Total Pageviews

Monday, 2 February 2026

यंदाच्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी ' ये दिल मांगे मोअर' | Hemant...

तरतूद केलेल्या निधीचा कार्यक्षम आणि पूर्ण वापर

२०२५-२६ च्या अर्थसंकल्पातून न वापरलेले निधी परत खजिन्यात (money returned) गेल्याचे चित्र दिसत नाही, कारण मधल्या काळात अतिरिक्त मागण्या ओपरेशन सिंधुर करता करण्यात आल्या.

संरक्षण मंत्रालयाचा (MoD) २०२५-२६ सालचा सुधारित अंदाज (RE) रु. ६,९८,००० कोटी इतका असून, मूळ अंदाज (BE) रु. ६,८१,२१० कोटी होता, म्हणजे सुमारे २.५% अधिक उपयोग. यावरून संरक्षण अंदाजपत्रकातील तरतूद केलेल्या निधीचा कार्यक्षम आणि पूर्ण वापर झाल्याचे दिसून येते. यापूर्वीच्या वर्षांत संरक्षण मंत्रालयाला मंजूर रकमेपैकी जवळपास ५% निधी खर्च करता येत नसे आणि तो परत जाई. आता मंजूर रकमेचा अधिक कार्यक्षम वापर होत आहे. परिणामी, संरक्षण सज्जता (defence preparedness) आणि क्षमता वाढीस फायदा होत आहे.

नविन तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक...

आता सैन्यदलात नवनविन तंत्रज्ञान येत आहे.यात एआय,युएव्ही,सायबर असो ज्यामुळे आपल्याला चीनशी मुकाबला करण्यास मदत मिळेल.आपली लढाईची क्षमता वाढेल.तसेच यावर्षी आपण तयार केलेली शस्त्रे परदेशात विकली आहेत.मागच्या वर्षी २०२५ मध्ये जवळपास २३ हजार कोटींची शस्त्रे विकली आहे.आता आपण मेकइन इंडियामध्ये फॉरेन डायरेक्ट इंन्व्हेस्टमेंट (एफडीआय) ला परवानगी दिल्यामुळे फायदा होईल.

आपण १०० टक्के शस्त्र निर्यात करु शकू...

संरक्षण निर्यातीतील वाढ (२३,००० कोटी रुपये) ही एक जमेची बाजू आहे.आपण मागे वळून पाहिले तर लक्षात येते की,२०१४ पूर्वी आपण ७० टक्के शस्त्रे ही आयात करीत होती.पण आता तीच भारतात तयार करुन ७० टक्के शस्त्रे निर्यात करीत आहोत.मेकइन इंडिया योजनेत आपण ही प्रगती केली आहे.त्यामुळे अशी आशा आहे की,पुढच्या पाच वर्षातच आपण १०० टक्के शस्त्रे,दारुगोळा भारताच तयार होईल.

 

मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सचे बेजट ९ टक्यांनी वाढले

 

ऑपरेशन सिंदूर मध्ये जे धडे शिकायला मिळाले होते.त्याचा आपण पुरेपूर वापर करुन आपल्या देशाची शस्त्रसिध्दता चांगली सक्षम केली आहे.यात अजून एक महत्वाची बाब म्हणजे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांचे बेजटही ९ टक्यांनी वाढवले आहे.यात सीआरपीएफ,बीएसएफ,आयटीबीपी ही सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस सक्षम होणे महत्वाचे आहे.या यंत्रणा सीमेवर तैनात असतात.चीनच्या सीमेवर आयटीबीपी,पाकिस्तान सीमेवर बीएसएफ तैनात असते.त्यांची क्षमता वाढली तर आपली ताकद आणखी वाढेल.

 

सीमावर्ती भागातील सुरक्षा महत्वाची...

 

सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधा वाढविल्या जात आहेत ही खूप जमेची बाब आहे.तेथे रस्ते,पूल तयार करणे सुरु आहे.त्याचा फायदा भारतीय सैन्याला होतो.भारतीय सैन्याचे बजेट केवळ सैन्यदलाच्या बजेटवरच असते असे नाही आपण विज्ञान,तंत्रज्ञान,पायाभूत सुविधांसारख्या इतर क्षेत्रात जी वाढ करतो.त्याचा फायदा सैन्यदलाला देखील होतो.

No comments:

Post a Comment