Total Pageviews

Monday 12 November 2018

सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली, पण त्यांना त्यामुळे सोडण्यात आले नव्हते.-tarun bharat

 माफीमागची कारणे स्वत: सावरकरांनी सांगितली आहेत. 
 
 
सुर्यावर कितीही वेळा थुंकले तरीही ती थुंकी थुंकणाऱ्याच्याच तोंडावर पडते,” ही मराठीतली म्हण काँग्रेस आणि तिचे शिर्षस्थ नेतृत्व असलेल्या राहुल गांधींना ठाऊक नसावीमोदी लाटेत वाहून गेलेल्या महाराष्ट्र काँग्रेसपैकी कुणीतरी जाऊन राहुल गांधींना या म्हणीचा अर्थ आणि सावरकरांचे योगदान समजावून सांगितले पाहिजे. सध्या राहुल गांधी जिथे जिथे जात आहेत, तिथे तिथे सावरकरांना अपमानित करण्याचे काम करीत आहेत. यांच्यापैकी एक असलेल्या मणिशंकर अय्यर यांनी अशाच सावरकरांच्या काव्यपंक्ती अंदमानच्या सेल्युलर जेलमधून काढून टाकल्या होत्यात्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या ठाकरी शैलीनुसार शिवाजी पार्कात मणिशंकर अय्यर यांचा पुतळा उभारून त्याला जोडे मारण्याचे आंदोलन केले होतेलोकांनीही उत्स्फूर्तपणे या आंदोलनाला चांगलाच प्रतिसाद देऊन पुतळारूपी मणिशंकर अय्यरना जोड्यांनी हाणले होतेमहाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेबांनी हे जे काही केलेते सावरकरप्रेमी आणि राष्ट्रभक्त नागरिक आजपर्यंत विसरू शकलेले नाहीतभरदिवसा पार पडलेल्या या कार्यक्रमाला लोकांनीही चांगलेच जोडे मारण्याचा आनंद लुटला होता.राहुल गांधींचे सध्या जे काही माकडचाळे चालू आहेतते पाहिले की या मंडळींना असलीच भाषा समजते, असे म्हणायला संधी आहे.कुणीतरी जरा पुढे येऊन राहुल गांधींचाही मणिशंकर पद्धतीने समाचार घेतला पाहिजे, असे आता वाटू लागले आहे. संघावर खोटा आरोप करून भिवंडी कोर्टाच्या वाऱ्याकरणाऱ्याराहुल गांधींना याबाबत धडा शिकविलाच पाहिजेछत्तीसगढला झालेल्या आपल्या सभेत राहुल गांधींनी सावरकरांंच्या माफीचा जुना मुद्दाच पुन्हा उकरून काढला. हैदराबादला ते गेले, तिथेही ते हेच तुणतुणे वाजवून परत आले. आता या दोन राज्यांच्या निवडणुका आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा परस्परांशी काय संबंध 
 
पंतप्रधानांनी छत्तीसगढला जे भाषण केलेत्याला उत्तर देताना हे बरळू जे काही बरळले आहेत, त्याला तोड नाही. पंतप्रधानांनी नक्षल्यांना समर्थन करणाऱ्याकाँग्रेस नेत्यांचा विषय काढलातर यावर हे महाशय म्हणतात की, “नक्षल्यांनी आमच्या नेत्यांच्या हत्या केल्या आहेत. तुम्ही आम्हाला शिकवू नका.” राहुल गांधींकडे थोडातरी शहाणपणा असता तर त्यांनी या विषयाला स्पर्शही केला नसताअसे विधान करून त्यांनी आपल्या तीन पिढ्यांच्या अपयशावरच प्रकाश टाकलातीन पिढ्या आणि पन्नास वर्षांहून अधिक काळ या ना त्या मार्गाने गांधी परिवाराने सत्तेचे सारे लाभ घेतले आहेत. गांधी परिवारच नव्हे, तर त्यांच्या जावयानेसुद्धा सत्तेचा सरंजामी डौल कुठलेही कर्तृत्व नसताना मिरवला आहेया नक्षल्यांच्या प्रारंभीच्या प्रश्नांच्या मुळाशी विकासाच्या अभावाचा मुद्दा होता. नंतर त्याची जागा हिंसा, दादागिरी आणि अपप्रचाराने घेतली. खंडणीखोरी, समांतर सरकार चालविण्याची प्रकरणे आता लोकांसमोर येत आहेतइतकी वर्षे सरकारी लाभांचे विनासायास लाभार्थी असलेल्या परिवाराच्या सदस्याने या विषयावर बोलावे यापेक्षा मोठा विनोद नाहीनैतिकतेच्या दृष्टीने ही जबाबदारी काँग्रेस पक्षाला व तिच्या या बालिश नेतृत्वाला नाकारता येणार नाही, पण समजून-उमजून वागले तर ते राहुल गांधी कसले? आपल्या सल्लागारांनी काढून दिलेल्या भाषणाच्या आधारावर बडबड करायची आणि मग निवडणुका संपल्या की, न केलेल्या श्रमांच्या परिहारासाठी गायब व्हायचे हाच त्यांचा शिरस्ता. सावरकरांवर आज ते जे आरोप करीत आहेत, त्याचे उत्तर यापूर्वी अनेक अभ्यासकांनी देऊन ठेवले आहे.सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली हे खरेचपण त्यामुळे त्यांची मुक्तता झाली यात काही तथ्य नाही. काही शिकाऊ पोपटांनी यावर टिवटिव करून झाली आहे. पण, तथ्यासाठी हा मुद्दा पुन्हा उलगडणे आवश्यक आहे. अंदमानमध्ये सुटकेसाठी अर्ज करणार्‍यांमध्ये एकटे सावरकर नव्हते. अन्य क्रांतिकारकांनीही असे अर्ज केले होते. त्यामागचे कारण राजकीय होते. इथे अडकून फारसे काही करता येणार नाही,याची सावरकरांना पूर्ण कल्पना होती म्हणून त्यांनी हे माफीनामे दिलेहा एवढाच भाग सावरकरांना बदनाम करण्यासाठी पुन्हा पुन्हा सांगितला जातो. १९१० ते १९२४ सालापर्यंत सावरकर अंदमानला होते. १९३७ साली सावरकरांची पूर्ण मुक्तता करण्यात आलीअंदमानमधून त्यांची सुटका झाली ती मुळात ब्रिटिशांना अंदमानला तुरुंग चालविणे शक्य नव्हते म्हणून. पण तिथून त्यांना रत्नागिरी, मुंबईतले डोंगरी, येरवडा आणि पुन्हा रत्नागिरीत डांबण्यात आलेच होते. या सगळ्या काळात मानसिक छळ काही सुटला नव्हता. हे सारे करीत असताना सावरकरांनी सशस्त्र क्रांतिकारकांना प्रेरणा देण्याचे काम सोडले नव्हते. बडी चव्हाण व हॉटसनवर गोळी झाडणारे वासुदेव बळवंत गोगटे काय सांगतात, हे डोळे उघडून पाहिले आणि वाचले की, सावरकरांचे क्रांतिकार्य लक्षात येतेपुन्हा त्यांनी केलेले विषमता दूर करण्याचे प्रयत्न कुणालाही नाकारता येत नाहीत. मात्र, या देशाला एक रोग आहे. आपण आज जे काही स्वातंत्र्य उपभोगतो त्यासाठी बलिदान करणाऱ्यांवर शिंतोडे उडविण्याची रीत इथे आहेडाव्या विचारांवर पोसलेल्यांना तर एका घराण्याच्या बलिदानाशिवाय काही दिसतच नाहीस्फुलिंगासारखे तेजस्वी क्रांतिकार्य असलेले सावरकारांसारखे महापुरुष त्यांना सहनच होत नाहीतमग कुणीतरी क्षुल्लक पत्रकार नाव कमावण्यासाठी या अपुऱ्याज्ञानाच्या आधारावर प्रसिद्धी मिळवून जातो. इतिहास म्हटला की मुघलांची गाणी गायली जातात. अर्थकारण म्हटले की,औरंगजेबाच्या काळातील आर्थिक सुबत्ता सांगितली जातेत्यापूर्वी खिल्जीने अगदी महाराष्ट्रात येऊन केलेली लूटही मग नजरेआड केली जाते. स्वातंत्र्यवीर सावरकर, छत्रपती शिवाजी, मराठ्यांचा इतिहास या सगळ्या गोष्टी इतिहासात शिकविल्या जात नाहीतहिंदुस्तानच्या वैभवाची साक्ष देणारी लेणी इथेच उभी असतात. उदाहरणे मात्र मुघलांचीच दिली जातात. बुद्धिवंत आणि काँग्रेसचे सत्ताधारी यांचा किती सुंदर मिलाफ. राहुल गांधी आज जे काही बरळत आहेत, ते याच अभद्र युतीचे परिणाम आहेत.
 

No comments:

Post a Comment