Total Pageviews

Tuesday, 5 July 2011

NASHIK SECURITY NOT POLICE JOB

पोलिसांच्या शोधात सचिन अहिरराव

 
नाशिकच्या सुरक्षिततेची जबाबदारी जनतेचीही आहे', असा सल्ला पोलिस आयुक्त विनोद लोखंडे यांनी दिला आहे. खरं तर त्यांना ही जबाबदारी जनतेची'' आहे, असं म्हणायचं असावं. कारण, नाशिकमधील एकंदर परिस्थिती पाहता इथे पोलिसांचं फार काही अस्तित्व उरलं आहे, असं वाटेनासं झालं आहे. मिश्रा यांची गच्छंती झाल्यानंतर त्यांच्या जागी लोखंडे पोलिस आयुक्त म्हणून रुजू झाले, त्यावेळी नाशिककरांच्या पल्लवीत झालेल्या आशा लोखंडे यांच्या गुन्हेगारांप्रती नरमाईच्या भूमिकेमुळे कोमेजू लागल्या आहेत.
साधारण वर्षभराच्या कालावधीत नाशिकमध्ये दिवसाकाठी दोन ते तीन चेनस्नॅचिंगच्या घटना घडत आहेत. तोतया पोलिसांनाही धुमाकूळ घातला आहे. गावगुंड आणि चौकाचौकांतल्या 'भाईं'नी सभ्यतेची ऐशीतैशी करून टाकली आहे. एकंदरितच नाशिकचं समाजजीवन गुन्हेगारी आणि भुरट्या चोरांनी गढूळून टाकलं आहे. या सगळ्यामुळे सर्वसामान्य माणूस आतून गांगरून गेला आहे. 'घराबाहेर पडलेला माणूस सुरक्षितपणे घरी परतेल, याची शाश्वती नाही', असं पूवीर् मुंबईसारख्या मोठ्या शहराबाबत म्हटलं जायचं. आता नाशिकही या धास्तीपासून फारसं लांब राहिलेलं नाही. अशा पार्श्वभूमीवर विनोद लोखंडे पोलिस आयुक्तपदावर आरुढ झाले. त्यामुळे त्यांच्याकडून नाशिककरांनी मोठी अपेक्षा बाळगली होती. पण, चार्ज घेतल्यानंतर लोखंडे यांनी त्यांच्याकडे जादूची कांडी नसल्याचे सांगून टाकत अपेक्षांचा फुगा फोडला.
कुठलाही अधिकारी एखाद्या नव्या ठिकाणी रुजू झाला की कामाचा झपाटा दाखवण्याची धडपड करत असतो. अर्थात हा स्वत:चा 'भाव' वाढवून घेण्याचा प्रयत्न असल्याचाच अनुभव अनेकदा येतो. पूर्वाश्रमीचे आयुक्त मिश्रा यांच्या अशाच आरंभशूरतेवर भाळून नाशिककर त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते. लोखंडे यांनी मात्र असं काही करता कामकाजाला सुरुवात केली. लोखंडे यांनी हारतुरे आणि सत्कार यांना फाटा देत नाशिकची पोलिस यंत्रणा समजून घेण्यास सुरुवात केली. सेवेमध्ये प्रदीर्घ काळ घालवल्यामुळे असेल कदाचित पण, लोखंडे यांनी दाखवलेली ही 'मॅच्युरिटी' त्यांच्याविषयी कुतूहल निर्माण करणारी ठरली. नाशिकमधील ढासळलेली कायदा-सुव्यवस्था ते सुधारतील अशी अपेक्षा लोकांना वाटू लागली.
लोखंडे यांची कार्यपद्धती वेगळी असावी. पण, ती काहीही असली तरी तिचा प्रभाव तातडीने दिसावा, अशी नाशिककरांची अपेक्षा आहे. प्रत्यक्षात तसा कसलाही अनुभव अद्याप तरी नाशिककरांना आलेला नाही. दोनच दिवसांपूवीर् नाशिकमध्ये एका नगरसेवकांच्या वडिलांकडून चोरट्यांनी भर रस्त्यावरून १२ लाख रुपयांची रोकड लूटून नेली. तर रविवारी एकाच दिवसात नाशिकमध्ये चेनस्नॅचिंगच्या चार घटना घडल्या. गाड्यांच्या चोऱ्या, रात्रीच्यावेळी गाड्यांची तोडफोड असे प्रकारही सुरूच आहेत. तोतया पोलिसांनीही गेल्या आठवड्यात चांगलाच 'हात मारला' आहे. त्यामुळे 'मिश्रा गेले आणि लोखंडे आले' याव्यतिरिक्त नाशिकमध्ये फारसा काही फरक पडलेला नाही, हेच दिसतं आहे. नव्या पोलिस आयुक्तांनी कारवाईचा अगदी धमाका जरी केला नाही तरी कुठे ना कुठे त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणं अपेक्षित होतं. त्यात ते सध्यातरी सपशेल अपयशी झाल्याचं चित्र आहे.
पुरेसं मनुष्यबळ नाही, साधनांची वानवा आहे अशा एक ना अनेक अडचणी पुढे करून पोलिसांचा नाकर्तेपणा झाकण्याच्या प्रयत्नांना आता लोक कंटाळले आहेत. जरब निर्माण करणं आणि ती टिकवणं पोलिसांना सहज शक्य आहे. मात्र, ही जरब सर्वसामान्यांसाठीच अधिक प्रमाणात वापरली जाते आणि गुंडापुंडांशी सलोखा राखण्यातच पोलिस धन्यता मानतात, असा सर्वसाधारण समज निर्माण झाला आहे. त्यामुळेच पोलिसांकडे दाद मागण्यासाठी जाण्याऐवजी लोक गुन्हेगारीचा अन्याय सहन करतात. नाशिकच्या चौकाचौकांत आणि रात्रीच्यावेळी ठिकठिकाणी लागणाऱ्या चायनीज आणि अंडाभूजीर्च्या गाड्यांवर जमणाऱ्या टोळक्यांच्या दहशतीखाली नाशिककर वावरत आहेत. यातल्या काही टोळक्यांतूनच सोनसाखळ्या ओरबाडणारे आणि भुरट्या चोऱ्या करणारे पैदा होतात. चौकाचौकांतल्या टोळक्या आणि गाड्यांना रात्री दहाच्या आत घरी पाठवणं, ही मिश्रा यांची कृती त्यांना लोकप्रिय करण्यातलं एक कारण होतं. अशा टोळक्यांचा आणि ठिकठिकाणी रात्रीच्या अंधारात 'ओपन टू स्काय बार' चालविणाऱ्या गाड्यांचा बंदोबस्त करणं, एवढं तरी लोखंडे यांना जमू शकतं. लोखंडे यांनी फक्त चेन स्नॅचिंगच्या प्रकारांना जरी आळा घातला तरी त्यांना नाशिककरांच्या लाख दुवा मिळतील, इतके लोक त्रासलेले आहेत.
नाशिकच्या अँटी करप्शन विभागाने आजवर कधी नव्हे इतक्या लाचखोरांना रंगेहात पकडून नवा उच्चांक स्थापन केला. या विभागात पूवीर्ही तेच कर्मचारी होते, फक्त त्याचं नेतृत्व करणारा हरिष बैजल यांच्यासारखा अधिकारी वेगळा होता. तोच न्याय नाशिकच्या पोलिस दलाला लागू होण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण, सामान्य नाशिककराला कुणाचाही आधार वाटेनासा झाला आहे. ज्यांनी यातून त्याची सुटका करायची ते सर्वच राजकीय पक्ष आपापल्या दावणीला गावगुंडांच्या टोळ्या बांधून आहेत

No comments:

Post a Comment