Total Pageviews

Thursday 21 June 2018

नोकरीचं आमिष दाखवून दगडफेकीचं काम दिलं जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख यासीन मलिकला अटक- :Jun काश्मीर खोऱ्यात लवकरच एनएसजी कमांडो तैनात होणार 21, 2018, 02:47PM IST



उत्तर प्रदेशातील दोन तरुणांना नोकरीचं आमिष दाखवून जम्मू-काश्मीरमध्ये दगडफेकीचं काम दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांकडून दगडफेक करण्यासाठी भाड्याने माणसे आणली जात असल्याचं उघड झालं आहे.

'
टाइम्स नाऊ' या वृत्तवाहिनीने अतिरेकी आणि फुटीरतावाद्यांच्या या षडयंत्राचा पर्दाफाश केला आहे. हे दोन्ही तरूण उत्तर प्रदेशातील सहारनपूर आणि बागपत येथील रहिवासी आहेत. त्यांना काश्मीरच्या पुलवामामध्ये टेलरची नोकरी देण्याचं आणि दरमहा २० हजार रुपये पगार देण्याचं आमिष दाखवण्यात आलं होतं. त्यामुळे हे दोघेही पुलवामध्ये आले होते. मात्र पुलवामामध्ये आल्यावर त्यांना दगडफेक करण्याचं ट्रेनिंग देण्यात आलं आणि सुरक्षा दलावर दगडफेक करण्यास सांगण्यात आलं. तशी कबुलीही या तरुणांनी दिली आहे.

'
सुरुवातीला मी दोन-तीन महिने ट्रेलर म्हणून काम केलं. मात्र ही नोकरी करताना मी नेहमी चिंताग्रस्त असायचो. नोकरी सोडून गावाकडे परतण्याची मी परवानगी मागितली. पण मला परवानगी नाकारण्यात आली. चोरीच्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची मला धमकी देण्यात आली,' असं एका तरुणाने सांगितलं.

दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाचे आदेश दिले आहेत. चौकशीनंतर अहवाल सादर करण्याचे आदेशही बागपत आणि सहारनपूरच्या पोलीस अधिक्षकांना देण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील तपासासाठी जम्मू-काश्मीर पोलिसांचीही मदत घेतली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.काश्मीरमध्ये दगडफेक करण्यासाठी पाकिस्तानकडून फंडिंग पुरवला जात असून त्याबाबत गुप्तचर यंत्रणांनी काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची या आधीच चौकशी सुरू केलेली आहे.
जे दगड मारतात त्यांना सरळ गोळ्या घाला जिवंत सापडले तर फासावर लटकवा देशद्रोहीना हिच शिक्षा आणि मानव अधिकारवाले फार वळवळला लागले तर त्यांना धरुन चौकात दगडांनीच ठेचा. त्याना यू पी मध्ये रिक्रुट करणारे पण शोधा.
जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवटलागताच कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनसह अनेक नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या दोन अधिकाऱ्यांची 'मिशन काश्मीर'वर नियुक्ती करण्यात आली आहे. छत्तीसगडचे अतिरिक्त मुख्य सचिव बीव्हीआर सुब्रमण्यम आणि माजी मुख्य सचिव, माजी आयपीएस अधिकारी विजयकुमार अशी या दोन अधिकाऱ्यांची नावं आहेत. सुब्रमण्यम यांना जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन.एन. वोरा यांचे मुख्य सचिव तर विजयकुमार यांना राज्यपालांचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. 

जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यानंतर काही बहुचर्चित आणि कर्तबगार अधिकाऱ्यांना जम्मू-काश्मीरमध्ये नियुक्त करण्यात आले आहे. त्यात सुब्रमण्यम आणि विजयकुमार यांचा समावेश आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या विश्वासातले खास अधिकारी म्हणून सुब्रमण्यम ओळखले जातात. यूपीए-१ मध्ये मनमोहन सिंग यांनी त्यांना खासगी सचिव म्हणून नियुक्त केले होते. यूपीए-२ मध्येही त्यांना संयुक्त सचिवपद बहाल करण्यात आलं होतं. जागतिक बँकेत तीन वर्ष काम केल्यानंतर मायदेशी आलेल्या सुब्रमण्यम यांना मनमोहन सिंग यांनी संयुक्त सचिव केलं होतं. त्यानंतर छत्तीसगडमध्ये त्यांची बदली करण्यात आली होती. 

सुब्रमण्यम यांनी गृहसचिव म्हणून छत्तीसगडमध्ये प्रभावीपणे काम केलं होतं. छत्तीसगडमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली. बस्तरमध्ये केवळ इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी ७०० किलोमीटर लांबीचा रस्ता बांधला. २०१७ मध्ये या परिसरात ३०० नक्षलवादी मारले गेले तर एक हजाराहून अधिक नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली होती.
विजयकुमार ठरले वीरप्पनचा कर्दनकाळ 

माजी आयपीएस अधिकारी विजयकुमार यांनी जंगलात लपून समाजविघातक कारवाया करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई केली. तामिळनाडूमधील १९७५ च्या बॅचचे ते आयपीएस अधिकारी आहेत. १९९८ ते २००१ दरम्यान ते काश्मीरमध्ये बीएसएफचे महानिरीक्षक होते. २०१० मध्ये छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ७५ सीआरपीएफ जवान शहीद झाल्यानंतर कुमार यांना छत्तीसगडचे महानिरीक्षक म्हणून नियुक्त केले गेलं होतं. कुमार आल्यानंतर या परिसरात नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी झाला. ऑक्टोबर २००४ मध्ये एका चकमकीत चंदन तस्कर वीरप्पनला ठार झाला होता. त्या टीमचं नेतृत्व विजय कुमार यांनी केलं होतं. 
जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख यासीन मलिकला अटक
जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यानंतर पोलीस आणि लष्कराने आता कंबर कसली आहे. पोलीस आणि लष्कराने केवळ दहशतवाद्यांविरोधातच मोहीम उघडली नसून दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांभोवतीचा फासही आवळला आहे. त्या पार्श्वभूमीवर आज जम्मू-काश्मीर पोलिसांनी फुटीरतावादी नेता आणि जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा प्रमुख यासीन मलिकला अटक केली आहे. 

यासीन मलिकला आज सकाळी श्रीनगरमधून ताब्यात घेण्यात आले आहे. येत्या काही दिवसात जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेत्यांची पोलीस धरपकड करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. फुटीरतावाद्यांना अटक करायची की त्यांना नजरकैदेत ठेवायचे यावर पोलिसांचा विचार सुरू असल्याचंही सांगण्यात येतं. येत्या २८ जून रोजी अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे. या यात्रेवर दहशतवादी हल्ला होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मलिकला अटक केली असल्याचं सांगण्यात येतं. 

राज्यपाल राजवट लागू झाल्यामुळे दहशतवाद्यांविरोधात कारवाई करताना स्थानिक नेत्यांची होणारी ढवळाढवळ थांबेल असं पोलीस सूत्रांनी सांगितलं. स्थानिक नेत्यांचा हस्तक्षेप होणार नसल्याने अतिरेक्यांविरोधातील कारवाई अत्यंत वेगाने होणार असल्याचंही पोलीस सूत्रांनी सांगितलं.
काश्मीर खोऱ्यात लवकरच एनएसजी कमांडो तैनात होणार आहेत. श्रीनगर येथील बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या तळावर सध्या या एनएसजी कमांडोंचे जोरदार प्रशिक्षण सुरु आहे. एनएसजी ही भारताची एलिट कमांडो फोर्स आहे. ब्लॅक युनिफॉर्म ही या फोर्सची ओळख असून सध्या अन्य सुरक्षा दलांबरोबर त्यांचा सराव सुरु आहे. अचूक नेम धरणारे एनएसजीचे जवळपास दोन डझन स्नायपर्स मागच्या दोन आठवडयांपासून जोरदार सराव करत आहेत.
पुढच्या काही दिवसात बीएसएफच्या तळावर १०० एनएसजी कमांडो तैनात होतील अशी गृहमंत्रालयाला आशा आहे. अपहरणविरोधी कारवाईमध्ये हे कमांडो पारंगत असून त्यांना विमानतळाजवळ तैनात केले जाईल असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. केंद्रीय गृहमंत्रालयाने मागच्या महिन्यात काश्मीरमध्ये एनएसजी कमांडोंच्या तैनातीला मंजुरी दिली.
काश्मीर खोऱ्यात लवकर तुम्हाला एनएसजी कमांडो दहशतवाद्यांविरोधात कारवाई करताना दिसतील. काश्मीर खोऱ्यात केंद्राला दहशतवाद्यांविरुद्ध कारवाईला वेग द्यायचा आहे. एनएसजी कमांडोंच्या उपस्थितीमुळे सुरक्षा दलांची जिवीतहानी कमी होईल असे अधिकाऱ्याने सांगितले. भाजपाने पीडीपीचा पाठिंबा काढल्यामुळे काश्मीरमध्ये सरकार कोसळले असून इथे आता राज्यपाल राजवट आहे.
राज्यपाल राजवटीत दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करणे अधिक सोपे होईल असे सुरक्षा यंत्रणांना वाटते. एनएसजी अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असतात. मुंबईवर २६/११ दहशतवादी हल्ला झाल्यानंतर एनएसजी कमांडोंना पाचारण करण्यात आले होते. त्यांनीच नंतर सर्व ऑपरेशन केले होते

No comments:

Post a Comment