वनवासी कल्याण आश्रम भारतामध्ये
आधी या समाजाला 'आदिवासी' म्हणणेच चूक आहे. कोण आधी कोण नंतर राहावयास आले, असा विचार केला तर मग शहरातीलही बरेचजण 'आदिवासी' होतील! म्हणूनच शहरवासी, ग्रामवासी ह्याप्रमाणे वनात राहणारे ते 'वनवासी'. त्यामुळे 'आदिवासी' या शब्दाऐवजी 'वनवासी' शब्दच आपण वापरला पाहिजे. जेव्हा या वनवासी बांधवांचा विकास होईल तेव्हा समग्र समाजाच्या विकासाचे स्वप्न पूर्णत्वाच्या जवळ जाईल, कारण हा समाज पोहोचायला खूप कठीण आहे आणि म्हणून अंतिम घटकांपैकी एक आहे.
वनवासी
अशाप्रकारचे
हळुहळू
शैक्षणिक
लाभार्थी
आर्थिकलाभार्थी
आरोग्यलाभार्थी
खेलकूद
श्रद्धा
एकूण
पूर्णवेळ प्रकल्प-वसतिगृहे - १९, प्राथमिक शाळा - २, माध्यमिक शाळा - २, बाल संस्कार केंद्रे - १२ - १,६०० विकास प्रकल्प-औद्योगिक शिक्षण केंद्र - २८, शेतकी प्रकल्प - ४, बचत गट - ५५८ - १६,००० प्रकल्प-साप्ताहिक आरोग्य केंद्रे - ४, दैनिक केंद्रे - १, आरोग्य रक्षक - ५८६ - ४,००,००० केंद्रे - १५ जागरण केंद्रे - ६० प्रकल्प १,१२३ कार्यकर्ते ८१ - ६५ पुरुष, १६ महिला. आश्रमाचे कार्यक्षेत्र वाढू लागले. समाजातील सज्जनशक्तीचे सहकार्य लाभू लागले. आणि वनवासी कल्याण आश्रमाने एका नव्या पहाटेची निश्चिती केली. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक, प्रचारक, व.क.आ चे कार्यकर्ते या सर्वांमुळे आज प्रचंड मोठ्या प्रमाणावर देशभरातील दुर्गम भागांमध्ये काम सुरु आहे. त्याचे संख्यात्मक विवरण पुढे दिले आहे. सद्यस्थितीत ३१५ हून अधिक जिल्ह्यांत , १०,००० हून अधिक ठिकाणी आश्रमाचे काम सुरु आहे. यात शेकडो पूर्णवेळ कार्यकर्ते समर्पित वृत्तीने काम करत आहेत. आजच्या घडीला महाराष्ट्रात पुढील प्रमाणे काम सुरु आहे- दुर्भाग्यपूर्ण मतपरिवर्तन सुरु असतानाच बाळासाहेब देशपांडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्णवेळ प्रचारक म्हणून मध्य प्रदेशात काम करत होते. त्यांना जो प्रदेश दिला होता त्यातील जशपूर या ठिकाणी अशी उपासना पद्धतीची चाललेली विक्री त्यांनी हेरली. या समस्येवर उपाय म्हणून त्यांनी वनवासी कल्याण आश्रम या संस्थेची स्थापना १९५२ साली केली. वनवासी बंधूंची उन्नती आणि त्यांची मूळ उपासनापद्धती टिकवून ठेवणे ही आव्हाने समोर ठेवून वनवासी कल्याण आश्रम कामाला लागली. या कामी त्यांना जशपूरच्या राष्ट्रीय दृष्टिकोण असलेल्या महाराजांचे फार सहकार्य झाले. हे निसर्गपूजक आहेत. वृक्ष, नाग, सूर्य, नदी ह्यांना ते देवता मानतात. त्यादृष्टीने ते पूर्णपणे हिंदूच आहेत. परंतु ’तुम्ही हिंदू आहात’ असं जाणीवपूर्वक सांगायला कोणी गेलं नव्हतं. जेव्हा ख्रिश्चन मिशनरी या देशात आले आणि आपले सावज शोधू लागले तेव्हा हे वनवासी त्यांच्या नजरेतून सुटले असते तरच नवल! त्यांनी वनवासी बांधवांना सुविधा देऊ केल्या व बदल्यात ख्रिश्चन मत त्यांच्यावर लादले. शहरी आणि ग्रामीण लोकसंख्येबरोबरच एक मोठा वर्ग आज गिरिकन्दरी राहतो आहे. वाहतूक व्यवस्था तर नाहीच परंतु मानवी जीवन सुसह्य बनविणार्या कोणत्याच यांत्रिक वस्तू नाहीत. प्राथमिक वैद्यकीय व्यवस्था, औषधे, कपडे यांचा अभाव आणि शिक्षण वगैरे तर दूरच. अशा आदिम अवस्थेत राहणारा हा वर्ग भारतात 'आदिवासी' म्हणून ओळखला जातो. गिरिशिखरी राहून कंदमुळं, फळं अशा गोष्टी खाऊन काबाडकष्ट करून उपजीविका चालविणारा आणि कधी बाह्य जगाशी संबंध आलाच तर बव्हंशी फसवला आणि नाडला जाणारा समाज!
No comments:
Post a Comment