bhutan shreelanka ahead of india
मोस्ट फेल्ड स्टेट्स'मध्ये पाकिस्तान, म्यानमार, बांगलादेशचा समावेश
पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार, भूतान हे भारताचे सख्खे शेजारी देश अपयशाचे धनी ठरले आहेत. 'फॉरिन पॉलिसी' या मॅगझिनने दरवर्षीप्रमाणे सर्वाधिक अपयशी साठ देशांची यादी नुकतीच जाहीर केली आहे. त्यामध्ये या देशांचा समावेश असून, यादीतील सर्वाधिक देश आफ्रिका खंडातील आहेत. गेली सलग चार वर्षे सोमालिया देश या यादीचा 'टॉपर' राहिला आहे.
' फंड फॉर पीस' या संस्थेतर्फे दर वर्षी ही यादी तयार केली जाते आणि 'फॉरिन पॉलिसी' या मॅगझिनमध्ये ती प्रकाशित होते. या देशांच्या परिस्थितीबाबतचा अहवालही त्यामध्ये प्रकाशित झाला आहे. या अहवालात प्रत्येक देशातील परिस्थितीविषयी भाष्य केले आहे. १७७ देशांचा अभ्यास करून ही यादी तयार करण्यात आली असून त्यात भारताचा क्रमांक ७६वा आहे. अमेरिकी मुत्सद्द्यांमध्ये पाकिस्तान हा देश गेली कित्येक वर्षे सर्वाधिक धोकादायक देश गणला गेला आहे. केवळ पाश्चिमात्यांसाठीच नव्हे, तर हा देश बऱ्याचदा स्वत:च्याच नागरिकांसाठीही धोकादायक असतो, असे अहवालात म्हटले आहे. बांगलादेशात पाचपैकी दोन नागरिक दारिद्र्यरेषेखाली राहतात. त्यामध्ये काही सुधारणा झाली, तरी पर्यावरणीय घटकांना त्यांना तोंड द्यावे लागणार आहे. समुदाच्या पाण्याच्या पातळीत एक मीटरने जरी वाढ झाली, तरी देशाचा १७ टक्के भाग पाण्याखाली जाईल, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिल्याची नोंद या अहवालात आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार, नेपाळ हा दक्षिण आशियातील सर्वांत गरीब देश आहे. सुरक्षा व्यवस्था पूर्ववत होईपर्यंत आणि शांतता प्रक्रिया सुरू होईपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही, असेही संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे. माओवादी त्यांचा संयम सोडण्याची शक्यता असून, अधिक मागण्यांसाठी लढाई करण्याची शक्यता असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
श्रीलंका सरकारने बंडखोरांना दिलेला अंतिम धक्का हा सामान्य नागरिक; तसेच अन्य दुर्बल घटकांवर आधारित आहे, असे इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुपच्या २०१०च्या अहवालात म्हटले असल्याचा उल्लेख या अहवालात आहे. सुमारे तीन लाख २७ हजार नागरिक या घटनेमुळे विस्थापित झाले आहेत. सिंहलींचा प्रभाव असलेले कोलंबोतील सरकार भूतकाळ विसरण्यास उत्सुक असल्याचे दिसत आहे. (वृत्तसंस्था)
भारताच्या शेजाऱ्यांचे 'रँक'
- पाकिस्तान - १२
- म्यानमार - १८
- बांगलादेश - २५
- नेपाळ - २७
- श्रीलंका - २९
- भूतान - ५० यादीतील टॉप (फ्लॉप) टेन
- सोमालिया
- चाड
- सुदान
- काँगो प्रजासत्ताक
- हैती
- झिंबाब्वे
- अफगाणिस्तान
- सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक
- इराक
- कोट डेलव्होर

No comments:
Post a Comment