Total Pageviews

Thursday 30 June 2011

18 children die in 48 hours in mamtaS wet bengal

कोलकात्यात राज्य सरकारतर्फे चालवण्यात येणा-या मुलांच्या हॉस्पिटलमध्ये गेल्या ४८ तासांत १८ नवजात बालकांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच लहानग्यांना जीव गमवावा लागल्याचा आरोप मृत बालकांचे नातेवाईक करत आहेत. त्याची गंभीर दखल घेऊन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत.

बी. सी. रॉय हॉस्पिटलमध्ये गेल्या ४८ तासांत १८ बालकांचा मृत्यू झाल्याचं हॉस्पिटलच्या प्रमुख मृणाल कांती चॅटर्जी यांनी मान्य केलं. राज्याच्या आरोग्य विभागानंही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. परंतु, या बालकांचा मृत्यू डॉक्टरांच्या चुकीमुळे किंवा निष्काळजी कारभारामुळे झाला नसल्याचं अधिक्षक डी. पाल यांनी स्पष्ट केलंय. काही अर्भकांची पूर्ण वाढ झाली नव्हती, तर काहींचं वजन जन्मावेळी अगदीच कमी होतं. काही बालकांना अगदी शेवटच्या क्षणी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं आणि अशावेळी डॉक्टरांच्या हातात खरोखरच फार काही नव्हतं, अशी बाजू त्यांनी मांडली.

परंतु, सरकारच्या वतीनं करण्यात आलेला हा दावा मृत बालकांच्या नातेवाईकांनी फेटाळून लावला आहे. डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळेच हा प्रकार झाल्याचा त्यांचा आरोप आहे. हॉस्पिटलच्या मुख्य इमारतीत घुसून त्यांनी तिथल्या व्यवस्थेचा जोरदार निषेध केला. काही निदर्शकांनी हॉस्पिटलसमोरचा रस्ताही रोखून धरला होता. परंतु, पोलिसांनी त्याला तिथून हुसकावून लावलं.

दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेऊन चौकशीचे आदेश दिलेत. हॉस्पिटलच्या बाहेरच्या दोन डॉक्टरांना घेऊन एक चौकशी समिती स्थापन केली जाईल आणि २४ तासांत ते आपला अहवाल सादर करतील, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यात हॉस्पिटलकडून निष्काळजीपणा झाल्याचं निदर्शनास आल्यास मोठा गहजब होण्याची शक्यता आहे

No comments:

Post a Comment