INDIAN GOVT ALWAYS IS SCARED OF FACING THE CHINESE HEAD ON
चीनची घुसखोरी आणि भारताचे लोटांगण ऐक्य समूह Tuesday, June 28, 2011 AT 12:02 AM (IST)
Tags: vishesh lekh जम्मू-काश्मीरच्या लडाख आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर कम्युनिस्ट चीनच्या सैन्याच्या चिथावणीखोर कारवाया सात-त्याने सुरुच आहेत. भारताच्या लडाख सीमेत घुसखोरी करून चिनी सैन्याच्या तुकड्यांनी, भारतीय मेंढपाळांना हाकलून लावल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. चिनी सैनिक लडाखच्या ग्रामीण भागात घुसतात. मोठ्या दगडावर हा भाग आपलाच असल्याच्या खुणा रंगवतात. तिथल्या जनतेत दहशत निर्माण करतात. गेली वीस वर्षे चीन लडाखच्या भागात इंचा इंचाने आक्रमण करून जमिनीची हडपाहडपी करीत असल्याच्या तक्रारी अनेक वेळा संसदेतही झाल्या आहेत. पण प्रत्येक वेळी केंद्र सरकार असे काही घडले नसल्याचा निर्वाळा देत सारवा-सारव करते.
2010 मध्ये लडाखच्या डेमचोक भागातल्या ग्रामीण भागात पंतप्रधान रस्ते विकास योजने मार्फत रस्त्यांच्या सुरु असलेल्या बांधकामांना चीन सरकारने जोरदार हरकत घेतली. भारतीय सीमेतल्या रस्त्याच्या बांधकामाबाबत चीनने काही सांगायचे कारणही नाही. पण, केंद्र सरकार चीन सरकारपुढे लोटांगण घालून मोकळे झाले. संरक्षण आणि परराष्ट्र खात्याच्या आदेशाशिवाय रस्त्याची ही बांधकामे पुन्हा सुरु करू नयेत, असे आदेश केंद्र सरकारने लडाख स्वायत्त विकास मंडळाला दिले. तेव्हापासून ही रस्त्यांची कामे आणि प्रवाशांसाठी निवारा शेडची, प्राथमिक शाळा, दवाखान्यांची बांधकामे ठप्प झाली. मंडळाने राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे वारंवार अर्ज, विनंत्या करूनही काहीही उपयोग झालेला नाही. तिबेट आणि अरुणाचल प्रदेशच्या आपल्या सीमेत चीनने मात्र प्रचंड बांधकामे, बारमाही पक्क्या रस्त्यांची कामे जोरात सुरु ठेवली आहेत. आम्ही आमच्या प्रदेशात बांधकामे करणार, पण भारताने मात्र काहीच बांधकाम करायचे नाही, ही चीनची दादागिरी मोडून काढायला केंद्र सरकार तयार नाही. त्यामुळे लडाख आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळच्या खेड्यातील ग्रामीण जनतेचे मनोबलही खचले आहे. केंद्र सरकार चीनच्या या हस्त-क्षेपाला घाबरत असल्यामुळेच, चीनची दादागिरी आणि घुसखोरी वाढत चालल्याच्या सीमा भागा-तल्या जनतेच्या तक्रारी आहेत. संपूर्ण अरुणाचल प्रदेशवर चीन वारंवार दावा सांगतोच. पण, आता या राज्यात चिनी जनतेचीही घुसखोरी करायचे नवे डावपेच कम्युनिस्ट चीनने सुरु केले आहेत. अरुणाचल प्रदेशच्या सियॉंग जिल्ह्यातील पॅंगो या गावात एका महिलेसह चार चिनी नागरिकांना अलिकडेच अरुणाचल पोलिसांनी अटक केली. 1962 मधल्या युध्दात लडाखचा 25 हजार चौरस किलो मीटरचा बळकावलेला प्रदेश घशात घालून चीन आता संपूर्ण लडाखच गिळंकृत करायच्या दिशेने धूर्तपणे पावले टाकत असताना, केंद्र सरकार मात्र ढिम्म असावे, ही संतापजनक बाब होय.

No comments:
Post a Comment