्थांचे सेवन करतात. २००९ मध्ये तब्बल .०३ कोटी नागरिक 'कॅनॅबिस' (हशिश) नावाच्या मादक पदार्थाच्या जाळ्यात अडकले होते. हशीशचे सर्वाधिक सेवन आणि विक्री होणाऱ्या देशांत मोरोक्को, अफगणिस्तान, लेबॅनॉन आणि नेपाळनंतर भारताचा क्रमांक लागतो. अंमली पदार्थांच्या यादीत नव्या पदार्थांची भर पडल्याने दिवसेंदिवस कोकेन, हेरॉईन आणि हशीशच्या मागणीत घट होत असल्याचे निरिक्षणही या अहवालात नोंदविण्यात आले आहे.

..........................................
आकडे बोलतात .४९ ते .७२ कोटी जगभरातील व्यसनाधीन
.०३ कोटी हशिशचे व्यसनाधीन १२ टक्के
म्यानमारचे अफू लागवडीचे प्रमाण . अब्ज डॉलर
२००९ मधील एकूण हेरॉईनची उलाढाल . अब्ज डॉलर हेरॉईनच्या व्यापारात भारताचा वाटा
'

No comments:

Post a Comment