Total Pageviews

Wednesday, 6 July 2011

POLICE AUTROCITIES PUNE

आबा, पोलिसांना शिकवा 'वारा'ऐवजी वारी Wednesday, July 06, विशेष संपादकीय
आपल्या महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. (आबा) पाटील एकीकडे सत्तेला शहाणपण लाभावे, अध्यात्माचा स्पर्श लाभावा, नम्रता लाभावी, म्हणून वारकऱ्यांच्या दिंडीत सहभागी होऊन विठुरायाच्या चरणी भक्तिरसाने भरलेला आपला माथा टेकवत होते. संतांच्या पादुकांवर लीन होत होते आणि त्याच वेळी वर्दी घालून मस्ती करणारे काही पोलिस गरीब बिचाऱ्या वेटरच्या घरात घुसून त्याला धो-धो बडवत होते. बडवताना वीररस संचारावा म्हणून सोमरस ढोसून ते गेले होते. पुण्यातल्या हॉटेलात काम करणारे गरीब वेटर एका खोलीवर मुक्कामाला होते. अचानक हे सारे तळीरामाचे बंधू झालेले पोलिस तेथे घुसले, कोणताही गुन्हा नसताना खंडणीसाठी त्यांनी मारझोड सुरू केली. पंढरीच्या वारीला जेथे पाय फुटतात, त्या पुण्यनगरीतच हे घडले. वारीच्या पाऊलखुणा पुसट होण्यापूर्वीच घडले. आता आबांवर मोठी जबाबदारी आहे. वारीत जाऊन स्वतः मिळवलेले पुण्य या वर्दीवरही शिंपडण्याची वेळ आली आहे. मध्यंतरी वर्दीतली माणुसकी जागी राहावी, चार संवेदना आतमध्ये कुठे तरी खेळत राहाव्यात, म्हणून कुणी तरी विपश्‍यनेचा मार्ग सांगितला होता. तो वर्दीला महाग पडू नये, म्हणून पगारी रजांची सोय केली होती. डोळे बंद करून अंग आखडून घेण्याचा असाच कार्यक्रम झाला. चोर पकडताना चपळाई लाभावी म्हणून वाढलेले पोट कमी करून दाखवणाऱ्यांसाठी प्रोत्साहन भत्ता देण्याची स्कीम निघाली. पण, वर्दी भली मोठी बहाद्दर! ती कशालाच जुमानत नाही. ती दरोड्यात सापडली. बलात्कारात सापडली, नेम धरून माणसं टिपणाऱ्या बंदुकीत सापडली. कशात नाही सापडली ती? आता या वर्दीला कसे सुधारायचे आणि "वारा'कडून वारीच्या संस्कृतीत कसे न्यायचे, हा एक भला मोठा प्रश्‍न आहे. अंजनी, तासगावपासून ते उभ्या-आडव्या महाराष्ट्रापर्यंत सर्वांसमोर तो उभा आहे. दिंडीतल्या लांबलचक आणि वाकड्यातिकड्या घाटांप्रमाणे पुण्यातल्या पोलिसांनी निदान आपले आबा वारीतून बाहेर पडेपर्यंत तरी थांबायला हवे होते. निदान एकादशीचा शाकाहारी कालखंड संपायची वाट तरी बघायची होती. निदान खंडणी मागायला वर्दीशिवाय तरी जायला हवे होते. पण, तसे काहीच घडले नाही. विठुराया आता ही हिंसक वर्दी माणसाळावयाची कशी? पंढरीचा बुक्का लावून, की दे धक्का करून? कुणालाच काही समजत नाहीये.
पंढरीच्या वाटेवर विसावा घेण्याच्या झाडालाच लांब काटे फुटले आणि फांद्या वारकऱ्यांनाच मारझोड करू लागल्या तर काय होईल विठ्ठला? या वर्दीला वेगवेगळ्या विकारांचे काटे का फुटत आहेत आणि त्या का हल्ले करू लागल्या आहेत, याचे कोडे का सुटत नाही? अध्यात्माचा आदर करणारा, भावभक्तीची फुले गळ्यात मिरवणारा आणि आपल्या डोळ्यांत सत्तेलाच नव्हे, तर सत्य आणि सिद्धान्तालाही जागा करून देणारा नेता म्हणून लोक आबांकडे बघत असतात. पण, त्यांच्या सगुण-निर्गुण भावनांचा त्यांच्या या वर्दीसेनेवर कसा काय प्रभाव पडत नाही? खरे तर, अशा आगाऊ वर्दीला शे-दीडशे मैलाचे वारीचे अंतर चालण्याचीच तरतूद करायला हवी की काय, असे वाटू लागले आहे. पोलिस दलात कीर्तन-प्रवचनाचे सप्ताह चालू करावेत आणि बढतीच्या वेळी पगारवाढीबरोबरच टाळ-मृदंग भेट द्यावा की काय, याचाही विचार आबांनी आता करायला हवा. वर्दी फितूर होणे, वर्दी बेइमान होणे, गुन्हेगार पकडण्याऐवजी वर्दीने आपल्यातच गुन्हेगार निर्माण करणे, वर्दीने स्वतःची सावली असणाऱ्या समाजावरच हल्ला करणे हे कोणत्याही सूत्रात, तत्त्वात बसणारे नाही. वर्दी अंगात चढताच सेवाभक्ती येण्याऐवजी मस्ती का येते, हा मूलभूत प्रश्‍न आहे. मस्तीकडून सेवाभक्तीकडे असा प्रवास सुरू करायचा असेल तर आबांनी पंढरीच्या वाटेवरून आपल्या पदरात जे पुण्य आणले आहे ते आता वर्दीवर शिंपडावे. ज्या समाजात पोलिस पाहून माणसे थरथरतात, तो समाज म्हणजे कायदा सुव्यवस्थेचे एक विडंबन असते, असेही कुठल्या तरी फडकऱ्याने आबांना सांगितले असणारच

प्रतिक्रिया द्यानेश्वर, चोकामेला, नामदेव महाराज, आणि सर्व वारकरी संप्रदाय हे सगळे जात, धर्म, भाषा, याही पुढे गेलेले. bhagavat धर्म mahantat त्याचे सोज्वळ रूप अखंड महाराष्ट्राने गेली ४५० warsha जोपासलं. पण चांदुरकर तुमी नाही बदललात. तुमचं दुर्दैव बाकी काय ? बाकी लोकांना मात्र चांगला आणि वाईट या मधला फरक कळतो. हे श्री चांदुरकर कोण समाजाचे आहेत हे त्यांनी स्पष्ट करावे आणि मग बोलावे वारकारीबाबत वारी तून शिकण्यासारखे एकच कि आपला काम धंदा सोडून टिवल्या बावल्या करत कालापव्यय करावा. खरे तर आबांनी या वारीत जावून पोलिसांना जणू संदेशच दिला आहे कि आपण धर्मनिरपेक्षतेचा कितीही गाजावाजा करीत असलो तरी राज्य हे विशिष्ट धर्माचेच असते. शिवाय दर वर्षी वारीला जाणारे सर्वच परतल्यावर शुद्ध सात्विक जीवन जगतात असे नाही. पुन्हा, आता वारकरी सुद्धा आपल्या संघटनेचा राजकीय उपयोग कार्याला लागले आहेत हे सुद्धा पुण्याहूनच सुरु झालेले आहे. नितीन said: आताचीच बातमी आहे कि पोलिसांच्या आरेरावी मुळे माळशिरस येथील पालखीचा रिंगण सोहळा रद्द करावा लागला. पोलीसा खंडणीची मागणी करत असतील तर कुणाकडे मदत मागायची ? सतीश सोनवणे said: समस्त पोलीस दलावर मानसिक, शारीरिक, राजकीय दबाव आहे त्यात तो पिचून गेलेला आहे हे जरी सत्य असले तरीही "पुण्यातील दबंगगिरी" अजिबात समर्थनीय नाही. पोलीस दलात गुंड मनोवृत्तीचे, भ्रष्टाचारी, वर्दीचा फायदा घेणारे असतीलही तर त्यांचा प्रामाणिकपणे शोध घेण्याची जबाबदारी त्याच दलातील "प्रामाणिक पोलिसांचीच" आहे, त्यांनी आपल्या बंधूंना पाठीशी घालू नये..एव्हडे जरी केले तरी भरपूर मदत होईल पोलीसदलाचे नाव पुनश्च मोठे करण्यासाठी. अर्थात त्यांना स्वायतत्ता मिळणे गरजेचे आहे, त्यास राजकीय इच्छाशक्ती हवी. निर्ढावलेल्या राजकारण्यांना पैसा हाच विठोबा त्यामुळे सगळे पाणी पालथ्या घड्यावर असेच होईल जनतेने कायदा हातात घ्यावा अशी परिस्तिथी आहे झोपलेल्या जनतेला जाग करणे फार कठीण दिसते आहे असो शेवटी आहेच विठोबा विपश्यना, योग, प्रवचने यांचा वर्दीवर कांहीही परिणाम होणार नाही. सध्या खरे गुन्हेगार पकडणे, गुंड लोकांवर वचक ठेवणे याला कांही महत्व आहे असे वाटत नाही. पकडलेले लोक कार्यकर्ते निघण्याची शक्यता फार. त्यामुळे गुन्हेगार पकडून त्याला सोडून द्यावे लागण्याचीच शक्यता! त्यापेक्षा वर्दीचा उपयोग करण्याची खुमखुमी भागवणे आणि वरकमाईसाठी असे कोणालाही ज्यांचा पुळका येणार नाही असे लोक गाठणे फायद्याचे! शिवाय 'सेवा करण्यासाठी' मते मागणारे सेवा या शब्दाचा अर्थ मेवा असे करताना वर्दी जवळून बघत नाही काय? रक्षकच भक्षक झाल्यास काय करावे. गेल्या काही दिवसांत कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार अनेकवेळा उघडकीस आला आहे. केवळ माऊलीचरणी लीन होऊन सर्वांना नम्रता शिकवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा गृहमंत्र्यांनी चूक करणाऱ्या पोलिसांनाही केलेल्या चुकांची शिक्षा होते, याची जाणीव होईल असे काही करण्याची आवश्यकता आहे. खूप छान लेख, मला आवडला! संपूर्ण पोलीस खात्याचा पगार हा जनतेने भरलेल्या करातूनच होतो ही पोलिसांना जाणीव करून देणे आवशक आहे. जी आम जनता त्यांची अन्नदाता आहे तीचे रक्षण करण्या आइवजी तिचेच भक्षण चालले आहे. नैतिकता उरलीच नाही. ही कॉंग्रेस संकृती तर नाही ना?  
 
 
On 06/07/2011 02:11 PM pradip said:
On 06/07/2011 02:20 PM sandeep satoskar said:
On 06/07/2011 02:29 PM jay bhim said:
On 06/07/2011 02:44 PM Milind Jawale said:
On 06/07/2011 02:56 PM
On 06/07/2011 04:02 PM Shailesh said:
On 06/07/2011 04:12 PM
On 06/07/2011 04:27 PM Parantap Chandurkar said:
On 06/07/2011 07:43 PM vitthal said:
tukaram ,
On 06/07/2011 07:26 PM santosh patil said:
manya aahe ki polisani chuk keli pan tyasathi aabana jababdar dharne yogya nahi karan khari chuk aahe ti aaplya sarkhya samanya mansanchi. aapan chuk karto hafte deun aani mag aapanach oradto. aaba ji karyavahi kayachi ti kartilach pan polisankadun zalelya chukisathi tyana jababdar dharne chukiche aahe.
On 06/07/2011 06:39 PM Nitin said:

No comments:

Post a Comment