Total Pageviews

Sunday 18 February 2018

-गोळ्यांनी छातीची चाळणी झाली होती, तरीही दहशतवाद्यांना भारी पडला हा शूर जवान

दिव्य मराठी वेब टीम | Feb 18, 2018, 
लखनऊ - शहरातील रहिवासी लेफ्टिनंट हरिसिंग बिष्ट दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले. परंतु, धारातीर्थी पडण्याआधी त्यांनी असे काम केले ज्यामुळे अवघा देश त्यांची कायम आठवण काढत राहील. गोळ्यांनी शरीराची अक्षरश: चाळणी झालेली असतानाही त्यांनी एका दहशतवादी संघटनेच्या दोन कुख्यात दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यांच्या कुटुंबाला नुकतेच पॉवर विंग नावाच्या संस्थेने सन्मानित केले आहे.

अशी आहे या शहिदाची विजयगाथा...
- 21
जुलै 2000 रोजी लेफ्टिनंट हरीसिंह बिष्ट यांना माहिती मिळाली होती की, जम्मू कश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील मानधार सेक्टरच्या मंझियारी गावात दहशतवाद्यांची एक टोळी लपून बसलेली आहे.
दहशतवाद्यांच्या गोळीबारात झाले जबर जखमी
-
हरिसिंह यांनी आपल्या टीमसोबत सर्च ऑपरेशन सुरू केले. तेवढ्यात दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार सुरू झाला. या गोळीबारामुळे हरिसिंह जबर जखमी झाले.
असे केला दोन दहशतवादी कमांडरचा खात्मा
-
यानंतर हरिसिंह जमिनीवर रांगत-रांगत दहशतवाद्यांच्या जवळ पोहोचले आणि मग एका पायावर उभे राहून अर्धा तास देशाच्या शत्रूंवर गोळ्यांची बरसात केली. हरिसिंह यांच्या या गोळीबारामुळे हिजबुल मुजाहिद्दीनचा पीर पंजाल इलाख्याचा डिव्हिजनल कमांडर आबू अहमद तुर्की आणि एरिया कमांडर अबू हमजा यांचा खात्मा झाला. आणि शत्रूला यमसदनी पाठवूनच हा बहादूर जवान शहीद झाला.
शहिदाच्या लहान बहिणीने सांगितल्या आठवणी...
शहीद लेफ्टिनंट हरिसिंह बिष्ट यांची लहान बहीण मोनिका बिष्ट यांनी DivyaMarathi.Com शी बातचीत केली आणि आपले मोठे भाऊ लेफ्टिनंट हरिसिंह बिष्ट यांच्या आयुष्याशी निगडित अनेक इंटरेस्टिंग किस्से शेअर केले.
पुढच्या स्लाइड्सवर वाचा, हरि सिंह यांचे आईवडील त्यांना डॉक्टर बनवू इच्छित होते, पण त्यांनी जॉइन केली आर्मी...
मध्यमवर्गीय कुटुंबात झाला जन्म
-
मोनिका सांगतात, "मोठे भाऊ लेफ्टिनेंट हरिसिंह बिष्ट यांचा जन्म 31 डिसेंबर 1974 रोजी उत्तराखंडच्या अल्मोड़ा जिल्ह्यातील डोबा गावात एका मिडल क्लास कुटुंबात झाला होता."
- "
वडील पूरन सिंह आर्मीत होते आणि आई शान्ति देवी गृहिणी. चार भावाबहिणींत हरिसिंह सर्वात मोठे होते. त्यांचे बालपण लखनऊमध्ये गेले. प्राथमिक शिक्षण डेहराडूनमध्ये झाले. मग 10वी ते 12वीपर्यंतचे शिक्षण लखनऊच्या केंद्रीय विद्यालयातून घेतले."
आईने डॉक्टर बनवण्याचे पाहिले स्वप्न...
-
मोनिका सांगतात- "वडील आर्मीत होते, म्हणून आईला मुलानेही आर्मी जॉइन करावी असे वाटत नव्हते. त्यांची इच्छा होती की, मुलाने डॉक्टर बनावे."
- "
आईच्या इच्छेसाठी हरि सिंह यांनी सीपीएमटीची परीक्षा दिली आणि त्यात सिलेक्ट झाले, परंतु त्यांनी मेडिकलमध्ये अॅडमिशन घेतले नाही."
आर्मी स्कूलमध्ये शिकवलेही...
- "
त्यांनी आईला स्पष्ट शब्दांत सांगितले, तुमची इच्छा होती म्हणून मी मेडिकलच्या परीक्षेला बसलो. मला डॉक्टर बनायचे नाही. मला देशाचा सैनिक बनायचे आहे."
- "
तुम्ही मला एक संधी द्या. त्यानंतर 1996 मध्ये त्यांची निवड आर्मी स्कूलमध्ये शिक्षक म्हणून झाली. तेथे त्यांनी काही दिवस अध्यापनही केले."
असे पूर्ण झाले आर्मीमध्ये जाण्याचे स्वप्न...
-
मोनिका म्हणाल्या, "वडिलांच्या सांगण्यावरून शिक्षकाचा जॉब सोडून हरिसिंह सीडीएसची तयारी करू लागले. यादरम्यान त्यांची निवड एमबीएमध्ये झाली, परंतु त्यांनी त्यासाठीही नकार दिला."
-
मोनिका म्हणाल्या- "हरिसिंह यांची आर्मी जॉइन करण्याची इच्छा 4 ऑगस्ट 1998 रोजी पूर्ण झाली. त्यांची निवड आर्मी ऑफिसर म्हणून झाली."

आईवडील झाले आनंदित
- "
दीड वर्षाच्या ट्रेनिंगनंतर 11 डिसेंबर 1999 रोजी त्यांनी गोरखा रायफल्समध्ये आर्मी ऑफिसरच्या ड्यूटी जॉइन केली. त्या वेळी आईवडील खूप आनंदित झाले होते."
- "
त्यांना या गोष्टीचा सर्वात जास्त आनंद होता की, त्यांचा मुलगा कठोर मेहनतीने या पदावर पोहोचला आहे. 16 जानेवारी 2000 रोजी हरिसिंह शहाजहांपुराच्या गोरखा रायफल्समध्ये ड्यूटी करण्यासाठी रवाना झाले." 
शत्रूशी लढताना झाले शहीद
मोनिका सांगतात "17 जून 2000 रोजी  फक्त 3 दिवसांच्या सुटीवर हरिसिंह अचानक घरी आले होते, कुटुंबासोबत वेळ घालवला आणि परत गेले."
- "ड्यूटीवर जाताना आईला त्यांनी वचन दिले होते की, डिसेंबरमध्ये एका महिन्याची रजा घेऊन घरी येईन, पण घरचे वाट पाहत राहिले आणि हरिसिंह कायमचे आम्हाला सोडून गेले."
राष्ट्रपतींच्या हस्ते मिळाला शौर्य पुरस्कार
-
मोनिका सांगतात- "शत्रूशी शौर्याने लढत शहीद झाल्यामुळे राष्ट्रपतींनी माझे मोठे भाऊ हरिसिंह यांना शौयचक्रने सन्मानित केले."
- "हा पुरस्कार माझी आई शांतिदेवी यांना दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला

No comments:

Post a Comment