भावपूर्ण
श्रद्धांजली
माजी
सुभेदार वसंत परबत महाडिक यांच्या दुःखद निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक आहे.
फैजाबाद
येथे मी अल्फा कंपनीचा कमांडर असताना सुभेदार वसंत महाडिक हे प्रथम माझे कंपनी जेसीओ
आणि नंतर अल्फा कंपनीचे सिनिअर जेसीओ म्हणून कार्यरत होते. त्यांनी अत्यंत कर्तव्यदक्षता,
निष्ठा आणि कार्यक्षमतेने अल्फा कंपनीची जबाबदारी सांभाळली. कंपनीचे प्रशासन उत्कृष्ट
दर्जाचे ठेवण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता.
विविध
व्हीआयपी भेटी, प्रशिक्षण उपक्रम, स्पर्धा आणि इतर महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमध्ये त्यांनी
नेहमीच उत्कृष्ट कामगिरी बजावली.
फैजाबादमधील
अल्फा कंपनी ही बटालियनमधील चॅम्पियन कंपनी म्हणून ओळखली जात होती. त्या यशामागे सुभेदार
महाडिक यांचे परिश्रम, नेतृत्व आणि समर्पण यांचा मोठा वाटा होता.
दार्जिलिंग
येथे सेवेत असताना प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी अकाली सेवानिवृत्ती स्वीकारली. सैन्यदलातील
एक सक्षम, शिस्तप्रिय आणि विश्वासार्ह सिनिअर जेसीओ म्हणून त्यांची ओळख कायम राहील.
त्यांच्या
अकाली निधनाने मी माझा एक विश्वासू सहकारी आणि उत्कृष्ट सैनिक गमावला आहे. त्यांची
कर्तव्यनिष्ठा, विनम्र स्वभाव आणि कार्याबद्दलची बांधिलकी सदैव स्मरणात राहील.
मी त्यांचे
माजी कंपनी कमांडर म्हणून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. महाडिक कुटुंबियांच्या
दुःखात मी मनःपूर्वक सहभागी आहे. परमेश्वर त्यांच्या दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो
व त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो.
ॐ
शांती.
ब्रिगेडियर
हेमंत महाजन
माजी कंपनी कमांडर, अल्फा कंपनी
फैजाबाद

No comments:
Post a Comment