Total Pageviews

Monday 26 November 2018

#coastalsecurity #India'spreparation#26th11 BRIG HEMAN MAHAJAN ON COASTAL SECURITY

२६/११ मुंबई हल्ल्यातील स्थानिक मदतनिसांना कधी पकडणार?
(शत्रूला पाठीशी घालणा-या पी. चिदंबरम यांच गंभीर गुन्हा)

मुंबईवरील २६/११/२००८ च्या भयानक दहशतवादी हल्ल्याला आता एक दशक पूर्ण होत आहे. ह्या भयानक हल्ल्यात १६६ लोक (हेमंत करकरे, अशोक कामटे, विजय साळसकर,तुकाराम ओंबळे इत्यादी पोलिस अधिकारी धरून)मृत्यूमुखी पडले आणि कमितकमी ३०८ लोक जखमी झाले. या हल्ल्यात तुकाराम ओंबळे यांच्या बलिदानामुळे फक्त अजमल कसाब हा एकमेव हल्लेखोर जीवंत सापडला.यामुळे कट पकिस्तानच्या मदतीने लष्कर-ए-तोयबाने रचला होता, हे सिद्ध झाले. हा हल्ला अत्यंत सुनियोजित आणि काळजीपूर्वक आखलेला एक कट होता. 
ताज हॉटेलमधील धुमश्चक्रीत दहशतवादी सर्वत्र एखाद्या महितगाराप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरे चुकवून फिरत होते. हॉटेल मॅनेजरच्या फ्लॅटमध्ये अगदी अचूक घुसून दहशतवाद्यांनी त्याला ठार मारले.दाही दहशतवाद्यांकडे भारतात-काही बंगलोर मध्ये बनवलेली ओळखपत्रे होती.
या हल्ल्यात स्थानिक मदतनिसांचा सहभाग नव्हता, असे तत्कालिन केंद्रीय गृहमंत्री चिदंबरम म्हणाले (इंडियन एक्स्प्रेस: १२-२-२००९) आणि त्यामुळे स्थानिक मदतनिसांना शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला नाही.परंतु स्थानिक मदतनिसांच्या सहभागाशिवय इतका योजनाबद्ध  हल्ला शक्य नाही, असे अनेक पोलिस अधिकारी म्हणतात. चिदंबरम यांच्या सूचनेपूर्वी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाचे जॉइंट पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी स्थानिक मदतनिसांची बरीच माहिती शोधून काढली होती. ते म्हणाले होते:फहिम अहमद अन्सारी (वय ३५ वर्षे) आणि सबाउद्दिन अहमद शब्बीर (ऊर्फ सबाउद्दिन सिद्दिकी शेख)नावाच्या लष्कर-ए-तोयबाच्या हस्तकांनी हल्ले करण्याच्या सर्व ठिकाणांचे नकाशे हल्ल्याच्या बरेच दिवस आधी पाकिस्तानमध्ये पाठवले होते(फ्री प्रेस-२७-२-२००९).त्यासाठी फहिम अन्सारी हा डिसेंबर २००७ ते जानेवारी २००८ या काळात साहिल पावसकर या नावाने गोरेगावमध्ये एक फ्लॅट भाडयाने घेऊन रहात होता. ह्या दोघांनी पुरवलेल्या नकाशांमुळेच दहशतवाद्यांना हव्या असलेल्या ठिकाणांवर अचूक हल्ले करणे सोपे गेले (२७-२-२००९-म.टा.).या दोघांनी ताज महाल हॉटेल, ट्रायड्रेंट हॉटेल इत्यादी १२ महत्वाच्या ठिकाणी टेहळणी केली होती. उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी फहीम अन्सारीला पकडल्यानंतर एटीएसच्या ताब्यात दिले. तो मोतिलाल नगर, गोरेगाव, मुंबई येथे रहात असे.देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर भयंकर मोठा हल्ला करण्याची लष्कर-ए-तोयबाची तयारी चालू आहे, असे अन्सारीने सांगितले. तो पकिस्तानमधील मुझफराबाद येथील प्रशिक्षण केंद्रात ६ महिने होता(६-१२-२००८-टाइम्स).फहिम अन्सारी आणि सबाहुद्दीन सिद्दिकी शेख ह्या दोघांना पोलिसांनी पकडलेही.परंतु पुरेशा पुराव्या अभावी न्यायालयाने त्यांना सोडून दिले.
याबाबत प्रश्न असा निर्माण होतो की, पुरेसा पुरावा पोलिसांनी का मिळवला नाही? अथवा तो न्यायालयापुढे नीट का सादर केला नाही? फहिम अन्सारी आणि सबाउद्दिन सिद्दिकी शेख यांच्या मुक्ततेमुळे, " या हल्ल्यात स्थानिकांचा सहभाग नव्हता असे आपल्याला वाटते कय?" असा प्रश्न टाइम्स (५ ऑक्टोबर २०१०) ने विचारताच अनेकांनी संतापून त्याला नकारार्थी उत्तर दिले. उषा नावाची एक महिला म्हणाली," न्यायालयाच्या या निर्णायाला आव्हान दिले पाहिजे, आणि आणखी तपास केला पाहिजे". भगवान थडाणी म्हणाले, "पुराव्याच्या अभावी सुटका, म्हणजे आपले पोलिस किती भ्रष्ट आणि नालायक-अकार्यक्षम आहेत, तेच दाखविते. हे आपल्या देशाला लाजिरवाणे आणि देशाची प्रतिमा मलिन करणारे आहे". लष्कर-ए-तोयबाचे सभासद असणे, पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेणे, बनावट ड्रायव्हिंग लयसेन्स बाळगणे हा पुरेसा पुरावा नाही; मात्र चार वर्षापूर्वी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी विकलेल्या मोटरसायकलवर मालेगाव २००८ बॉंबस्फोट झाला, हे एकच कारण त्यांना ८ वर्षे जामीन नाकारण्यास पुरेसा पुरावा ठरू शकतो, हे कसे? ही आपल्या न्यायव्यवस्थेची चेष्टा नाही काय? साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर या महिला असूनही त्यांच्यावर त्यांच्या इच्छेविरुद्ध चार वेळा नार्को आणि ब्रेन मॅपिंग टेस्टस करण्यात आल्या; तशा टेस्ट्स वरील संशयितांवर का करण्यात आल्या नाहित?
हल्ल्यात हुतात्मा झालेल्या हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे विचारतात,"हल्ल्यात सहभागी असलेला कसाब पाकिस्तानी होता, म्हणून त्याला फाशी दिले, पण स्थानिक अतिरेक्यांना का पकडले नाही?". स्थानिक मदतनिसांच्या सहकार्याशिवाय असा नियोजनबद्ध हल्ला शक्य नाही, असे नरेंद्र मोदीही म्हणाले. परंतु चिदंबरम यांनी त्यांचे म्हणणे खोडून काढले(इंडियन एक्स्प्रेस:१२-२-२००९) आणि या मदतनिसांना मोकळे सोडले. तसेच मत व्यक्त करून या हल्ल्याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते लालकृष्ण अडवाणी यांनी केली. यावेळी त्यांनी अमेरिकेतील ९/११ दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेत अशी चौकशी झाली होती, याची आठवण करून दिली.सीआरपीएफ कॅंपवर दहशतवादी हल्ला करणा-या फहिम अन्सारीच्या कबुलीजबाबकडेही अडवाणी यांनी खासदारांचे लक्ष वेधले(FPJ:18-2-2009).परंतु या अन्सारीलाही मोकळे सोडण्यात आले. 
अमेरिकेतील ११/९ (२००१) हल्ल्य़ानंतर आणि लंडनमधील ७/७ (२००५)हल्ल्यानंतर तेथील चौकशी समित्यांनी शेकडो पानांचे अहवाल लिहिले आणि ते सरकारला आणि तेथील जनतेलाही सादर केले. आपल्या सरकारने राम प्रधान समितीवर अनेक बंधने टाकून मर्यादित स्वरुपात अहवाल तयार करायला लावले. माननीय श्री राम प्रधान यांनी गत वर्षी दूरदर्शानच्या एका वाहिनीवर मुलाखतीत सांगितले की, आमच्या समितीला शासकीय अधिका-यांनी नीट माहिती देऊ नये, असे वरिष्ठांकडून सागण्यात आले होते. राम प्रधान समितीने ६४ पानांचा अहवाल तयार केला. सरकारने त्यावरही उचित कारवाई केली नाही.
  अमेरिका आणि अन्य परदेशी लोक दहशतवादाबाबात जेवढे जागरूक आहेत, तेवढे भारतीय लोक नाहीत, अशी खंत अ‍ॅड्रिअन लेव्ही आणि कॅथी स्कॉट-क्लार्क या ब्रिटिश पत्रकारांनी ’रेडिफ’ या संस्थेला मुलाखत देताना व्यक्त केली.या द्वयीने खूप संशोधन करून "The Siege: The Attack on the Taj " नावाचे पुस्तक २०१३ मध्ये लिहिले आणि ते पेंग्विन प्रकाशन संस्थेने प्रसिद्ध केले आहे.दहशतवाद्यांचे दूरध्वनीवरील संभाषण,कसाबवरील खटला,शेकडो संबंधित लोकांच्या मुलाखती इत्यादी अनेक माहीतीचा आधार घेऊन हे पुस्तक लिहिले आहे.
  मुंबईवरील हल्ल्यात आयएसआयला मदत करणारी एक व्यक्ति दिल्लीत उच्चपदस्थ होती, असे अ‍ॅड्रिअन लेव्ही आणि कॅथी स्कॉट-क्लार्क यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे. त्या व्यक्तीला त्यांनी "हनी बी" (मधमाशी) असे संबोधले आहे. मुंबईतील मदतनिसांना त्यांनी ’उंदीर’ म्हटले आहे. त्या मधमाशीबद्दल ठोस पुरावा नसल्यामुळे तिचे नाव दिलेले नाही पण काही संशय व्यक्त केले आहेत आणि एक ना एक दिवस ती व्यक्ती सापडेल, असे म्हटले आहे. हिंदुस्तान सरकारने या मधमाशीचा आणि उंदरांचा शोध घेण्याचा प्रयत्न न केल्याबद्दल लेखकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. या मधमाशीचा शोध घेऊ, असे आश्वासन चिदंबरम नंतर गृहमंत्रीपदावर आलेल्या सुशीलकुमार शिंदे यांनी दिले होते(टाइम्स:१३-११-२०१३).परंतु नंतर त्यांनी ते पाळले नाही.
२६/११ मुंबई हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे पाकिस्तानचे भूतपूर्व पंतप्रधान नवाज़ शरीफ यांनी काही महिन्यांपूर्वी मान्य करून सर्वत्र मोठीच खळबळ उडवून दिली. त्यानुसार पाकिस्तानमध्ये दहशतवाद-विरोधी न्यायालयात २६/११ हल्ल्याबाबत खटला पुन्हा सुरु झाला आहे.अमेरिकेने हल्ल्यातील प्रमुख आरोपी डेव्हिड हेडली (ऊर्फ दाऊद गिलानी)याला ३५ वर्षाची शिक्षा केली आहे.भारतातही मोकाट फिरत असलेल्य स्थनिक मदतनिसांविरुद्ध तपास आणि खटला सुरु करण्याची आवश्यकता आहे. "मुंबईवरील हल्ला हे भारताविरुद्ध एक प्रकारचे युद्धच होय",असे अनेक पोलिस अधिकारी आणि मुंबईचे माजी पोलिस आयुक्त डी. शिवानंदन (मटा  संवाद पुरवणी, २५-११-२०१८)यांनी म्हटले आहे.पाकिस्तानी लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांचे स्थनिक मदतनिस म्हणजे देशाचे शत्रू.   म्हणजे या युद्धातील शत्रूना पाठीशी घालण्याचा फार मोठा गुन्हा भूतपूर्व गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केल आहे.त्या मानाने त्यांच्याविरुद्ध सध्या चालू असलेले आर्थिक घोटाळ्यांचे गुन्हे कमी म्हत्वाचे ठरावेत. मुंबईकरांनी त्याबाबत उदासीन राहणे योग्य नाही.आता केंद्रातील आणि महाराष्ट्रातील सरकारे बदलली आहेत.त्यामुळे आता भूमिगत मदतनिसांचा तपास पुन्हा सुरु झाला पाहिजे.
सुदैवाने मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा म्होरक्या अबू हमजा(जिंदाल) उर्फ झबिउद्दिन अन्सारी हा सध्या ऑर्थर रोड जेलमध्ये दुस-या एका गुन्ह्याखाली शिक्षा भोगतो आहे. हल्ल्याच्या वेळी तो भारतात नव्हता. कराचीहून १० पाकिस्तानी दहशतवादी बोटीने समुद्रमार्गे निघाले, त्यावेळी त्यांना निरोप आणि शुभेच्छा देण्यासाठी तो कराची बंदरावर हजर होता.हल्ल्याच्या वेळी कराची येथे हफीज सईदबरोबर तो सॅटेलाईट फोनवरून दहशतवाद्यांना मार्गदर्शन करीत होता. अबू हमजा(जिंदाल)ने २००९ मध्ये एक दिवस मुंबईतील आमदार निवासात महाराष्ट्र सरकारचे माजी मंत्री फौझिया खान यांच्या जागेत मुक्काम ठोकल्याचा ठोस पुरावा एटीएसकडे आहे(२९-६-१२-म.टा.).याने हल्ल्यामधील लष्कर-ए-तोयबाच्या १० दहशतवाद्यांना हिंदी आणि उर्दू शिकविले.म्हणजेच हल्ल्यापूर्वी अनेक दिवस हा पाकिस्तानमध्ये होता. या अबू जिंदालकडे चौकशी केली आणि त्याच्यावर ब्रेन मॅपिंग व नार्को अनलायसिस टेस्ट केल्यास २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील सर्व स्थानिक मदतनिसांना अजूनही पकडता येईल. 


संपूर्ण किनारपट्टीवर विजकीय (Electronic) देखरेख
संपूर्ण किनारपट्टीची फटिविरहित देखरेख पुरवण्यासाठी, तसेच अशोधित जहाजांचा प्रवेश रोखण्यासाठी, भारत सरकारने ’किनारी देखरेख महाजाल प्रकल्प’ (कोस्टल सर्वेयलन्स नेटवर्क प्रोजेक्ट) सुरू केलेला आहे. ह्या महाजालात किनारी रडार साखळी, ऍटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम आणि व्ही.टी.एम.एस. यांचा समावेश होतो. प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात, भारतीय किनारपट्टीवर ४६ स्थिर रडारपैकी मुख्य भूमीवर ३६ आणि द्विपभूमी प्रदेशांवर १० बसवली आहे. अतिरिक्त ३८ रडार दुसर्‍या टप्प्यात बसवली गेली. त्यात ८ तरत्या देखरेख प्रणालींची (मोबाईल सर्वेयलन्स सिस्टिम्सची) भर घातली जाईल. तथापि, हे रडार वर्ग-ए आणि वर्ग-बी प्रकारच्या ट्रान्सपाँडर्सनाच ओळखू शकतात आणि म्हणून मासेमारी नावांसारखी छोटी जहाजे शोधण्यात हे प्रभावी ठरू शकणार नाहीत. हा एक मोठाच धोका आहे. रडार साखळी, किनारपट्टीवरील पासून २५ नॉटिकल मैलांच्या छायेत देखरेख करते. महासागरी जहाजांचे मागकारक महाजाल -(एन.ए.आय.एस.- नेटवर्क फॉर ट्रॅकिंग मेरिटाईम व्हेसल्स) किनारी रडार साखळीस नॅशनल ऍटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम(एन.ए.आय.एस.) महाजालाची साथ मिळाली आहे. ह्या महाजालांतर्गत, जहाजांत बसवलेल्या ऍटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम प्रेषक-पासून माहिती मिळवून महासागरी जहाजांचा माग काढण्यासाठी, तसेच, ८४ इलेक्ट्रो-ऑप्टिकल सिस्टिम दीपगृहांवर स्थापित करण्यात आलेले आहेत. राष्ट्रीय ऍटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम; जहाजांदरम्यान तसेच जहाजे व किनार्‍यावरील स्थानकांत माहिती पोहचवणे सुलभ करेल. त्यामुळे परिस्थितीबाबतची जागरूकता आणि देशाच्या किनारपट्टीवरील जलमार्गांवर, मार्गिकांतील वाहतूक व्यवस्थापन सुधारेल. स्थिर रडार साखळी आणि ऍटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम संवेदकांकडून प्राप्त झालेली माहिती (डाटा); जहाजवाहतूक व्यवस्थापन प्रणालीच्या.व्हेसल ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमच्या(व्ही.टी.एम.एस) माहितीसोबत जोडला जाईल. सर्व मोठ्या आणि काही मोठ्या नसलेल्या बंदरांत, तसेच कच्छ व खंबातच्या आखातांत ह्या व्ही.टी.एम.एस. बसवल्या जात आहेत. ही माहिती एकत्रित केली जाईल. ह्या संरचनेत भारतीय तटरक्षकदलाची जिल्हा मुख्यालये, प्रादेशिक मुख्यालये आणि नवी दिल्लीतील मुख्यालयही जोडलेले असेल. राष्ट्रीय ऍटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम, महासंचालक दीपगृहे आणि दीपपोतांच्या प्रादेशिक नियंत्रण स्थानकांशीही जोडलेली असेल. पूर्व किनार्‍यावर कोलकाता, विशाखापट्टणम आणि चेन्नई ही स्थानके ’सागरी नियंत्रण केंद्र, पूर्व’ विशाखापट्टणमशी; जामनगर, मुंबई आणि कोचिन येथील प्रादेशिक नियंत्रण केंद्रे ’सागरी नियंत्रण केंद्र, मुंबई’ यांचेशी जोडलेली असतील. ही दोन्ही नियंत्रण केंद्रे, राष्ट्रीय माहिती केंद्र (नॅशनल डाटा सेंटर) मुंबईशी जोडलेली असतील; जिथून ही माहिती निरनिराळ्या वापरदारांकरता प्रसारित केली जाईल. दुसर्‍या टप्प्यात, १० संवेदक अंदमान व निकोबार तसेच लक्षद्विप बेटांत बसवले जात आहेत. दीर्घ पल्ल्याच्या ओळख व मागकारकांसह (एल.आर.आय.टी.-लाँग रेंज आयडेंटिफिकेशन अँड ट्रॅकिंग) असलेली ऍटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम; आणि नॅशनल कमांड, कंट्रोल, कम्युनिकेशन, इंटेलिजन्स(एन.सी.३.आय.) महाजाल; ह्यांनी मिळून देशाच्या महासागरी परिक्षेत्राचे वर्तमान चित्र साकार झालेले आहे.

No comments:

Post a Comment