Total Pageviews

Wednesday, 22 June 2011

UNSAFE RAIL JOURNY PUNISH GUILTY

धोकादायक रेल्वेप्रवास
डोंबिवलीकडे जाणारी शेवटची ट्रेनिघून गेल्यामुळे कल्याण स्टेशनवर एकट्या असलेल्या १७ वर्षांच्या मुलीने सोबतीसाठी आपल्या मित्राला बोलवून घेतले खरे पण त्याने ती सुरक्षित झाली असे मात्र झाले नाही.
तीन अज्ञात इसमांनी तिच्या मित्राला चाकू दाखवून तिला आडबाजूला नेत तिच्यावर बलात्कार केला. या घटनेने रेल्वे पोलिस हादरून जायला हवे होते. परंतु ती मुलगी रेल्वे स्टेशनच्या परिसरातच राहिली असती तर तिच्यावर बलात्कार झाला नसता, असे रेल्वे पोलिसांतफेर् कुणीतरी म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे. घटना घडली तेव्हा स्टेशनवर एकही रेल्वे पोलिस नव्हता, हे लक्षात घेतले तर हे विधान किती उद्दाम निलाजरेपणाचे आहे हे लक्षात येते. अशीच बेमुर्वतखोर वृत्ती नवी मुंबईतील जुईनगर रेल्वे स्टेशनमधील रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या (आरआरएफ) पोलिसाने एक तरुणी गेल्या रविवारी सकाळी विनयभंगाची तक्रार देण्यासाठी गेली असताना दाखवली. पहाटे सव्वा पाचच्या सुमारास पहिल्या वर्गाच्या महिलांसाठीच्या डब्यात ही तरुणी चढली असता एका इसमाने तिच्या शरीराशी झटापट केली. ही तक्रार नोंदवून घेण्याऐवजी, तुम्हाला लुटले गेले नाही वा बलात्काराचाही प्रयत्न झाला नाही तर मग तक्रार कशाला नोंदवता, असा उर्मट प्रश्न विचारत तिला वाटेला लावले.
अशा वृत्तीचे सगळेच पोलिस नाहीत हे खरे आहे, पण अशा अनुभवांमुळेच सर्वसामान्यांचे मनोधैर्य खच्ची होते आणि गुंडगिरीला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन मिळते. गेल्या काही दिवसांत रेल्वे पोलिसांच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांची मालिका पाहिली तर कधीकाळी अत्यंत सुरक्षित मानला गेलेला मुंबईतील रेल्वेप्रवास आता धोकादायक बनल्याचे चित्र गडद झाले आहे. दोन दिवसांपूवीर् ठाणे स्टेशनमध्ये शिरणाऱ्या लोकलमध्ये सापडलेला एका तरुणाचा गळफास लावलेला आणि चार दिवसांपूवीर् कळव्याच्या कारशेडमध्ये येणाऱ्या लोकलच्या डब्यात आढळलेला तरुणीचा मृतदेह या घटनाही ताज्या आहेत. याशिवाय लुटालुटीच्या, दगडफेकीच्या घटना तर रोजच घडत आहेत. त्यांना आळा घालण्याऐवजी अपुरा पोलिस फोर्स, नादुरुस्त सीसीटीव्ही अशा सबबी अजून किती काळ पुढे केल्या जाणार आहेत, याचे उत्तर आता गृह मंत्रालयानेच द्यायला हवे.

No comments:

Post a Comment