Total Pageviews

Saturday 23 June 2018

बुद्धिभेद-माओवाद्यांना कित्येक विद्यापीठांतील प्राध्यापकच मदत करीत असल्याचे आजवर सामोरे आले आहे. अशाच एका प्राध्यापकाला काही महिन्यांपूर्वी जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली. तरुण भारतJun 24 2018-डॉ.परीक्षित स. शेवडे |


‘‘आपल्या देशावर कोणी राज्य केलं?’’
‘‘ब्रिटिश’’ समोर बसलेल्या शाळकरी मुलांचे एका सुरात आलेले उत्तर.
‘‘यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणी होतं का?’’
‘‘फ्रेंच, डच, पोर्तुगीज’’ तसेच एका सुरातले उत्तर.
‘‘बरं… त्यांच्या आधी कोणाचं राज्य होतं?’’
‘‘मुघलांचं’’
‘‘आणि मुघलांच्या आधी??’’
यावर एकाही विद्यार्थ्याला उत्तर देता आले नाही! एका शाळेने त्यांच्या नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी माझे व्याख्यान आयोजित केले असता घडलेला एक अंतर्मुख करणारा प्रसंग. स्वातंत्र्योत्तर काळात गेल्या सत्तर वर्षांतील हीच आपली कमाई आहे की आमच्या आजच्या पिढीला मुघलांच्या आधी भारताचा इतिहास काय होता? किंबहुना होता वा नव्हताच याचीही माहिती नाही! यादव, कदंब, सातवाहन, मौर्य, गुप्त यांपैकी कसलीही माहिती या पिढीला नाही. गेल्या सत्तर वर्षांत समाजात फुटीरता निर्माण करणारे डावे आणि त्यांचा सतत उदोउदो करणारे पुरोगामी यांच्या एकत्रित कारस्थानाचे हे फलित आहे.
जर्मन मानसोपचारतज्ज्ञ एरिक एरिक्सन याने पौगंडावस्थेतील मुला-मुलींच्या मानसिक समस्यांमधील एक म्हणून खवशपींळीूं लीळीळी या संज्ञेचा उल्लेख केला आहे. याच संकल्पनेचा विस्तार करताना जेम्स मास्रिया नामक ब्रिटिश मानसोपचारतज्ज्ञाने सखोल विवेचन केले आहे. मी म्हणजे नेमका कोण? हा प्रश्‍न पडून त्याचे उत्तर न सापडल्याने पुढे होणारी ससेहोलपट असे खवशपींळीूं लीळीळी चे सोप्या शब्दांत वर्णन करता येईल. ही अवस्था कित्येकदा निसर्गत: जन्माला येते तर कित्येकदा मुद्दाम घडवली जाते. आपल्या देशातील तरुणाईच्या बाबतीत विचार करता ही अवस्था मानवनिर्मित आहे हे सहज लक्षात येईल. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या समाजवादाकडे असलेल्या ओढ्यामुळे नवीन भारत घडवण्याच्या काहीतरी अनाठाई कल्पनांपायी या देशाचा इतिहास जसाच्या तसा मांडण्याबाबत सतत औदासिन्य दाखवले. एकीकडे संस्कृत भाषेला मृतप्राय करार देत दुसरीकडे अल्लाउद्दीन खिल्जीसारख्या क्रूर आणि अत्याचारी आक्रमकाला उद्देशून आपल्या पुस्तकात त्यांनी उत्तम प्रशासक आणि सर्वधर्मसमभाव मानणारा इत्यादी खोटी विशेषणे जोडून त्याचे मनसोक्त उदात्तीकरण देखील केले. उदात्तीकरणाच्या या प्रक्रियेत पुढे कित्येक परकीय आक्रमकांना थोर ठरवत काही विद्वान पुरोगामी लोकांनी या देशातील शासकांचा उल्लेखच गाळायला सुरुवात केली. कधी महाराणा प्रतापाचा उल्लेख हा बंडखोर म्हणून तर कधी मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाचा उल्लेख डाकूंच्या टोळ्या अशा शब्दांत करण्यात आला. दुसरीकडे मात्र अकबर हा कायमच महान आणि औरंगजेब हा कायमच थोर म्हणून गौरवला गेला आणि या बुद्धिभेदाला शैक्षणिक संस्थांतून पद्धतशीर आखणी करत विद्यार्थ्यांच्या माथी मारले गेले. गेल्या तीन ते चार पिढ्या सातत्याने हे बुद्धिभेदाचे प्रयत्न इतके पक्के रुजले की, भारतातील सध्याची तरुण पिढी ही या बुद्धिभेदाला पूर्णपणे बळी पडून खवशपींळीूं लीळीळी ने ग्रासली गेली आहे. आपण नेमके कोण आहोत? याचे उत्तर त्यांना सापडेनासे झाले आहे.
ही स्थिती साध्य झाल्यावर ती घडवून आणणारे विषारी बुद्धीचे लोक या विद्यार्थ्यांना आपल्याकडे वळवून घेतानाचे चित्र दिसते. खोटे बोला आणि रेटून बोला असा आदर्श असलेले हे लोक विद्यार्थी संघटना, त्यांच्या बैठका अशा नाना मार्गाने विद्यार्थ्यांचा ब्रेन वॉश सुरू करतात. भारतात कशी कायम सामाजिक-आर्थिक विषमता होती, भारत हे कधीही एक राष्ट्र कसे नव्हते इत्यादींचा घोष विद्यार्थ्यांच्या डोक्यावर भिनवला जातो आणि मग या सगळ्या परिस्थितीवर उत्तर काय? तर माओवाद अशी पुडी हळूच सोडली जाते. आधी सत्य इतिहासापासून नाळ तोडून टाकायची आणि मग देश तोडणार्‍या प्रवृत्तींचे उदात्तीकरण करवून आपण काही मोठे क्रांतिकार्यच करत आहोत असे विद्यार्थ्यांच्या डोक्यात भरवायचे अशी माओवाद्यांची मोडस ओपरेंडी आहे. या सार्‍या जहरी कामात माओवाद्यांना कित्येक विद्यापीठांतील प्राध्यापकच मदत करीत असल्याचे आजवर सामोरे आले आहे. अशाच एका प्राध्यापकाला काही महिन्यांपूर्वी जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली. त्याच्याकडे असलेल्या संगणकावर सात वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना उभारून त्यामधून माओवादी चळवळीसाठी तरुण-तरुणी भरती करायचे याची आखणी नोंदवलेली मिळाली. हे सात प्रकार पुढीलप्रमाणे; क्रांतिकारी गीते गाणार्‍या संघटना (A१), विद्यार्थ्यांच्या संघटना (A२), स्त्रियांच्या संघटना (A३), आदिवासींच्या संघटना (A४), तुरुंगातील कैद्यांच्या सुटकेसाठी संघटना (A५), विस्थापितांच्या संघटना (A६) आणि रेव्होल्यूशनरी डेमोक्रॅटिक फ्रंट (ठऊऋ) (A७) विशेष म्हणजे यात भारतीय संघटनांचा समावेश होतो. या प्रत्येक समितीतील एक सदस्य घेऊन कार्यकारी मंडळाची स्थापना होते. यांच्या नियमित मीटिंग्स होत तरुण-तरुणींना आपल्याकडे विविध माध्यमांतून कसे वळवावे याच्या चर्चा आणि अंमलबजावणीदेखील होते. नक्षलवादाच्या अभ्यासक असलेल्या कॅप्टन स्मिता गायकवाड यांच्याकडून प्राप्त झालेली ही सारी माहिती ही केवळ सुन्न करणारीच नव्हे तर भयाण वास्तवाची जाणीव करून देणारी आहे.
आखीव रेखीव पद्धतीने सुरू असलेल्या या कार्यात विविध सामाजिक क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तीदेखील सामील असतात. विशेषत: प्रसारमाध्यमे आणि चित्रपटसृष्टीतील पुरोगामित्वाचा बुरखा ओढलेले कित्येक विचारवंत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे या सार्‍या कारवायांना खतपाणी घालत असतात. मध्यंतरीच्या काळात न्यूटन नामक एक चित्रपट येऊन गेला. या चित्रपटात नक्षलवादी हे आपल्या न्याय्य हक्काची लढाई लढत आहेत आणि भारतीय शासन आणि सैन्य मात्र त्यांच्यावर अत्याचार करत आहे असे अत्यंत विपर्यस्त चित्रण हे एका ध्येयवेड्या तरुणाच्या कथेच्या सांगाड्याभोवती करण्यात आले होते. हा चित्रपट पाहून कित्येक तरुणांच्या मनात नक्षलवाद योग्यच आहे अशी भावना निर्माण झाल्यास काय वावगे असेल? दुर्दैव म्हणजे हा चित्रपट भारताकडून ऑस्करसाठी नामांकित झाला होता. या चित्रपटाबाबत एका सीआरपीएफ जवानाने तक्रार दाखल केल्यावर संविधानाने दिलेल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्य या ढालीचा बचावासाठी उपयोग पुरोगाम्यांकडून केला गेला. एकीकडे संविधानाचे दाखले द्यायचे आणि दुसरीकडे संविधानदत्त लोकशाही उलथवून टाकण्याची भाषा करणार्‍या नक्षल्यांनाही समर्थन द्यायचे हा विलक्षण दांभिकपणा या देशातले पुरोगामी सातत्याने करताना आढळतात. एक मात्र खरे की; सार्‍या देशविघातक वृत्ती हातात हात घालून काम करीत आहेत. अशा स्थितीत देशप्रेमी नागरिकांनी एकसंध होऊन पुढाकार घेत आजच्या पिढीला बुद्धिभेदातून वाचविणे इतकाच पर्याय हाती उरला आहे. अन्यथा; बैल गेला अन् झोपा केला अशी स्थिती होणार हे निश्‍चित!

No comments:

Post a Comment