Total Pageviews

Monday 12 November 2018

वाघिणीच्या मृत्यूचे दुःख जास्त, की अदिवासींचे!-navshakti


ज्या अवनी वाघिणीने 13 जणांचा जीव घेतला त्या वाघिणीला गेली 2 वर्षांपासून वन खाते जेरबंद करण्याचा प्रयत्न करत होते. पांढरकवडा वन विभागात वाघांची 10च्या संख्यापेक्षा अधिक आहे. तेथील जंगलांची क्षमता संपली आहे. जंगलात काही नसल्याने ते बाहेर पडत आहेत. गेली 2 वर्षांत अवनीला विशेष पथकाने 5 वेळा ट्रँक्विलाइज करण्यात आले. पण ती शांत झाली नाही. वाघिणीच्या हल्ल्यात कोणताही व्यक्ती मारला जाऊ नये म्हणून विशेष पथकाने व वनअधिकार्‍यांनी तिच्या दिशेने ट्रँक्विलाइज डार्टने निशाणा साधला होता. परंतु, ती आणखीनच उत्तेजित झाली आणि पथकाच्या वाहनांवर झेपावली. त्यावेळी विशेष पथकाने स्वरक्षणार्थ तिच्यावर गोळी झाडली. त्यात तिचा मृत्यू झाला. ही वस्तूस्थिती असताना त्यावर होत असलेला वाद दुर्भाग्यपूर्ण असून यामध्ये केंद्रीय मंत्री मनेका गांधी आघाडीवर आहेत.
यापूर्वी यवतमाळ येथील पांढरकवडा वन विभागात अवनी या वाघिणीने दहशत माजवली. राळेगाव, केळापूर तालुक्यातील 70 आदीवासी बहूल खेड्यात सुमारे एक लाखांवर निष्पाप शेतकरी व आदीवासी सतत दहशतीखाली जगत होते. एक एक करीत या वाघिणीने 13 लोकांचा जीव घेतला. यामुळे या परीसरातील जनजीवन जवळ जवळ संपले होते. सतत होणारी उपासमारी व शेती व्यवसाय ठप्प झाला होता. वन खात्याच्या अधिकार्‍यांवर व महसूल अधिकार्‍यांवर प्रचंड असंतोष वाढला होता. अनेकवेळा आंदोलन हिंसक झाले. त्यांनतर वन अधिकार्‍यांनी गेल्या दोन वर्षांपासून अवनीला पकडण्यासाठीची मोहीम दिल्ली, मुंबई, पुण्यातील वन्यजीव कार्यकत्यांनी उच्च न्यायालयात वारंवार वनखात्याविरोधात जनहित याचिका दाखल करून बंद पाडली होती. भारतातील सर्व न्यायालयाने वनअधिकार्‍यांनी राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या (एनटीसीए) मार्गदर्शिकेनुसार निर्णय घेण्याचे आदेश दिले. त्याही आदेशाला वारंवार दिल्ली, मुंबई, पुण्यातील वन्यजीव कार्यकत्यांनी रोखण्याचा प्रयत्न सतत केला. 70 आदीवासी बहुल खेड्यात सुमारे एक लाखांवर असलेले अदिवासींचा जीव वाचवण्यासाठी मोहीम सुरू केली होती. यासाठी तीन मोठे पिंजरे, 500 वन कर्मचारी आणि खासगी कर्मचार्‍यांची फौज या ठिकाणी होती. वाघिणीचा शोध घेण्यासाठी पॅरामिटर आणि इटालियन कुत्रेही आणण्यात आले होते. असे असले तरीही या वाघिणीला पकडण्यात यश येत नव्हते. अखेर अवनीचा शोध तिने पथकावर हल्ला केल्यानंतर तिला संपवल्यानंतर बंद झाला.
सध्या पांढरकवडा वन विभागात वाघांची संख्या प्रत्येक वर्षी वाढतच आहे. जवळच्या टिप्पेश्वर अभयारण्यामध्ये यावर्षी 4 वाघिणी बाहेर आल्या आहेत. झरी, केळापूर, मारेगाव, वणी, राळेगाव येथे सध्या 9 वाघिणीचा आपल्या मुलांसह क्षेत्रासाठी लढा सुरू आहे. त्यातच चंद्रपूर जिल्हातून आलेल्या वाघिणीच्या वणी, कोळसा, खदानीच्या परीसरात हैदोस सुरू झाला आहे. यामुळे अवनी वाघिणीच्या मेल्याने हा वाद संपणारा नसुन या परीसरातील सुमारे 5 लाखावर ग्रामीण जनतेच्या जीविताचा प्रश्न उभा झाला आहे. यासाठी वन्यजीव कार्यकत्यांना आणि मनेका गांधींसारख्या नेत्यांना ‘एकात्मिक आदीवासी व शेतकरी वाचवा’ कार्यक्रम लागू करण्यासाठी चर्चा करावी लागेल.
दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी विनम्रपणे मनेका गांधी दिलेल्या प्रत्युत्तराचे आदिवासी भागातील कार्यकत्यार्र्ंनी जोरदारसमर्थन केले. दोन महिन्यांपूर्वी मनेका गांधीं यवतमाळला तथाकथित योग गुरूला भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी भारताच्या महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्र्यांनी वाघिणीच्या हल्ल्यात मृत झालेल्या महिलांच्या कुटुबांची, आदीवासी व शेतकर्‍यांची विचारपूस केली असती, तर वाद उपस्थित झाला नसता. आता हा वाद वन्यप्राणी प्रेमी नेहमीप्रमाणे या घटनेच्या विरोधात उच्च वा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत असल्याने राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या (एनटीसीए) चौकशी पूर्ण झाली नाही. इतके काय पोस्टमार्टम रीपोर्ट सुद्धा आलेला नसताना अवनीला बेशुद्ध करण्याऐवजी थेट ठार करण्यात आले, असे आरोप करणे चूकीचे आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बिर्ला आणि अंबानी यांच्या उद्योगांसाठीच अवनी वाघिणीची शिकार केल्याचा आरोप करणे चुकीचे आहे

No comments:

Post a Comment