Total Pageviews

Tuesday, 5 July 2011

DONT BE FOOLED BY PRIVATE EDUCATION INSTITUTIONS

महाराष्ट्रातील इंजिनीयरिंग कॉलेजांतील प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. विनाअनुदान तत्त्वावर चालणाऱ्या कॉलेजा
ंनीजाहिराती करून, आमच्याकडे सर्व फॅकल्टी वगैरे 'वर्ल्ड क्लास' आहे असे दावे करायला सुरुवात केली आहे. त्यातील भूलभुलय्या किती आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे, याचा उहापोह आवश्यक झाला आहे.

डॉ. प्र. ज. जोगळेकर
माजी प्राध्यापक, आयआयटी, दिल्ली

' वर्ल्ड क्लास' म्हणजे जागतिक स्तरावर इंजिनिअरिंग कॉलेजेसची किंवा संस्थांची क्रमवारी काय आहे आणि ती कशी लावली जाते याचा विचार करायला हवा. जगातील टॉपच्या शंभर इंजिनीयरिंग संस्थांची यादी अमेरिकेतील 'युएस न्यूज अॅण्ड र्वल्ड रिपोर्ट'ने सप्टेंबर २०१०मध्ये प्रसिद्ध केली होती. अपेक्षेप्रमाणे पहिल्या क्रमांकावर अमेरिकेतील एमआयटी म्हणजे मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी आणि स्टॅन्फोर्ड युनिव्हसिर्टी दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत भारतातील फक्त पाचच संस्था आहेत. त्यात आयआयटी मुंबई सगळ्यात वरती म्हणजे ४७ व्या क्रमांकावर आहे तर आयआयटी दिल्ली, कानपूर, मदास आणि खरगपूर अनुक्रमे ५२, ६३, ६८ आणि ९० क्रमांकावर आहेत. या व्यतिरिक्त भारतातील कुठल्याच सरकारी, अनुदानित किंवा स्वायत्त विनाअनुदानित शिक्षणसंस्थांचा या यादीत समावेश नाही.

वर दिलेल्या क्रमवारीचे निकष काय? आणि प्रत्येक निकषाला किती महत्त्व म्हणजे वेटेज दिलेले आहे? युएस न्यूज अॅण्ड र्वल्ड रिपोर्टने सवेर्क्षणासाठी पुढील निकष वापरले होते. (१) अॅकेडेमिक पीअर रिव्ह्यु: वेटेज ४० टक्के. यामध्ये प्रत्येक कॉलेजला किंवा संस्थेला इतर कॉलेजेस काय क्रमांक देतात हे बघितले जाते. सुमारे १५००० संस्थांची मते अजमावली होती. (२) सायटेशन्स पर फॅकल्टी मेंबर: वेटेज २० टक्के. एखाद्या संस्थेतील संशोधनाचा दर्जा काय आहे याचे मापन या निकषाने केले जाते. कुठलाही शोधनिबंध प्रसिद्ध झाल्यावर त्याचा संदर्भ (रेफरन्स) इतर संशोधक त्यांच्या शोधनिबंधामध्ये देतात. त्याला सायटेशन म्हणतात. संस्थेतील संशोधक व्यक्तींना प्रत्येकी सरासरी सायटेशन्स किती मिळाली, यावर हा निकष आधारित आहे. (३) फॅकल्टी टू स्टुडंट रेश्यो: वेटेज २० टक्के. ज्या संस्थेमध्ये हा रेश्यो अधिक असतो तेथे विद्यार्थ्यांना अधिक वैयक्तिक मार्गदर्शन मिळते. हा रेश्यो आंतरराष्ट्रीय स्तरावर १ फॅकल्टंी: ४ विद्याथीर् असा असावा, अशी अपेक्षा असते. पण भारतात हा रेश्यो १ फॅकल्टी: १० विद्याथीर् असा असला तरी चांगला मानला जातो. (४) एम्प्लॉयर रिव्ह्यु: वेटेज १० टक्के. संस्थेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या क्षेत्रात किती भाव आहे याचा हा निकष आहे. यासाठी ९४ देशांतील सुमारे ५००० एम्प्लॉयर्सची मते अजमावली गेली. (५) आंतरराष्ट्रीय मान्यता: वेटेज १० टक्के. कुठल्याही संस्थेत परदेशातील किती विद्याथीर् शिक्षण घेतात तसेच किती परदेशी प्राध्यापकांची नियुक्ती केलेली आहे, यावर हा निकष अवलंबून आहे.

इंग्रजीतील 'आऊटलूक' या साप्ताहिकाच्या २७ जून २०११च्या अंकात त्यांनी भारतातील इंजिनीयरिंग कॉलेजच्या सवेर्क्षणाचे निष्कर्ष दिले आहेत. भारतातील प्रथम ७५ क्रमांकांच्या कॉलेजेसची यादी त्यात आहे. पहिल्या सहा क्रमांकांवर अनुक्रमे आयआयटी खरगपूर, दिल्ली, मुंबई, कानपूर, मदास आणि रूडकी आहेत. सातव्या क्रमांकावर बनारस हिंदू युनिव्हसिर्टीची इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी (आयटीबीएचयू) आणि आठव्या क्रमांकावर पिलानीची बिट्स (बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड सायन्स) आहे. मदासच्या गिंडी कॉलेजचा क्रमांक १२वा, पुण्याच्या सीओईपीचा २४वा आणि मुंबईच्या व्हीजेटीआयचा ३४वा क्रमांक आहे.

ही यादी बनवण्यासाठी त्यांनी पुढील निकष वापरले होते. १) सिलेक्शन प्रोसेस: २२७ गुण, २) अॅकेडेमिक एक्सलन्स: २१४ गुण, ३) इंडस्ट्रीयल इंटरफेस: १७३ गुण, ४) इन्फ्रास्ट्रक्चर: २०६ गुण, ५) प्लेसमेंट: १८० गुण. एकूण गुण: १०००. प्रत्येक निकषामध्ये उपनिकषही दिले आहेत.

सवेर्क्षणाची पद्धत तपासून पाहिली असता काही शंका मनात जरूर येतात, पण पहिल्या २० जागांमधील संस्था त्याच आहेत. (त्यांचे क्रमांक थोडेफार वर खाली झाले असले तरी.) द्वितीय स्तरावरील संस्थांमध्ये झालेला बदल शिक्षणक्षेत्राला आशादायक आहे.

' अॅकेडेमिक एक्सलन्स' या निकषाला प्राधान्य दिल्यास मुंबई आयआयटीचा क्रमांक पहिला लागतो. त्यांना २१४ पैकी १९५ गुण आहेत. या उतरंडीमध्ये रुडकीला १८९ तर पुण्याच्या सीओईपीला १२५ आणि व्हीजेटीआयला ९६ गुण आहेत. अर्थातच एखाद्या शिक्षणसंस्थेला 'र्वल्ड क्लास' ठरवण्यासाठी तेथे संशोधन किती आणि काय दर्जाचे चालते हे बघणे आवश्यक आहे. एखाद्या संस्थेमधून किती शोधनिबंध मान्यताप्राप्त टेक्निकल जर्नल्समध्ये प्रसिद्ध झाले त्यावरून त्या संस्थेच्या संशोधनकार्याची ढोबळमानाने कल्पना करता येते. भारतातील इंजिनीयरिंग शिक्षणसंस्थां-विषयी असे मूल्यमापन करणारा अहवाल 'करंट सायन्स'च्या ऑगस्ट २००९च्या अंकात प्रसिद्ध झाला होता. मागील दहा वर्षांत खरगपूर, मुंबई, कानपूर, दिल्ली आणि मदास आयआयटींमधून प्रत्येकी सहा ते सात हजार शोधनिबंध प्रसिद्ध झाले होते. रुडकीमधून ३५०० तर पुण्याच्या सीओईपीमधून १५० आणि व्हीजेटीआयमधून फक्त ६१च शोधनिबंध प्रसिद्ध झाले होते. या निकषानुसार भारतात सीओईपीचा ५० वा तर व्हीजेटीआयचा ५९ वा क्रमांक लागला होता.

ऐटबाज इमारत बांधल्याने शैक्षणिक दर्जा वाढत नाही. तसेच पैसा खर्च करून आणि महागडी यंत्रसामुग्री विकत घेऊन प्रयोगशाळा सुसज्ज असल्याचा देखावा निर्माण करता येतो. पण प्रयोगशाळेत विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती जोपासली जाते की मागच्या वषीर्ची जर्नल्स कॉपी करून 'सबमिशन' उरकले जाते? परीक्षेच्या अभ्यासासाठी विद्याथीर् गाईडवजा नोटस्ची पुस्तके वाचतात की त्या विषयावरील जागतिक दर्जाची पुस्तके अभ्यासतात?

आयआयटी मुंबईच्या वेबसाइटवर त्यांच्या प्राध्यापकांची आणि त्यांनी केलेल्या संशोधनाची वगैरे माहिती उपलब्ध आहे. तशीच माहिती सर्व इंजिनीयरिंग कॉलेजेसनी आपल्या वेबसाइटवर दिल्यास त्यांचा दर्जा काय आहे ते विद्यार्थ्यांना समजेल आणि त्यांची फसवणूक टळेल

No comments:

Post a Comment