Total Pageviews

Thursday 23 June 2011

LET US ALL LOOT PUBLIC MONEY MOTTO OF POLITICIANS GOVT SERVANTS

सारे सबूत स्वाहा Nasik(24-June-2011) Tags : Editorialराज्यात भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. कायदा- सुव्यवस्था पाळायला कोणी तयार नाही. दररोज नवनवीन प्रकरणे उघडकीस येताहेत. अगदी तलाठ्यापासून तर पुढार्‍यांपर्यंत देशाची लूट खुलेआम चालू आहे. कधीकधी शासकीय यंत्रणेला हाताशी धरूनआदर्शसारखे भ्रष्टाचाराचे उत्तुंग इमले बांधले जातात. यामध्ये पध्दतशीर साखळीच कार्यरत आहे. एकमेकांचे लागेबांधे असल्यामुळे भ्रष्टाचार उघड होणे करणे कठीण जाते



.सरकारी नोकर आणि राजकीय पेशातील पांढरपेशे यांच्यात होत असलेल्या तडजोडींमुळे भ्रष्टाचाराला ऊत आलाय. त्याला रोखणारी कुठलीही सक्षम यंत्रणा सध्यातरी अस्तित्वात नाही. त्यामुळे पन्नास-शंभर रुपयांपासून कोट्यवधी रुपयांची खाबूगिरी सर्रास चालू आहे. भ्रष्ट अधिकारी, सेवक आणि राजकारण्यांना आळा घालायला केलेले कायदेसुद्धा प्रभावी ठरतील याची काळजी घेऊनच तयार होत असतात, याबद्दल जनतेच्या मनात बिलकुल शंका नाही. कधीकाळी टोळ्या राज्य करीत होत्या म्हणतात, त्यात आणि कायद्याच्या राज्यात जनतेच्या लेखी काय फरक आहे?
.एखादे प्रकरण उघडकीस येते तेव्हा त्यातील चेहरे पाहिले की ते अगदी सालस मुखवट्याखाली हिंडत होते, हेही लक्षात येते.प्रशासनात नवीन आलेला अधिकारी लगेचच दिमतीला चारचाकी आलिशान वाहन ठेवतो, बंगला बांधतो. तीच तर्‍हा राजकारण्यांची. नव्याने नगरसेवक झालेल्या व्यक्तीचाही अगदी काही दिवसातच नूर पालटतो. भ्रष्टाचाराचे पुरावे हाती लागणे सोप नसते, त्यामुळे भ्रष्टाचारी समाजात खुलेआम वावरतात. एखादेवेळी प्रकरण उघड व्हायची वेळ आलीच तर नाचक्की टाळण्यासाठी एकमेकांवर खापर फोडले जाते. जनतेच्या सार्वजनिक पैशांचा दुुरुपयोग करणार्‍या या भ्रष्ट वर्गाची मानसिकता दिवसेंदिवस पुरेपूर निर्ढावली आहे.सरकारी कचेर्‍यांमधील महत्त्वाची कागदपत्रे पळविण्यापर्यंत मजल गाठली जाते. फायली कागदपत्रे बेपत्ता केली जातात. पोलीस ठाण्यातील बंदोबस्तातील कागदपत्रांनाही पाय फुटतात. ‘आदर्श प्रकरणात या प्रकारचे नवेआदर्श नोंदले गेले आहेत.धुळे महानगरपालिकेतइससे भी जादा पराक्रम संबंधितांनी घडवला आहे. चक्क रेकॉर्ड विभागालाच आग लावली गेली. ती तीन दिवस घुमसत राहील इतक्या दक्षतेने तो कार्यक्रम पार पडला. कोट्यवधी रुपयांची हेराफेरी करुन पुरावे नष्ट करण्यासाठी आता भ्रष्टाचारी कुठल्या थराला जाताहेत ते या घटनेवरून दिसते. धुळे महपालिकेत बनावट पावत्यांचा मामला गेल्या काही वर्षापासून गाजतो आहे. पण कोणीही त्यावर आवाज उठवायला तयार नाही.जेव्हा आयुक्तांंनी लेखापरीक्षणाचा मुद्दा हाती घेतला, तेव्हा भ्रष्टाचार्‍यांंचे पितळ उघडे पडण्याची वेळ आली. त्यापासून बचाव करण्यासाठी रेकॉर्ड विभागालाच आग लावून दिली गेली असावी, अशी शहरात सर्वत्र चर्चा आहे

No comments:

Post a Comment