Total Pageviews

Wednesday, 29 June 2011

buying mba mbbs degree

बोगस पदवी बाजार अत्यंत धोकादायक अहमदनगर (28-June-2011) Tags : Ahmednagar,Editorialउत्तर भारतात अनेक राज्यात सुळसुळाट झालेल्या विद्यापीठात पैसे भरले की परीक्षा देताही पदवी मिळत असल्याचे अनेक धक्कादायक प्रकार प्रसारमाध्यमांनी उघडकीस आणले आहेत. या बनावट पदव्यांच्या आधारे अनेकांनी शासकीय आणि खासगी नोकर्‍या लाटल्या आहेत. महाराष्ट्रातही अशाच घटना घडत आहेत. नुकताच नाशिक येथे असाच प्रकारे उघडकीस आला. शिक्षण क्षेत्राच्याा दृष्टीने ती गंभीर बाब आहे. त्याचबरोबर या बोगस पदव्यांमुळे भविष्यात अनेक गैरव्यवहार होण्याची शक्यता असून, ते रोखण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, मध्यप्रदेश यासह काही राज्यात मोठ्या प्रमाणात खासगी विद्यापीठे सुरू झाली असून त्याचे अमाप पीक रोखण्यात तेथील राज्य शासनांना अपयश आले आहे. शिक्षण प्रसार जागृती करण्यापेक्षा खासगी विद्यापीठांना मान्यता दिल्याने त्याचे तोटे या राज्यात बघायला मिळत आहेत. त्याचबरोबर परीक्षा देता पदव्यांचे विक्रीचे प्रकारदेखील वाढत चालल्याने जनतेची आणि शासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे शिक्षणाकडेच आता संशयाने पाहिले जाऊ लागले आहे. परंतु याचा परिणाम गुणवत्तेच्या स्पर्धेत धावणार्‍या विद्यार्थ्यांवर होऊ लागला आहे. पैशाने पदव्या, कोर्सचे प्रमाणपत्र विकत घेऊन त्याचा लाभ घेतला जाऊ लागल्याने खरोखर हुशार आणि गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रात जाण्यास अडसर ठरत आहे. हे चित्र धक्कादायक आणि गंभीर असून याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. उत्तर भारतात अशाप्रकारे होत असलेला शिक्षणाचा आणि पदव्यांचा बाजार आता महाराष्ट्रातही सुरू झाल्याचे प्रकार काही ठिकाणी उघडकीस आले असून त्याचे स्वरूप काहीसे वेगळे असले तरी हे चित्र गंभीर आहे. छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी राज्यात शिक्षणाची कवाडे खुली करून सर्वसामांन्यांना ज्ञानामृताचा लाभ घडविला. या महात्मांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या महान कार्यामुळे आज देशात महाराष्ट्र अग्रेसर आहे. त्यामुळे शिक्षणाचे पावित्र्य जपण्याचे काम शासन आणि खासगी शिक्षण संस्था चालकांकडून केले जात आहे. असे असतांनाही राज्यात काही महाविद्यालयात आणि विद्यापीठात गैरप्रकार होत असल्याचे गेल्या काही वर्षात उघड झाले असून त्यामुळेच की काय, खासगी शिक्षण संस्थांतदेखील आता गैरप्रकार सुरू झाल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. खासगी शिक्षण संस्थांवर शिक्षण विभागाचा अंकुश असला तरी काही संस्था या बाहेर राज्यातील असून त्याच गैरप्रकार करीत असल्याचे समोर येऊ लागले आहे. त्याचाच प्रत्यय नाशिककरांना गेल्या आठवड्यात आला आहे. राज्यात आणि देशात नाव असलेल्या एका संस्थेत परीक्षा देता एम. बी. . इतर पदव्या विकल्या जात असल्याच्या संशयावरून नाशिक येथील कॉलेजरोड भागातील या शिक्षण संस्थेच्या कार्यालयात घुसून . जितेंद्र आव्हाड फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. त्यामुळे एक गंभीर प्रकार समोर आला आहे. शिक्षणातील बाजाराला विरोध करण्यासाठी . आव्हाड फाऊंडेशच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी चालणारे गैरप्रकार रोकण्यासाठी थेट कार्यालयाची तोडफोड करून असे गैरप्रकार करणार्‍या अन्य खासगी शिक्षण संस्थांना इशारा दिला आहे. या शिक्षण संस्थेत परीक्षा देता हजारो रुपये घेऊन पदव्या विकल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर फाऊंडेशनचे जिल्हाध्यक्ष बाळा दराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी फाऊंडेशनच्या पदाधिकार्‍यांनी एका महिन्यात पदव्या कशा दिल्या जातात आणि विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याने त्याचे पैसे कोण परत करणार, असे प्रश्‍न उपस्थित केले आहेत. राहुल गायकवाड या विद्यार्थ्याने या बनावट प्रकाराबद्दल गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. या विद्यार्थ्याने हजारो रुपये भरल्यानंतर त्याला सांगण्यात आलेल्या पदवीचे प्रमाणपत्र वेळेत दिले नाही. तसेच तात्काळ पदवी प्रमाणपत्र उपलब्ध झाल्याने त्यांना बोनाफाईड प्रमाणपत्र देण्याची किमया या संस्थेतून झाली. त्यावरून येथील कथित गैरप्रकार समोर आला. . जितेंद्र आव्हाड फाऊंडेशनने उघडकीस आणलेल्या या गंभीर प्रकाराची दखल आता शिक्षण विभाग पुणे विद्यापीठाने घ्यायला हवी. एमबीए अभ्यासक्रमासाठी दोन वर्ष लागतात तसेच त्यासाठी शासनमान्य शिक्षण संस्थात सीईटी दिल्यानंतर गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. मात्र हे बंधन परराज्यात संलग्न असलेल्या शिक्षण संस्थांना नसल्याने हे गैरप्रकार होऊ लागल्याच्या चर्चेला या प्रकारातून दुजोरा मिळाला आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्वच विद्यापीठांसमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे त्याची गंभीर दखल शिक्षण विभागाने घ्यायलाच हवी. त्याचबरोबर भविष्यात असे प्रकार रोखण्याची जबाबदारी पोलीस दलावर आली आहे. या गंभीर प्रकरणात या संस्थेने अशाप्रकारे किती विद्यार्थ्यांना पदव्या विकल्या? ही संस्था किती वर्षापासून हे उद्योग करीत आहे? हे पदव्या विकत घेणारे विद्यार्थी कोणत्या ठिकाणी कामाला लागले आहेत, त्यांनी शासकीय विभागात नोकरी मिळविली आहे का? याचा सखोल तपास करायला हवा. हा तपास गांभीर्याने झाला तर भविष्यातील अशा प्रकारे शिक्षणचा बाजार मांडणार्‍या आणि पदव्या विकणार्‍या शिक्षण संस्थांना लगाम बसणार आहे. याबाबत ढिलाई दाखविली तर शिक्षण क्षेत्रातील या अपप्रवृत्तींना बळ देण्यासारखे होईल

No comments:

Post a Comment