Total Pageviews

Wednesday 14 November 2018

भिकीस्तानचे भीकमूल्य.. महा एमटीबी 11-Nov-2018 योगिता साळवी

पाकिस्तानचे नाव ‘भिकीस्तान’ ठेवावे लागेल, अशी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अराजकता या देशात सातत्याने निर्माण होते. अर्थात, एकदा ‘भिकीस्तान’ आहेच म्हटल्यावर बीजिंगला जाऊन ‘बेगिंग’ करावे की, अमेरिकेला जाऊन ‘बेगिंग’ करावे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न. पण, पाकिस्तान स्वतःचे भीकमूल्य विसरत नाही, हे नक्की.
 
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे’. पण, पाकिस्तानचे केवळ ‘घेत जावे, घेत जावे...’ असेच ब्रीदवाक्य आहे की काय, असे वाटते.कालपर्यंत अमेरिकेच्या नाकदुऱ्या काढत पैसे मागणारा पाकिस्तान गेल्या काही वर्षांपासून चीनपुढेही झोळी घेऊन उभा राहिलेला दिसतो. पाकिस्तानमध्ये नुकत्याच निवडणुका झाल्या. त्यामध्ये क्रिकेटपटू इमरान खान पंतप्रधान झालेआता क्रिकेटपटू पंतप्रधान होवो की अजून कुणी, त्यामुळे या देशाचे वास्तव कसे बदलेल? भारतावर कुरघोडी करण्याच्या नादात या देशाने आपल्या आर्थिक नियोजनाचा मोठा वाटा संरक्षणात खर्ची घालवला. अर्थात, यात देशाचे संरक्षण कमी आणि भारताला त्रास जास्त हाच खरा अर्थ आहे. असो... तर नुकतेच पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान चीनच्या दौऱ्यावर गेलेपंतप्रधान झाल्यानंतर इमरान खान यांचा हा पहिलाच चीन दौराया दौऱ्याचं फळ म्हणून पाकला चीनकडून ६ अब्ज अमेरिकन डॉलरची आर्थिक मदतही मिळणारहे जवळपास निश्चित झाले आहेअशावेळी या भेटीदरम्यान इमरान खान यांचे भाषण सुरू असतानाच ‘पीटीव्ही’वर अचानक डेटलाईनमध्ये ‘बीजिंग’ ऐवजी ‘बेगिंग’ असा शब्द झळकला. २० ते २५ सेकंद हा शब्द स्क्रीनवर होता. ही चूक चॅनेलने लगेचच सुधारली व त्याबद्दल माफीही मागितली. मात्र, या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल घेत ‘पीटीव्ही’चे हंगामी व्यवस्थापकीय संचालक हसन इमाद मोहम्मदी यांना पदावरून दूर करण्यात आले.
 
हेच जर भारतामध्ये घडले असते तर असहिष्णुता, हिटलरशाही, प्रसारयंत्रणेचा गळा दाबला वगैरे रडारड सुरू झाली. पण ते पाकिस्तान आहे, तिथे ‘बेगिंग’ केली तरी आपण ‘पाकच’ आहोत, असे मनात नसतानाही भासवावेच लागतेअसो... पण, या निमित्ताने पाकिस्तानचा इतिहास आठवायला हरकत नाही. भारताचे विभाजन झाले आणि सदैव मागायच्या तयारीत असलेल्या एका देशाची निर्मिती झाली. हा मागतेकरी देश आहे पाकिस्तान. ‘टिचभर विंचू पण हातभर विष’ असा या देशाचा लौकिक. देशाला ना स्वतःचा प्राचीन इतिहास ना प्राचीन ओळख. पण, ही नसलेली ओळख भरून काढण्यासाठी पाकिस्तान त्याच्या निर्मितीपासूनच प्रयत्नशील आहे. ‘नाम नही हुआ तो क्या बदनाम तो है,’ असा फंडा वापरून पाकिस्तान आंतरराष्ट्रीय राजकारणात वावरत असतो. नेहमी रडगाणे, मदत मागणे हा या देशाचा एककलमी कार्यक्रम. ज्यावेळी या देशाची निर्मिती झाली, त्याचवेळी विध्वंस, अतिरेकी कारवाया, कुजकी मनोवृत्ती यांची चांगली तालीम पाकिस्तानने केली. ही सगळी रंगीत तालीम आणि प्रत्यक्ष हिंसात्मक खेळ पाकिस्तानने आपल्या मूळ देशाशी म्हणजे भारताशीच केला. पण, हे सगळे करताना निर्लज्जपणे या देशाने भारताकडेच भीक मागितली. त्यावेळी पाकिस्तानला भारताने ५१ कोटी रुपये दिले, कारण भारताची दान संस्कृती. लाचाराला सबल बनविण्याची प्रवृत्ती. ती पाकिस्तानची पहिली भीक होती. त्याआधीही पाकिस्तानच्या निर्मात्यांनी इंग्रजांकडे धर्मावर आधारित वेगळ्या राष्ट्राची भीक मागितलीच होती. अशी भीक मागून तयार झालेला देश म्हणजे पाकिस्तान.
 
अर्थातत्यानंतर पाकिस्तानने भारताशी सदासर्वकाळ पत्करलेली वैऱ्याची भूमिकाती निभावताना पोसलेला दहशतवादत्या दहशतवादाच्या भस्मासुराने पाकिस्तानलाच हिंसेचे नरक बनवलेदुसऱ्याच्या घराला पेटवण्यासाठी कोलीत पकडावे आणि स्वतःच जळावे, असे काहीसे पाकिस्तानचे झाले आहे. या अशा परिस्थितीमुळे पाकिस्तानात कुठलीही स्थिरता नाही. यामुळे पाकिस्तान आतून बाहेरून पूर्ण पोखरला गेला. पाकिस्तानचे नाव ‘भिकीस्तान’ ठेवावे लागेल, अशी आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अराजकता या देशात सातत्याने निर्माण होते. अर्थात, एकदा ‘भिकीस्तान’ आहेच म्हटल्यावर बीजिंगला जाऊन ‘बेगिंग’ करावे की, अमेरिकेला जाऊन ‘बेगिंग’ करावे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न. पण, पाकिस्तान स्वतःचे भीकमूल्य विसरत नाही, हे नक्की.
 

No comments:

Post a Comment