Total Pageviews

Friday, 24 June 2011

SACHINS FERARI ,HIS BUNGLOW & HIS FANS

सचिनचा बंगला बनला न्यारा...मटा ऑनलाइन वृत्त मुंबई लिहतात… :सचिन कडे खूप पैसा आहे , त्याला कडकी लागली असे होउच शकत नाही, दान धरम तो कधीही करत नाही, फेरारी विकून तो सर्वांची मन वळवित, आहे, घराकडे लक्ष केंद्रित होउ नये, म्हणून हा खटापिटा आहे, त्याचाही सम्पति ची चौकोशि झाली पाहिजे,
[24 Jun, 2011 | 1329 hrs IST]

mahesh,joshi,Horrible looking house...Architect must be really bad. After spending so much money, he finally got this ugly design?
लिहतात… :आपल्या कारकीर्दीत भारताला वर्ल्डकप मिळवून देण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर लवकरच सहकुटुंब सहपरिवार आपल्या ड्रीम होममध्ये प्रवेश करणार आहे. आपल्या नव्याको-या बंगल्यालाफिनिशिंग टचदेण्यात सध्या तो एकदम गढून गेलाय.
वर्ल्डकप आणि आयपीएलच्या धडाक्यानंतर सचिनने वेस्ट इंडिज दौ-यातून माघार घेतली. सध्या तो आपला पूर्ण वेळ परिवारासोबत व्यतीत करतोय. पण त्याहीपेक्षा एक मोठंमिशनत्यानं हाती घेतलंय. मुंबईतल्या पेरी क्रॉस रोडवर थाटलेला आपला टुमदार बंगला सजवण्यात तो व्यग्र आहे. अॅड शूट असो किंवा उद्घाटन सोहळा ; सचिननं सध्या सगळं बाजूला ठेवलंय. ‘ असावे घरकुल आपुले छान.. ’ असं गुणगुणत तो इंटिरिअर , फर्निचर या गोष्टींकडे लक्ष देतोय. आपल्या बॅटिंगइतकाच तो या बंगल्याच्या सजावटीबाबतही काटेकोर आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , सचिनच्या आलिशान बंगल्यातील इंटिरिअरचे काम पूर्ण झालंय. ते सचिनला हवं तसेच बनवण्यात आलंय. मात्र थोडंसं फर्निचरचं काम अजून बाकी आहे आणि ते संपलं की सचिनच्या घराचा पत्ता बदलेल. श्रद्धाळू सचिननं ११ जूनला पारंपरिक पद्धतीनं आपल्या नव्या घराची पूजा केली. आता त्याचा मित्र परिवार वाट बघतोय , ती नव्या बंगल्यातील पार्टीची...
सचिनच्या बंगल्यातील प्रत्येक वस्तूला स्वत:चं एक महत्व आहे. प्रत्येक वस्तू अगदी योग्य जागेत बसवण्यात आली आहे आणि या आठवडाभरात तेंडुलकर परिवार या बंगल्यात राहायला जाईल , असं सूत्रांकडून कळतं. नुकतीच या बंगल्याला भेट देऊन आलेल्या एका व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार , हा बंगला बाहेरून तीन मजली दिसत असला तरी मुळात तो पाच मजली आहे. सीआरझेड या क्षेत्रात येत असल्यानं त्याचा साधारण दीड मजला अंडरग्राऊंड आहे.
बंगल्याच्या तळभागात कार पार्किंग आणि सुरक्षा कर्मचा-यांची व्यवस्था आहे , तर त्याच्यावर स्वयंपाकघर आणि घरात काम करणा-या कर्मचारीवर्गाची राहण्याची सोय करण्यात आली आहे. सचिनच्या क्रिकेट विश्वातील अविस्मरणीय क्षणांचे साक्षीदार असलेल्या वस्तूंनी या मजल्याचं सुशोभिकरण करण्यात आलंय. यानंतरच्या दोन मजल्यावर सारा आणि अर्जूनची छानशी खोली आहे आणि सगळ्यात वरच्या म्हणजे पाचव्या मजल्यावर सचिन आणि अंजलीचा मुक्काम असेल.
सचिननं या बंगल्यासाठी ३९ कोटी रुपये मोजलेत आणि आर्किटेक्ट प्रकाश सप्रे यांच्याकडून काही बदलही करून घेतलेत. मुंबईत अनेक सेलिब्रेटींचे अनेक बंगले नेहमी आकर्षणाचा विषय राहिले आहेत. ‘ आपल्या सचिनचा बंगलाही असाच चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरेल , यात शंका नाही
सचिनची नवी गाडी 'फेरारी'हून भारी!आयला, सचिनने फेरारी विकली रे... खरं तर त्याची फेव्हरिट कार होती ती... मायकल शूमाकरकडून मिळालेली... काय झालं कुणास ठाऊक ? ... ‘ कडकीतर लागली नाही ना सचिनला ? ...
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मानाचीफेरारीगुजरातमधल्या एका व्यावसायिकाला विकल्याची बातमी झकळली आणि त्याचे चाहते चक्रावले. त्यांच्या डोक्यात प्रश्न, प्रश्न आणि प्रश्न नाचू लागले. पण, सचिनच्या तमाम चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. आपल्या सचिनलाकडकीवगैरे लागली नसून त्यानं फेरारीपेक्षाही भारी गाडी खरेदी केलेय. आता तो निस्सान जीटी-आर या लाल रंगाच्या चकाचक सुपरकारमधून सैर करणार आहे. ही कार नुकतीच त्याच्या ताफ्यात दाखल झालेय.

फेरारीवर सचिनचं जीवापाड प्रेम होतं. त्यामुळे ती कार विकण्याचा निर्णय घेणं त्याच्यासाठी खूपच त्रासदायक होतं. पण मुंबईच्या रस्त्यांवर फेरारीचा काय उपयोग ? म्हणूनच मग नाईलाजानं त्यानं ही कार विकली, असं सचिनच्या एका जवळच्या मित्रानं सांगितलं. तसंच, फेरारीमधून जेव्हा कधी सचिन बाहेर पडायचा, तेव्हा त्याला ओळखणं अगदी सोप्पं होतं. त्यामुळे त्यानं ही कार फारशी वापरलीच नाही आणि ती नुसती पडून राहण्यात काहीच अर्थ नव्हता, याकडेही त्यानं लक्ष वेधलं. आता नव्या सुपरकारच्या आगमनानं सचिन भलताच खुशीत असल्याचंही या मित्राकडून समजतं. बीएमडब्ल्यू सचिनला खूप आवडते. त्यामुळे आता त्याच्याकडे दोन बीएमडब्ल्यू आहेत, एक स्कोडा आहे आणि चौथी गाडी, निस्सान जीटी-आर त्याच्या दारापुढे थाटात उभी आहे.
साधारण १५ दिवसांपूर्वी सचिनच्या ला मेर या वांद्र्यातील घरासमोर लालेल्लाल निस्सान जीटी-आर अवतरली. या गाडीची किंमत ८७ हजार डॉलर्स, म्हणजे सुमारे चार कोटी रुपये असल्याचं समजतं. अद्ययावत तंत्रज्ञानानं सुसज्ज असलेल्या या कारचाडेमोदेण्यासाठी दुबईहून दोन उच्चपदस्थ इंजीनिअर्सही सचिनकडे येऊन गेले. सचिनच्या सर्व शंका, सूचना ऐकून, त्याचं निराकरण करूनच ते माघारी परतले. आता यामास्टरकारमधून लाँग ड्राइव्हवर जाण्यास मास्टर ब्लास्टर उत्सुक आहे. त्यामुळे आता सचिनची झलक पाहायची असेल तरनिस्सान जीटी-आरवर बारीक लक्ष ठेवा
फेरारीशी फारकत!तेंडुलकर याने आपली फेरारी ही मोटार विकली असल्याचे प्रसिद्ध झाले आणि रसिकांमध्ये एक चर्चा सुरू झाली.
क्रिकेट विश्वातील पितामह असे ज्यांना सार्थपणाने संबोधिले जाते, त्या डॉन ब्रॅडमन यांच्या २९ शतकांशी बरोबरी केल्याच्या निमित्ताने विक्रमवीर सचिन तेंडुलकर याला नऊ वर्षांपूवीर् फेरारी ही मोटार 'भेट' म्हणून देण्यात आली होती. आपल्या देशाच्या एका सुपुत्राचा असा आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा गौरव होत असल्याचा आनंद त्यावेळी साऱ्या भारतीयांना झाला होता. तसा आनंद होणे साहजिकच होते. आपल्या खेळाने सचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वर्तुळात जे नाव कमावले आणि जो दबदबा निर्माण केला, त्याचाच परिणाम त्याला फेरारी गाडी भेट म्हणून मिळण्यात झाला होता.
एकप्रकारे त्याच्या तोपर्यंतच्या वाटचालीला मिळालेली ती दाद होती. ती दाद सचिनला नसून आपल्यालाच मिळाली आहे, अशी भावना त्यावेळी त्याच्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाली. सुप्रसिद्ध क्रिकेटपटू आणि आता समालोचकाचे काम करणारा रवी शास्त्री याला १९८५ सालामध्ये ऑस्ट्रेलियातील स्पधेर्त 'चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन' असा पुरस्कार आणि ऑडी ही मोटार मिळाली, तेव्हाही समस्त भारतीयांना असाच आनंद झाला होता. त्या काळात रवी शास्त्री याने अवघ्या तरुणाईवरच एक गारुड केले होते. त्याचे चाहते मोठ्या संख्येने होते. आपल्याकडे असलेल्या मर्यादित कौशल्याचा अत्यंत परिणामकारक उपयोग करण्याच्या रवी शास्त्रीच्या अथक प्रयत्नशीलतेला मिळालेले ते यश होते.
आपल्या कारकीदीर्मध्ये त्याने आपल्यातील अष्टपैलुत्व वारंवार सिद्ध केले आणि १९८५ सालच्या त्या ऑस्ट्रेलियातील स्पधेर्त तर रवी शास्त्री हा भारतासाठी एक मोठाच आधार बनला होता. त्याच्या चौफेर कामगिरीमुळेच त्याला हा पुरस्कार मिळाला होता. असे पुरस्कार हे त्या त्या खेळाडूला उचित असा आत्मसन्मान तर मिळवून देतातच; परंतु समस्त देशवासीयांच्या मनातील आत्मविश्वास जागृत करण्यास मदत करतात.
प्रदीर्घ काळ परकीय राजवटीखाली राहिलेल्या आणि स्वातंत्र्यानंतरसुद्धा एक 'गरीब' देश अशी प्रतिमा असणाऱ्या राष्ट्रातील लोकांसाठी असा आत्मविश्वास मिळणे ही फार मोलाची गोष्ट असते. संपूर्ण देशातील वातावरणावर त्याचा सूक्ष्म का होईना, पण सुपरिणाम होत असतो. त्यामुळेच खेळाडूंना मिळणारे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे सन्मान आणि बक्षिसे यांना एक व्यापक परिमाण लाभत असते. असे परिमाण मिळवून देणारा बहुधा पहिला खेळाडू म्हणजे टेनिसपटू विजय अमृतराज. १९७३ ते १९७५ या काळात एटीपीच्या पहिल्या १६ मानांकनांत स्थान मिळविणाऱ्या या टेनिसपटूने आपल्या ऐन उमेदीच्या काळात अनेक नामवंतांना चकित केले होते. नवोदित बोर्ग याला त्याने जसे हरविले होते तसेच जॉन मॅकॅन्रो यालाही पाणी पाजण्याची किमया त्याने केली होती. १९७३ सालामध्ये त्याने अगोदर रॉड लेव्हर आणि नंतर जिमी कॉनर्स यांसारख्या ख्यातकीर्त खेळाडूंना नमवून 'व्हॉल्वो मास्टर्स' स्पर्धा जिंकली होती. या यशाबरोबरच त्याला त्यावेळी एक मोटार मिळाली होती. त्याच्या या पराक्रमाची दाद घेऊन त्या मोटारीवरील कर माफ करण्यात आले होते.
सचिन याला भेट म्हणून मिळालेल्या फेरारी मोटारीनंतर त्यावरील कर माफ करावा, म्हणून सचिन याने विनंती केली होती. त्यानंतर त्याबाबत थोडा वादंग होऊन त्याला करात सूट देण्यात आली होती. त्यानंतर फेरारी सचिनच्या ताफ्यात सामील झाली. त्याच्या मोटारीच्या ताफ्यांमध्ये फेरारी या मोटारीने एक आकर्षणाचे आणि अभिमानाचेही स्थान निर्माण केले होते. एका खेळाडूने आपल्या 'मनगटा'च्या जोरावर केलेली ती कमाई होती. तीच आता त्याने विकून टाकली आणि त्याच्या चाहत्यांमध्ये एक दबकी चर्चा सुरू झाली. अर्थात आपल्या मालकीच्या असलेल्या वस्तूचे काय करावयाचे याचा निर्णय घेण्याचा अधिकार हा सर्वस्वी त्या वस्तूच्या मालकाचा असतो. त्याप्रमाणेच फेरारी आपल्याकडेच ठेवायची की ती विकून टाकायची हे ठरविण्याचा अधिकारही सचिनकडेच आहे.
मात्र तरीही त्याच्या या कृत्याबाबत चर्चा झाली; कारण सचिनला भारतीय समाजमानसात एक आगळे स्थान आहे. त्याच्या सन्मानामध्ये स्वत:चा सन्मान बघणारे अनेक रसिक आहेत. त्याच्या यशाने सुखावून जाणारे हजारो क्रिकेटपेमी आहेत. त्या साऱ्यांना फेरारी ही सचिनकडे असणे, हेच गौरवास्पद, अभिमानास्पद वाटत होते. आपल्या चाहत्यांच्या या भावनांची सचिनला जाणीव असणारच. तरीही त्याने करमाफी मिळवलेली फेरारी विकली, याचे दु: त्याच्या रसिकांना झाले असले, तर ते समजण्यासारखे आहे.
एक मात्र खरे की अलौकिक प्रज्ञा आणि प्रतिभा असणाऱ्या व्यक्तींना सामान्यांच्या आयुष्यातील नियम लावून मोजता येत नाही. असे करणे म्हणजे त्या कर्तृत्ववानांच्या प्रज्ञा-प्रतिभेचाच अपमान असतो. सचिनसारख्या अलौकिक प्रतिभेच्या खेळाडूच्या या कृतीलाही म्हणूनच आपण समजून घेतले पाहिजे
सचिनला शिव्या घालणा-यांसाठी....सचिन तेंडुलकरला देव मानणारे जसे कोट्यवधी चाहते आहेत, त्याचप्रमाणे त्याला शिव्या घालणारांचीही नवी जमात जन्माला आलीय... दरदिवशी टीकेचे बाऊन्सर त्याच्यावर उसळतायत. त्यापैकी एकाही टीकेला सचिनने उत्तर दिलेले नाही. परंतु मटा ऑनलाइनचे वाचक मिलिंद कारेकर यांनी मात्र सचिनसाठी बॅट हातात घेतलीय...
................

सचिन हा काही लोकांसाठी देव आहे देव! मी देखील त्याला देव मानतो. पण फक्त मैदानावर. मैदानाबाहेर मी त्याच्याकडून कसलीच अपेक्षा ठेवत नाही. तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कसा वागतो हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आपण त्याच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करतो आणि स्वतःलाच त्रास करून घेतो. सचिनला शिव्या घालताना आपण नेहमी एक गोष्ट विसरतो की तो कधीच कायदा मोडत नाही. शाहरुख आणि अमिताभसारख्या नामवंत आणि श्रीमंत कलाकारांना आयकरात सवलत मिळते हे आपल्यापैकी किती जणांना या आधी ठाऊक होतं ? आपल्यापैकी किती जणं अशी आहेत की त्यांनी आतापर्यंत कधीच कर सवलतीसाठी खोट्या औषधाच्या किंवा घर भाड्याच्या पावत्या भरल्या नाहीत ? किराणा मालाच्या दुकानातून पावती पुस्तक आणून स्वतःच्या वडिलांच्या नावाने घरभाडे भरल्याची पावती बनवून HRA लाटणारे कमी आहेत ? हा खोटेपणा करून देशाचं नुकसान होत नाही ? मग आपण खोटेपणा करून देशाचं नुकसान केलं तर ते चालतं. पण सचिनने कायद्यात राहून जर स्वतःचा पैसा वाचवायचा प्रयत्न केला तर तो गुन्हा ठरतो काय ?
पैसा कमावणं जितकं कठीण असतं ना त्याही पेक्षा पैसा टिकवणं जास्त कठीण असतं. नुसता आपल्या जवळ पैसा आहे म्हणून तो कसाही उडवून चालत नाही तर त्याची कदरही असावी लागते. तर श्रीमंती टिकून राहते. आणि घरात लक्ष्मी नांदते. आपल्या देशातले बहुतेक कुटुंब गरीब आहेत कारण त्यांना मिळालेल्या पैशाचा विनियोग कसा करायचा हेच मुळात ठाऊक नाही. आज जर एका गरीब आणि श्रीमंत माणसाला प्रत्येकी दोन दोन हजार रुपये दिले तर श्रीमंत माणूस ते दोन हजार रुपये कुठे गुंतवले तर दोनाचे चार होतील ह्याचा विचार करेल. तर गरीब दोन हजारात कुठे टच स्क्रीन मोबाईल मिळतो का ते शोधत फिरेल. खोटं वाटतं तर तुमच्या आसपास बघा. ज्या लोकांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा आहे ना तीच लोकं थोडं वेळेच्या आधी घरून निघून बसने जाता टॅक्सी आणि रिक्षाने फिरताना दिसतील.
सचिनने FSI वाढवून मागितला तर काय बिघडलं ? कायद्यात बसत नाही का ते ? त्याने अनधिकृत बांधकाम करायला जागा मागितली होती का ? स्वतःच्याच जागेत FSI वाढायला कायदेशीररित्या परवानगी मागितली तर त्यात आपल्या पोटात शूळ कशाला उठायला हवा ? बेकायदेशीररित्या FSI वाढवून घेऊन मग पेनल्टी भरून ते बांधकाम कायदेशीर करून घेता येतं , पण तसं करता त्याने सरळ FSI वाढवायला परवानगी मागितली. हा त्याचा चांगुलपणा आपल्या लक्षात का येत नाही ?

फेरारी ३६० मॉडेनाह्या गाडीवर कस्टमने सूट दिल्यामुळे त्याच्यावर लोकांनी खूप चिखलफेक केली. चिखलफेक करणार्‍या लोकांना कदाचित गाडीची खरी किंमत आणि तिच्यावर किती कर भरावा लागणार होता ह्याची कल्पना नसेल. खरं तर ज्या देशासाठी आपण खेळून बक्षीस मिळवलं त्याच देशात ते बक्षीस घेऊन जाण्यासाठी इतका कर भरणं व्यवहारिक दृष्टीने नुकसानीचं होतं. मग त्यात दुसरा पर्याय असा राहतो की ती गाडी त्याने परस्पर विकायला हवी होती. पण ह्याने देशाच्या प्रतिष्ठेला डाग नसता का लागला ? सत्यसाईबाबांच्या बाबतीत देखील तेच म्हणेन. माझा स्वतःचा सत्यसाईबाबांवर विश्वास नाही. माझ्या फेस-बुकला पहाल तर मी स्वतः त्यांच्या बुवाबाजीचा व्हिडिओ अपलोड केला आहे. पण माझा विश्वास नाही म्हणून सचिनचा देखील विश्वास नसावा अशी अपेक्षा मी करीत नाही.
कुणाची कुणावर श्रद्धा असावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.
एका खेळाडूला मानसिकदृष्ट्या खंबीर असावेच लागते. आणि ते मनोबल त्याला सत्यसाईबाबांच्या दर्शनाने , उपदेशाने किंवा सल्ल्याने मिळत असेल तर त्यात काय वाईट आहे ? लहानपणी एका दिवाळी अंकात मी एक गोष्ट वाचली होती. ' सी. के. नायडूंची कॅप '. त्यातला नायक त्यांच्या कंपनीतल्या संघाचा मुख्य फलंदाज असतो. अचानक एकदा त्याचा बॅड-पॅच सुरु होतो. खेळाडू म्हणून नोकरीला लागला असल्यामुळे नोकरी जाते की काय अशी परिस्थिती निर्माण होते. अशावेळी त्याचे साहेब एक दिवस त्याला सी. के. नायडूंची त्यांच्या जवळ असलेली टोपी आणून देतात आणि पुढच्या सामन्यात ती टोपी घालून खेळायचा सल्ला देतात. ती टोपी घातल्यावर मानसिकदृष्ट्या त्याच्यामध्ये इतका फरक पडतो की , पुढच्याच सामन्यात तो शतक ठोकतो. अर्थात मी इथे खूप संक्षिप्तपणे गोष्ट सांगितली. खरी कथा मूळ लेखकाने खूप छान रंगवून लिहिली होती. कथेच्या शेवटी ते साहेब त्या नायकाला सांगतात की ती कॅप जी त्यांनी त्याला दिली होती ती त्यांच्याच मुलाची जुनी कॅप आहे. फक्त तुझे मनोबल वाढवण्यासाठी तुला मी ती सी. के. नायडूंच्या नावाने दिली होती. इथे कथा सांगायचं तात्पर्य हेच की सचिनच्या आयुष्यात जर नायकाच्या साहेबाचा रोल सत्यसाईबाबा करीत असतील तर आपल्याला अडचण कशाला यायला हवी ?
मुंबईत अमराठी लोकांना जेव्हा सचिनला शिव्या घालताना बघतो तेव्हा मी समजू शकतो. ते लोकं त्याला शिव्या घालत नसतात तर असा माणूस मराठी घरात का जन्माला घातलास ? म्हणून ते मनातून देवाला कोसत असतात. पण जेव्हा मराठी माणसालाच विचार करता त्याला शिव्या घालताना पाहतो तेव्हा वाईट वाटतं.
आम्हाला भ्रष्ट मुख्यमंत्री चालतो. लालू , कलमाडी , . राजा आणि कनीमोळी सारखे घोटाळेबाज आम्ही सहन करतो. स्वतःच्या मनमानीने कारभार करणारे आणि नवनवीन कायदे अमलात आणणारे गृहराज्यमंत्री आम्हाला चालतात. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने लाख लाख रुपयांच्या हंड्या बांधणारे नेते आम्हाला जास्त प्रिय. मग त्या चढाओढीत छोट्या मंडळातील कुणाचा अगदी जीव गेला तरी आम्हाला फिकीर नसते. ' पण सचिनने मात्र शॉवरखाली आंघोळ करता बादलीमध्ये पाणी घेऊन आंघोळ करा. ' असा जरुरीचा सल्ला दिला तरी आम्ही तो मनावर घेत नाही

Bharat,Mumbai,

No comments:

Post a Comment