Total Pageviews

Tuesday, 3 March 2026

मध्यपूर्वेत ज्वालामुखीचा उद्रेक

 


मध्य-पूर्व पुन्हा ज्वालामुखीच्या तोंडावर उभा आहे. इस्रायल-अमेरिकेच्या संयुक्त कारवाईत इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने जागतिक राजकारणाला धक्का दिला आहे. अमेरिकेने इराणला शरणागतीचा इशारा दिला असून, खामेनेई समर्थक बदला घेण्याची भाषा करत आहेत. हा संघर्ष दशकांच्या अविश्वासाचा, सामरिक स्पर्धेचा आणि आण्विक शंकेचा परिपाक आहे.

इराण आण्विक कार्यक्रमाची पार्श्वभूमी

इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर अमेरिका-इस्रायलचा सतत आक्षेप आहे. इराण शांततापूर्ण उद्देश सांगतो, पण संशय कायम आहे. इस्रायलसाठी हा अस्तित्वाचा प्रश्न आहे. सीमेजवळील आण्विक शत्रू तो स्वीकारणार नाही. अमेरिकेसाठी जागतिक सामर्थ्य-संतुलनाचे प्रश्न आहे. म्हणून इराणच्या अणुसुविधा, क्षेपणास्त्रतळ आणि लष्करी संरचनांना लक्ष्य केले.

इराणचे अंतर्गत आव्हाने

हा संघर्ष बाह्यच नव्हे, इराणच्या अंतर्गत वास्तवाचा भाग आहे. अर्थव्यवस्था दबावाखाली आहे. महागाई, चलन अवमूल्यन, बेरोजगारी, वस्तू टंचाईने असंतोष वाढला. अमेरिकी-युरोप निर्बंधांमुळे तेलनिर्यात बंधली. चीन-रशियाशी जवळीक वाढवली, पण फास सैल झाला नाही. खामेनेईंनी इराणला प्रतिरोधक अक्षाचे केंद्र बनवले. हिजबुल्लाह (लेबनॉन), हमास (गाझा), हूती (येमेन), शिया मिलिशिया (सीरिया-इराक) यांना पाठिंबा दिला. इस्रायल-हमास युद्ध, लाल समुद्र हल्ले, सीरिया-इराक कारवाया यांचा धागा तेहरानपर्यंत जोडला जातो.

अमेरिकेचा शरणागती इशारा

अमेरिकेचा 'शरणागतीचा इशारा' लष्करी-राजकीय आहे. इराणने आण्विक कार्यक्रम थांबवावा, हस्तक्षेप कमी करावा, अटी मान्य कराव्यात. इराणची धर्माधिष्ठित व्यवस्था माघार घेईल का? खामेनेईंच्या मृत्यूनंतर कट्टर घटक बदला घेतील.

आंतरराष्ट्रीय दबाव व चक्र

संयुक्त राष्ट्र, IAEA ने आण्विक मर्यादा घातल्या. करार झाले-मोडले. अविश्वास वाढला. निर्बंध व गुप्त कार्यक्रमांचे दुष्टचक्र.

जागतिक आर्थिक धोके

परिस्थिती धोकादायक. होर्मुझ सामुद्रधुनीतून तेलवाहतूक. हल्ले झाले तर तेलदर वाढतील. आखाती देशांवर हल्ल्याने बाजार अस्थिर होईल.

भारतासाठी परिणाम

भारताची ऊर्जा आयातीवर अवलंबित्व. इंधनदर वाढतील, चलनवाढ होईल. नौवहन विमा प्रिमियम वाढेल. खाडीतील भारतीय समुदाय अनिश्चिततेत. भारत संतुलित धोरण कायम ठेवेल: इस्रायलशी संरक्षण, इराणशी ऊर्जा-सांस्कृतिक संबंध.

इराण सत्तासंघर्ष

खामेनेई मृत्यूनंतर उत्तराधिकारी? IRGC प्रभाव वाढेल का? बाह्य हल्ला राष्ट्रवाद वाढवेल, कट्टरता बळकट होईल.

भविष्यातील शक्यता

पर्याय: संघर्ष वाढेल व प्रादेशिक युद्ध पेटेल किंवा मर्यादा आखून गुप्त राजनय. इतिहास संवाद सांगतो, पण राजकीय परिपक्वता हवी.

जागतिक संदेश

अमेरिका निर्णायक आहे, पण बहुध्रुवीय जग. रशिया-चीन इराणला आधार देतील. मध्यपूर्व ठिणगी जग जाळू शकते. संवादाने शांतता शक्य, अन्यथा रक्तरंजित अध्याय.

No comments:

Post a Comment