Total Pageviews

Friday 28 December 2018

प्रिय भारतीय नागरिक,*-PLEASE REGISTER YOUR SELF AS VOTER



*भारताचे नागरिक म्हणून आपले प्रथम कर्तव्य आहे ते म्हणजे जागरूक व देशासाठी काम करणारे लोक प्रतिनिधी नियुक्त करणे. यासाठी आपण आपले मतदानाचे परमकर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे व यासाठी आपले नाव मतदार यादीत असणे आवश्यक आहे. आपले नाव यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी खाली दिलेली लिंक क्रोमवर ओपन करा व मतदान ओळखपत्र असेल तर त्याचा क्रमांक टाकून तपासा किंवा नावनिहाय तपासण्यासाठी आपले नाव इंग्रजीत टाकून तपासून पहा.*


*यादीत नाव नसेल तर वरील लिंकवर होम पेजवर जाऊन तक्रार नोंदवावी. नवीन नाव नोंदणीसाठी फॉर्म नंबर 6 तसेच नाव नोंदणी झालेली आहे पण यादीत नसेल तर फॉर्म नंबर 7 भरावा. या ऑनलाईन नोंदणीचा संदर्भ क्रमांक लिहून ठेवावा.*

*मतदान हे राष्ट्र उभारणीसाठीचे आद्य कर्तव्य असल्याने NOTA चा वापर करुन नकारात्मक न होता उपलब्ध पर्यायात राष्ट्राचा प्रामुख्याने विचार करणाऱ्यांचा विचार करावा. NOTA च्या पर्यायाने तुम्हाला उमेदवार पसंत नसले तरी नको असणाऱ्याचाच फायदा होतो. मतदान करताना याचा व राष्ट्राचा गांभीर्याने विचार करा व न चुकता मतदान करा. अन्यथा निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींबद्दल तक्रार करण्याचा आपणांस नैतिक अधिकार राहणार नाही.*

No comments:

Post a Comment