Total Pageviews

Tuesday, 5 July 2011

BOGUS COMPANIES SIPHON OFF 6400 CRORES

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई

बोगस कंपन्यांच्या माध्यमातून सुरु असलेल्या तब्बल ६५०० कोटी रुपयांच्या महाघोटाळ्याचा विक्रीकर खात्याने पर्दाफाश केला. विक्रीकर विभागाच्या भरारी पथकाने ३७ बोगस कंपन्यांवर धाडी टाकून हा घोटाळा उघडकीस आणला. या घोटाळ्यामुळे विक्रीकर आणि प्राप्तीकर खात्यांचा कोट्यवधींचा महसूल बुडाल्याचं स्पष्ट झालं आहे.
मुंबईत काल दिवसभर सुरु असलेल्या या धाडसत्रांची माहिती रात्री उशिरा जाहीर करण्यात आली.

धातू आणि हिरे व्यवसायाशी संबंधित "हवाला रॅकेट ' मार्फत हा घोटाळा झाला असल्याचा संशय विक्रीकर आयुक्त संजय भाटिया यांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी नरेश कांतिलाल शहा या हवाला ऑपरेटरला पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबईतील विरार , ग्रॅंट रोड , ऑपेरा हाऊस , चर्नी रोड , लोखंडवाला कॉम्प्लेक्‍स , काळबादेवी आदी ठिकाणी विक्रीकर खात्याच्या पथकांनी छापे टाकले. हवाला रॅकेटचा सूत्रधार असणा-या नरेश कांतिलाल शहाने ३७ बोगस कंपन्या स्थापन करून त्यांच्या माध्यमातून प्रथम धातूविषयक दलालीचे , त्यानंतर हिरे व्यवसायातील दलालीचे व्यवहार सुरू केले. बोगस कंपन्या स्थापन करून गैरव्यवहार केल्याची कबुली त्याने दिली आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शहाला अटक केली. हवाला रॅकेट चालवल्याबद्दल दोन वर्षे सक्तमजुरीच्या शिक्षेची तरतूद राज्य विक्रीकर किंवा व्हॅट कायद्यात आहे. अशी तरतूद केल्यानंतर अटक झालेला नरेश शहा हा पहिलाच हवाला ऑपरेटर ' आहे.

घोटाळ्यामधील तब्बल २० कोटी रुपयांची उलाढाल विक्रीकराशी संबंधित असून त्यातून एक कोटी ५० लाख रुपयांचा विक्रीकर मिळणे अपेक्षित आहे. या प्रकरणातील काही व्यवहार खंडणी स्वरूपाचे असण्याची शक्‍यताही भाटिया यांनी व्यक्त केली.

हा गैरव्यवहार विक्रीकर खात्याने उघडकीस आणला असला तरी सर्व व्यवहार फक्त विक्रीकर खात्याशी संबंधित नाहीत , त्यामुळे प्राप्तिकर खात्याकडूनही यासंदर्भात चौकशी सुरू असेल , असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. या हवाला रॅकेटबाबत प्राप्तिकर खात्याला अहवाल पाठविल्याचेही त्यांनी सांगितले. या रॅकेटमधून किती जणांना फायदा झाला ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

No comments:

Post a Comment