Total Pageviews

Sunday, 11 October 2026

हिंसक आंदोलने आणि तरुणाई : नेत्यांच्या स्वार्थासाठी स्वतःचे भविष्य उद्ध्वस्त करू नका!PART 1

 

महाराष्ट्रात एवढी आंदोलनं का होत आहेत?

•     महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांत विविध समाजघटकांमध्ये राज्यभर अनेक आंदोलनांची लाट पाहायला मिळत आहे.

•     शेतकरी, विद्यार्थी, आदिवासी, महिला, तरुण तसेच विविध राजकीय पक्ष आपापल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले आहेत.

•      महाराष्ट्रात एवढी आंदोलनं का होत आहेत?

शेतकरी आंदोलन

•     शेतकरी कर्जमाफी योजनेतील  अटी शिथिल करण्याची मागणी.

•     नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर आर्थिक मदत देण्याची मागणी.

•     कांद्याला किमान आधारभूत किंमत (MSP) मिळावी यासाठी आंदोलने.

•     शक्तीपीठ महामार्गामुळे सुपीक जमीन जाण्याची भीती असल्याने प्रकल्पाला विरोध.

विद्यार्थी आणि तरुण आंदोलन

•     MPSC परीक्षांमधील विलंब, शुल्क, ऑनलाईन परीक्षा पद्धती आणि कथित अनियमिततांविरोधात आंदोलन.

•     आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील अपुऱ्या सुविधांचा प्रश्न.

•     निवासी डॉक्टर व इंटर्न्सचे वैद्यकीय क्षेत्रातील धोरणांविरोधातील आंदोलन.

•     IIT बॉम्बेत निदर्शने.

•     निवडणूक आयोगाच्या SIR प्रक्रियेत आंदोलने.

 

 

•     महिला आणि आरक्षण विषयक आंदोलन

•     ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून वगळलेल्या महिलांचा निषेध.

•     महिलांच्या सुरक्षेसाठी आणि लैंगिक अत्याचार पीडितांना न्याय मिळावा यासाठी आंदोलने.

•     मराठा आरक्षणासाठी आंदोलन.

•     ओबीसी, धनगर आणि बंजारा समाजांच्या आरक्षणा संदर्भातील मागण्या.

 पर्यावरण, विकास आणि स्थानिक प्रश्न

•     पुणे-नाशिक रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी रास्ता रोको.

•     नाशिकमधील वृक्षतोडीविरोधी आंदोलन.

•     सण-उत्सवांतील डीजे संस्कृतीविरोधातील नागरिकांचा आवाज.

•     ठाण्यातील प्रस्तावित हायपरस्केल डेटा सेंटरच्या पर्यावरणीय परिणामांविषयी चिंता.

 

 

नकारात्मक परिणाम

•     १. आर्थिक नुकसान

•     रास्ता रोको, बंद आणि मोठ्या आंदोलनांमुळे व्यापार, वाहतूक व उद्योगांवर प्रतिकूल परिणाम होतो.

•     २. सामाजिक ध्रुवीकरण

•     आरक्षण आणि जातीय प्रश्नांवरील आंदोलने समाजातील विविध समूहांमध्ये संघर्ष वाढतात.

•     ३. प्रशासनावर ताण

•     कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ व संसाधने खर्च करावी लागतात.

•     ४. गुंतवणुकीवर परिणाम

•     सततची अस्थिरता आणि आंदोलनांचे वातावरण राज्याच्या विकास व गुंतवणुकीच्या प्रतिमेवर परिणाम करतात.

•     5. पर्यावरण आणि विकासातील संघर्ष

•     विकास प्रकल्पांना विरोध ही केवळ महाराष्ट्राचीच नव्हे तर संपूर्ण देशाची समस्या बनली आहे. वृक्षतोड, पर्यावरणीय परिणाम, पाण्याचा वापर आणि स्थानिक संसाधनांवरील ताण. त्यामुळे विकास आणि पर्यावरण यांच्यातील संतुलनाचा प्रश्न.

 

सर्वप्रथम फटका सामान्य जनतेला

•     रस्ता बंद झाला, वाहतूक वळवली गेली किंवा सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली, की कामावर जाणाऱ्या व्यक्तीचा दिवस बिघडतो. वेळेवर कार्यालयात पोहोचता येत नाही, रोजंदारीवर काम करणाऱ्याचा दिवसाचा रोजगार जातो, तर छोट्या व्यापाऱ्याची विक्री घटते.

•     स्वतःचे वाहन, पर्यायी मार्ग किंवा घरून काम करण्याची सोय नसलेल्या नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो.

•     मोठ्या आंदोलनांमुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च वाढू शकतो. रस्ते अडवले गेले तर बस, टॅक्सी, मालवाहतूक आणि इतर सेवा प्रभावित होतात.

•      अशा अडथळ्यांचा परिणाम फक्त आंदोलनस्थळापुरता मर्यादित राहत नाही; पुरवठा साखळीतील विलंबामुळे दुकाने, बाजारपेठा आणि सेवा क्षेत्रालाही फटका बसू शकतो.

•     २०२६ मधील दिल्लीतील आंदोलनाच्या काळात मेट्रो व इंटरनेटवरील निर्बंधांमुळे प्रवासी आणि लहान व्यवसायांच्या दैनंदिन व्यवहारांवर परिणाम झाल्याचे वृत्तांत नोंदवले गेले; हे उदाहरण आंदोलन आणि त्यावरील निर्बंध या दोन्हींचा सामान्यांच्या जीवनावर होणारा परिणाम दाखवते

 

हिंसक आंदोलने आणि तरुणाई

•     सामान्य घरातील आणि ज्यांच्यावर संपूर्ण कुटुंबाच्या आशा केंद्रित असतात, अशा तरुणांनी कोणत्याही आंदोलनात सहभागी होताना शंभरवेळा विचार करायला हवा. कारण, संकटसमयी कोणताही नेता त्यांच्या मदतीला येत नाही.

•     कारण, त्यांचे काम झालेले असते. तरुणांनी या सगळ्याचा विचार एकदा तरी अगदी शांत डोक्याने करायला हवा! बदलाची सुरुवात होते तरुणांपासून. त्यांनी प्रथम ‘जबाबदार नागरिक’ बनण्याची गरज आहे.

•     कुणाच्याही हातातील बाहुले होऊ नका...

•     तरुणांनी कुणाच्याही हातातील बाहुले होऊ नये. देशात बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.

•     सरकारी नोकर्‍या आता संपल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रात आता ‘आऊट सोर्सिंग’ सुरू आहे. एकीकडे दरवर्षी एक ते दीड कोटी सुशिक्षित तयार होत आहेत आणि दुसरीकडे रोजगाराच्या संधीचे आकुंचन होत आहे. त्याचा परिणाम म्हणून तरुणाईतील अस्वस्थता वाढून तो हिंसक होत आहे.

•      नेमका याचाच फायदा अनेक संस्थांचे नेतेमंडळी, राजकारणी घेत आहेत. या बेकार, बेरोजगार तरुणांची माथी भडकावून त्यांच्या माध्यमातून आंदोलने वगैरे केली जातात.

•     हिंसाचार केला, की सर्व समस्या सुटतील असे चित्र तरुणांना दाखविले जाते. हिंसाचारातून आंदोलन करणार्‍या तरुणांच्या हाती काही लागणार नाहीच, उलट त्यांचे करिअर बरबाद होण्याचा धोका असतो.

 

 

तरुणांचे चारित्र्य तपासले जाते

•      नोकर्‍या करायच्या असतील तर तिथे गुणवत्ता पाहिजे आणि केवळ गुणवत्ताच नाही तर तुमचा ‘चारित्र्य’ /‘ट्रॅक रेकॉर्ड’ चांगले पाहिजे. कंपन्या कर्मचार्‍यांची नियुक्ती करताना त्याचे ‘चारित्र्य’ कसे आहे, हे आधी तपासून घेत असतात. त्यांच्या विरोधात कुठे गुन्हे दाखल तर नाही ना, याची खातरजमा केली जाते. युवकांनी हे ध्यानात घ्यायला हवे.

•     स्वत: वातानुकूलित कक्षात बसून आंदोलन भडकविणारे नेते कायम सुरक्षित असतात. मरण होते ते त्यांच्या उचकावण्याने रस्त्यावर उतरून हिंसाचार करणार्‍या तरुणांचे. त्यांच्यावर खटले चालतात आणि पुढची अनेक वर्षे मग या तरुणांना न्यायालयाच्या वार्‍या कराव्या लागतात.

•     जोपर्यंत खटल्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत ते आरोपी असल्यामुळे त्यांना नोकरी मिळत नाही. हिंसक आंदोलनांमुळे नोकर्‍यांची संधी कायमची हिरावली जाते.

शेकडो तरुणांवर खटले आज पण सुरू

•     मागच्या अनेक वर्षांमध्ये झालेल्या अनेक हिंसक आंदोलनात शेकडो तरुणांवर खटले दाखल झाले. अजूनही त्यांचा निकाल लागलेला नाही. आरोपी तरुण प्रत्येक तारखेला हातचे तात्पुरते मिळालेले काम टाकून न्यायालयात हजर होतात.

•     वकिलाला शेकडो रुपये देतात. त्यांच्या येण्या-जाण्याचा खर्च वेगळाच. बहुतेक तरुणांना हजारो रुपये खर्च करावा लागतो आणि बदल्यात काय मिळाले, तर काहीच नाही.

 

 

•     त्यांचा वापर करून नेतेगिरी करणार्‍यांनी आपल्या अनेक पिढ्यांची काळजी मिटेल इतकी कमाई केली असते आणि गरीब युवक चहाची टपरी, पानाचे दुकान, वडापावची गाडी, कुठेतरी दोन-चार हजार पगारावर वेठबिगारीसारखे काम करणे किंवा मजुरी करणे त्यांच्या नशिबी असते.

•     जातपात, धर्म, भाषा, अशाच कोणत्या तरी अस्मितेच्या मुद्द्यावर तरुणांची माथी भडकविली जातात आणि दुर्दैवाने तरुण मंडळीदेखील अशा भडकविण्याला बळी पडतात आणि आपले पुढचे आयुष्य बरबाद करून घेतात.

•     अशा आंदोलनात आजपर्यंत कोणत्या नेत्यांची तरुण मुले सामील झाली आहेत आणि झाली असली तर त्यांच्यावर किती खटले दाखल झाले आहेत? असे खटले दाखल झाले तर ते लढण्यासाठी किंवा निपटण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर वेळ आणि पैसा असतो. कुटुंबाचे पोट भरणे ही काही त्यांची समस्या नसते.

•     न्यायालयातल्या खटल्यांपायी अनेक कुटुंबे बरबाद होतात. सामान्य घरातल्या तरुणांना हे कधीच परवडणारे नसते. परंतु, तरुण रक्त उसळ्या मारते, व्यावहारिक जगाची दाहकता त्याच्या अनुभवास येते तेव्हा तो असा काही शांत होतो, पुन्हा रस्त्यावर उतरण्याची भाषादेखील करत नाही.

•      परंतु, तोपर्यंत उशीर झालेला असतो. त्यांचे करिअर बरबाद झालेले असते. तुटपुंज्या कमाईत कुटुंबाचे पोट भरावे की कोर्ट-कचेरीचा खर्च भागवावा हेच त्याला कळत नाही.

 

 

No comments:

Post a Comment