Total Pageviews

Saturday, 2 July 2011

BRIG HEMANT MAHAJAN ARTICLE NEXT WAR WITH CHINA ON BRAMHAPUTRA WATER

चीन आणि भारताची पुढची लढाई - ब्रह्मपुत्रेच्या पाण्यावरून
ब्रह्मपुत्र नदीवर भारत-चीन सीमेजवळच "ग्रेट बेंड' येथे चीनकडून बांधल्या जाणाऱ्या मोठा धरणाबाबत भारताने आक्षेप घेतले आहेत. हे धरण होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू आहेतच आणि ते झालेच तर चीनचा राजकीय पातळीवर कसा सामना करायचा याची व्यूहरचनासुद्धा केली जात आहे. हिमालयाशी संबंधित असलेले हे पाण्याचे वाद, या वादांच्या मुळाशी आहेत गंगा, ब"ह्मपुत्र, कोसी, गंडक या नद्या. या वादांचे भवितव्य काय आणि हिमालयातील नद्यांचे हे आव्हान आपल्याला पेलवणार का? पाण्यावरू न केवळ झगडे, वाद आणि संघषर्र्च होत राहून पुढील काळात परिस्थिती अधिकाधिक चिघळतच जाणार का?
ब"ह्मपुत्रा नदी ही चीन, भारत आणि बांगला देशामध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते. या नदीचा उगम तिबेटमध्ये
होतो. तिथे तिला यार लॉंग-सॅँग-पो म्हटले जाते आणि नदीची लांबी 1624 कि.मी. आहे. खळखळ वाहणाऱ्या पाण्याची ही नदी तिबेट चीनच्या दक्षिणेकडील नामची बर्वा, ग्याला पेलरी या डोंगरांच्या खोऱ्यात ग्रेट बेंड जागेपाशी भारताच्या दिशेने एकदम वळते. भारताच्या अरुणाचल प्रदेशात तिला सियांग नदी म्हणून ओळखले जाते. अरुणाचलमध्ये या सियांग नदीला सियोम, सुनान सिरी, लोहित, दिबांग या उपनद्या मिळतात व आसामच्या पठारावर पोहोचल्यावर नदीचा विस्तार मोठा होऊन तिला ब्रह्मपुत्रा हे नाव मिळाले आहे. भारतात नदीची लांबी 918 कि.मी. आहे. गे"ट बेंड खोऱ्यात चीनमध्ये छोटी-मोठी मिळून 20-25 धरणे बांधली जात आहेत. सध्याच्या माहितीप्रमाणे या धरणांचा उपयोग वीज निर्मितीसाठी होणार आहे. याचा परिणाम भारतात येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावर नक्कीच होईल व पाणी कमी प्रमाणात वाहील. याशिवाय पावसाळ्यात नदीच्या पाण्यात जास्त पाणी सोडल्यामुळे पूरसुद्धा येऊ शकतो. याउलट उन्हाळ्यात पाणी ओसरल्यामुळे आसाममधल्या शेतीवर विपरित परिणाम होईल व पाणी आटल्यामुळे नदीवरील जलवाहतूकही थंडावेल. याहीपेक्षा चीनची अजून एक छुपी योजना आहे. त्यानुसार तिबेटमध्ये पाण्याने भरभरून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी बोगदा बांधून दुष्काळी भागात फिरविण्यात येणार आहे. हा बोगदा 15 कि.मी. लांबीच्या राहील. ही छुपी योजना जर खरेच राबवली गेली तर आपल्या ब"ह्मपुत्रेचे पाणी पूर्णपणे आटून जाईल व अरुणाचल, आसामच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होईल.
जलसुरक्षेचे बिकट आव्हान
ब्रह्मपुत्र नदीवर भारत-चीन सीमेजवळच "ग्रेट बेंड' येथे चीनकडून बांधल्या जाणाऱ्या मोठा धरणाबाबत भारताने आक्षेप घेतले आहेत. हे धरण होऊ नये म्हणून प्रयत्न सुरू आहेतच आणि ते झालेच तर चीनचा राजकीय पातळीवर कसा सामना करायचा याची व्यूहरचनासुद्धा केली जात आहे.
हिमालयाशी संबंधित असलेले हे पाण्याचे वाद, या वादांच्या मुळाशी आहेत गंगा, ब्रह्मपुत्र, कोसी, गंडक या नद्या. या वादांचे भवितव्य काय आणि हिमालयातील नद्यांचे हे आव्हान आपल्याला पेलवणार का? पाण्यावरू न केवळ झगडे, वाद आणि संघषर्र्च होत राहून पुढील काळात परिस्थिती अधिकाधिक चिघळतच जाणार का? पुढचे महायुद्ध पाण्यावरू न भडकणार आणि पाणी हेच भविष्यातील संघर्षाचे प्रमुख कारण असल्याचे ठामपणे सांगितले जाते. आजच्या काळात तरी पाणी हे संघर्षाचे प्रमुख कारण ठरले आहे. बदलत्या काळात जगाच्या सर्वच भागांत जलसुरक्षेचे आव्हान बिकट होत आहे. अशा वेळी पाण्याची दुसरी बाजू- सामंजस्याची आणि सहकार्याची- लक्षात घेतली नाही तर या संकटातून मार्ग काढणे शक्य होणार नाही.
ब"ह्मपुत्रेचे खोरे चीन, भारत व बांगला देश या तीन देशांमध्ये विभागले आहे. शिवाय या नद्या हिमालयातील बर्फातून उगम पावणाऱ्या असल्याने त्यांच्यावर जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाच्या समस्येचा थेट परिणाम होतो. या आव्हानांची ओळख करू न घेतल्यावरच आपल्या प्रदेशातील पाण्याच्या नेमक्या समस्येचा अंदाज येईल.
हवामान बदल व हिमनद्यांचे भवितव्य
या नद्या हिमालयातील बर्फापासून म्हणजेच तेथील हिमनद्यांपासून उगम पावणाऱ्या आहेत. तसेच सर्व नद्यांना मोठ्या प्रमाणात पाणी मिळते ते हिमनद्यांमुळेच! विशेषत: पावसाळ्याशिवायच्या काळात या नद्यांना बर्फ वितळल्यामुळेच पाणी मिळते. ब"म्हपुत्रेचा वर्षातील 12.3 टक्के प्रवाह हा हिमालयातील बर्फावरच अवलंबून असतो. आता या नद्यांना पाणी पुरविणाऱ्या हिमनद्या आक"सू लागल्या आहेत. हवामान बदलाचा वेध घेणाऱ्या संघटनेच्या भाकितानुसार, हिमालयासार"या पर्वतांवरील हिमनद्या 2350 सालापर्यंत बऱ्यापैकी नष्ट झालेल्या असतील. असे घडलेच तर एकूण प्रवाहात 20 टक्के घट होईल आणि पावसाळ्यात मात्र या नदीला आतापेक्षा जास्त पूर येतील.
ब"ह्मापुत्रचे पाणी आणि चीनचा स्वार्थी विचार
तिबेटमधून उगम पावणाऱ्या ब"ह्मपुत्रा नदीचे पाणी भारतात शिरण्याच्या आधीच अडवून ते चीनच्या नैॠ त्य व पश्चिमेकडील दुष्काळी प्रदेशाकडे वळविण्याचा चीनचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा विचार आहे. चीनचे एक जलस्रोत तज्ज्ञ गुओ काई यांनी 1990 मध्ये चीनच्या कोरड्या पडत चालेल्या पीत नदीमध्ये (यलो रिव्हर) पाणी सोडण्यासाठी ब"ह्मपुत्रा नदी अडवून त्यातील 21 अब्ज घनमीटर पाणी वळविण्याची योजना मांडली होती. चीनचे आक"मक परराष्ट्र धोरण व आपल्या देशाच्या हिताला प्राधान्य देण्याची नीती लक्षात घेता, पाणी वळविण्याची ही योजना राबविण्यावर गेल्या दोन दशकांपासून विचार चालू आहे. चीनच्या या योजनेमुळे केवळ भारतच नाही तर आशिया खंडाच्या दक्षिण व पूर्व भागांतील सर्वच छोट्या देशांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. कारण तिबेट हे या भागाचे पाणलोट क्षेत्र आहे. तिबेटमधून दहा प्रमुख नद्या उगम पावतात. तिबेटमध्ये सुमारे 12000 घन किलोमीटर शुद्ध पाण्याचा साठा असावा असा अंदाज आहे. म्हणजे तिबेट ही जगातली सर्वात मोठी पाण्याची टाकी आहे, असेच म्हणावे लागेल. येथील पाणी 12 देशांमध्ये प्रवाहित होते व त्यावर आशियातील 85 टक्के किंवा जगातली 50 टक्के जनता आपली तहान भागविते.
येथल्या दहा नद्यांपैकी ब"ह्मपुत्रा, सिंधू, यांगत्झे आणि मेकॉंग या चार नद्यांचा मु"य प्रवाह तिबेटच्या पठारामध्ये आहे. याखेरीज सतलज, कर्नाली, अरुण, हुआँग हो (यलो रिव्हर), सालविन या नद्या तिबेटमधून उगम पावतात. भारताचा संबंध यातल्या ब"ह्मपुत्रा, सतलज, अरुण, कर्नाली व सिंधू या नद्यांशी येतो. या पाच नद्यांचे पाणी चीन नियंत्रित करू शकतो. अनेक देशांमधून वाहणाऱ्या नद्यांच्या पाण्याच्या वाटपासंबंधी ठोस असा कोणताही आंतरराष्ट्रीय कायदा नाही. त्यामुळे संबंधित देशांनी त्यावर समझोता करू न पाणी आपसात वाटून घेणे योग्य ठरते. भारताने असा करार पाकिस्तानशी सिंधू नदीच्या पाणी वाटपाबाबत केला आहे व तो दोन्ही देशांत तणावाचे संबंध असताना व अनेक युद्धे झाली असतानाही पाळला आहे. बांगला देशबरोबर गंगा नदीच्या पाणी वाटपाचा वाद आहे, पण शेख हसीना यांचे सरकार सत्तेवर आल्यानंतर दोन्ही देशात कोणताही करार नसतानाही भारताने कमी पाण्याच्या काळात बांगला देशची पाण्याची मागणी मान्य केली आहे.
पाच नद्यांबाबत चीनचे धोरण
चीनमधून भारतात येणाऱ्या पाच नद्यांबाबत भारताने वेळोेवेळी चीनकडून माहिती मागितली आहे. ही माहिती देणे सर्वस्वी चीनच्या मर्जीवर अवलंबून असते. सतलज नदी तिबेटमध्ये कैलाश पर्वताजवळील राकसताल तलावातून उगम पावते व शिपकी येथे हिमाचल प्रदेशात प्रवेश करते. काही वर्षांपूर्वी शिपकीच्या वरच्या तिबेटी प्रदेशात दरडी कोसळून सतलजचा प्रवाह अडला होता व तिबेटमध्ये मोठे तळे निर्माण झाले होते. प्रवाहातली दरड अचानक दूर झाली तर या तळ्यातले पाणी हिमाचलमध्ये घुसून हाहाकार माजण्याची शक्यता होती. तेव्हा चीन सरकारने भारताच्या विनंतीला मान देऊ न पाणी परिस्थितीची भारताला वेळोवेळी माहिती दिली होती, त्यामुळे मोठे संकट टळले होते. चीनने अशा प्रकारची माहिती सर्वच नद्यांबाबत द्यावी यासाठी दोन्ही देशांत समझोता व्हावा असा भारत सतत प्रयत्न करीत आहे, पण चीनने त्याला अद्यापपर्यंत तरी दाद दिलेली नाही.
ब"ह्मपुत्रेवर तिबेटमध्ये धरण बांधून पाणी वळविण्याच्या प्रयत्नाबाबत भारताने चीनकडे वेळोवेळी चौकशी केली आहे व माहितीही मागवली आहे. चीनने पाणी वळविण्याची योजना नसल्याचे सांगितले आहे, पण धरण बांधून त्यावर वीज केंद्र उभारण्यात येणार असल्याचे मान्य केले आहे. चीनने धरण बांधून वीज केंद्रे उभारण्यास भारताला हरकत घेता येणार नाही. फक्त प्रश्न हा आहे की, या धरणात चीन किती पाणी अडविणार तसेच खालच्या प्रवाहात किती व केव्हा पाणी सोडणार? कारण कमी पाण्याच्या काळात व जास्त पाण्याच्या काळात खालच्या पाण्याचे प्रमाण सारखेच व पुरेसे राहणे आवश्यक आहे. चीनने याबाबत ठोस असे काहीच सांगितलेले नाही. भारताने चीनबरोबर ब"ह्मपुत्रेच्या पाणीवाटपाचा समझोता करण्याचा आग"ह सतत धरलाच पाहिजे. एवढेच नाही तर सीमा प्रश्नाच्या चर्चेत नद्यांच्या पाण्याचा प्रश्न सतत उपस्थित करू न चीनवर दबाव ठेवला पाहिजे.
अशा प्रकारच्या संकटांना तोंड देत असताना साहजिकच पाणी मिळविण्याची स्पर्धा अधिक संघर्षमय बनणार. या बिघडलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सामंजस्य, सहकार्य आणि जास्तीच्या प्रयत्नांची आवश्यकता आहे. प्रामु"याने "शेअरिंग'वर व परस्पर सहकार्यावर भर देण्याची आवश्यकता आहे. सर्वच देशांना विविध व्यासपीठांतर्गत पाण्याबाबत माहिती, आकडेवारी व शास्त्रीय ज्ञानाची देवाणघेवाण करावी लागेल. सध्या याबाबत काही गोष्टी घडत आहेत. सार्क, तसेच भारत-चीन, चीन-बांगलादेश या देशांमध्ये काही प्रमाणात नद्यांच्या प्रवाहाबाबत माहिती व आकडेवारीची देवाणघेवाण होते.
चीनच्या भारतविरोधी कारवाया
चीन महासत्ता बनण्याकडे जसजशी वाटचाल करू लागला आहे, तसतशी त्याची मग"ुरी वाढू लागली आहे. चीनकडून उल्फा बंडखोरांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण, अर्थसाहाय्य दिले गेले. बांगला देशात झालेल्या धरपकडीनंतर ही बाब उजेडात आली. या सर्व गोष्टी भारताने चीनच्या विरोधात आंतरराष्ट्रीय समुदायापुढे मांडायला हव्यात. चीन आणि पाकिस्तान यांच्याकडून भारताच्या सुरक्षेला आव्हान देण्याचा प्रयत्न होत आहे.
भारताच्या सरहद्दीजवळ चीनने रस्ते बांधण्याची कामे हाती घेतली असून, क्वांघाय ते ल्हासापर्यंतचा लोहमार्ग नेपाळ आणि भारत-चीन सरहद्दीजवळील नथूला खिंडीनजीकच्या डोंगरापर्यंत विस्तारला जाणार आहे. भारताच्या सर्व शेजाऱ्यांशी मैत्री दृढ करण्यावर चीनचा भर आहे. शेजारी राष्ट्रांना आपलेसे करत चीन भारताला एकाकी पाडण्याच्या प्रयत्नात आहे. एकीकडे भारतासोबत व्यापार वाढवायचा, शांतताविषयक चर्चा करायची आणि दुसरीकडे वादग"स्त सीमाभागात लष्करी वा हवाईतळ निर्माण करायचा, क्षेपणास्त्रे तैनात करायची, लष्कराच्या जलद हालचालींसाठी रेल्वेमार्ग सीमेपर्यंत आणून भिडवायचे, भारताच्या अवतीभवती नवे नाविक तळ निर्माण करायचे- अशी चीनची रणनीती राहिली आहे

No comments:

Post a Comment