INDIAN GOVT KEEPS ON NEGOTIATING WHILE PAK TRAINS MORE TERRORISTS
पाकची १४ हजार दहशतवाद्यांची फौज
भारताशी लढण्यासाठी पाकिस्तानने १४ हजार दहशतवाद्यांची फौजच उभारली आहे. पाकिस्तानने गुप्तपणे युद्धाची तयारी सुरू केली असून, तो कधीही भारतावर हल्ला करू शकतो, असे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिले आहे.
पाकिस्तानात सक्रिय असलेल्या एका दहशतवाद्याच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे. या दहशतवाद्याने न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, या दहशतवाद्यांच्या मदतीनेच पाकिस्तान काश्मीरमध्ये आणि अफगाणिस्तानात अमेरिकेविरोधात लढत आहे. एकीकडे अमेरिका पाकिस्तानला दहशतवादविरोधी लढ्यातील भागीदार म्हणत असताना, पाकिस्तानचे खरे रंगच या मुलाखतीतून पुढे आले आहेत. पाकिस्तानने १२ ते १४ हजार दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांची प्रशिक्षण शिबिरे देशातील विविध शहरांमध्ये आहेत. त्यांना राखीव ठेवण्यात आले आहे. गरज भासेल तेव्हा भारताविरोधात त्यांचा वापर करण्याची पाकची योजना आहे, असेही या दहशतवाद्याने सांगितले.
* निवृत्त लष्करी अधिकारी दहशतवादी
पाकिस्तानी लष्करातील अधिकारी निवृत्त झाल्यानंतर या दहशतवादी संघटनांमध्ये प्रशिक्षण देण्याचे काम करतात, असा दावा या दहशतवाद्याने केला आहे. हे अधिकारी दहशतवाद्यांना युद्धतंत्र, गुप्त संदेशाची देवाणघेवाण आदी प्रशिक्षण देतात. लष्कर ए तैयबा, जैश ए मोहम्मद, हिज्बुल मुजाहिद्दीन अशा संघटना लष्कराच्या मदतीवरच चालतात. आणि त्यांची रणनीती लष्करच ठरवते, अशी माहितीही त्याने दिली आहे

No comments:
Post a Comment