Total Pageviews

Monday 13 August 2018

लंडनमधील ट्रफाल्गर स्क्वेअरयेथे होत असलेल्या खलिस्तानवाद्यांच्या एकत्र येण्याला भारताने कडाडून विरोध


-पाकिस्तानी मुळाचे लंडनचे महापौर सादिक खान यांनी प्रो खालिस्तान सम्मेलनाला/ मेळाव्याला (रॅलीला) ट्रॅफ़ेलगार उपनगरात भरवण्याची परवानगी दिली. मात्र त्याच दिवशी एक ते चार वाजायच्या मध्ये भारताच्या बाजूने असलेल्या  सम्मेलनाला मात्र परवानगी नाकारली. कारण सांगण्यात आले की त्यांनी ही परवानगी वेळेवर मागितली नव्हती.खलिस्तानसाठी मेळावा"लंडन डिक्लेरेशन" नावाने ओळखली जातो आणि अमेरिकेत स्थित सीख फॉर जस्टिसया संस्थेने तो आयोजित केला होता. या बैठकीचा मुख्य उद्देश होता की 2020 मध्ये जगभर सार्वमत घेतले जावे आणी भारतातील पंजाबला स्वातंत्र्य मिळावे.
लंडन भारतियांनी प्रो खालिस्तान सम्मेलना विरुद्ध "आम्ही भारतीय" म्हणून एक संस्था सहा महिन्यापूर्वी उभारली. त्यांनी ठरवले की 15 ऑगस्टच्या निमित्ताने ते भारताचा स्वातंत्र्यदिन लंडनमध्ये साजरा करतील. मात्र या बैठकीला लंडनचे महापौर पाकिस्तानी मूळचे सादिक खान यांनी परवानगी दिली नाही.त्यांच्या या कारवाईला भारत विरोधी मानले जावे. लंडनला निरोप देण्याची गरज आहे की जर तुम्ही एका पाकिस्तानी मूळ नागरिकांमुळे जर भारतविरोधी तत्त्वांना समर्थन देणार असाल तर आम्हाला हे आवडत नाही. यामुळे भारत आणि ब्रिटन यांचे संबंध खराब होऊ शकतात. लक्षात ठेवा की आम्ही पण ब्रिटन विरोधी कारवायांना भारतात प्रसिद्धी देऊ शकतो. हे आपल्याला आवडेल का? फैसला करा की तुम्हाला लंडनचे महापौर सादिक खान  महत्त्वाचे आहेत की भारत ब्रिटन संबंध?
पाकिस्तानी अधिकारी युरोपातील खलिस्तानवादी आंदोलनाचा सूत्रधार
स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीसाठी कॅनडा आणि युरोपात सुरू असलेल्या रेफरेंडम २०२० या मोहिमेसाठीच्या आंदोलनाचा सूत्रधार एक पाकिस्तानी लष्करी अधिकारी असल्याचे समोर येत आहे.भारतविरोधी भूमिका घेत वेगळ्या खलिस्तान चळवळीला खतपाणी घालणारा हा अधिकारी पाकिस्तानी सैन्यात चौधरी साहब म्हणून प्रसिद्ध आहे.
पाकिस्तानी सैन्यातील चौधरी साहब अर्थात लेफ्टनंट कर्नल शाहिद मोहम्मद मलही हा अधिकारी युरोपात नव्याने सुरू झालेल्या खलिस्तानवाद्यांच्या भारतविरोधी आंदोलनाचा सूत्रधार आहे.चौधरीच्या पर्सनल कॉम्प्युटरमधून त्यांना काही दस्तऐवज आढळून आले आहेत. ज्यामध्ये रेफरेंडम २०२० चळवळीचा विस्तृत आराखडा सापडला आहे. या मोहिमेच्या मागे अमेरिकेतील सीख फॉर जस्टिसही संस्था आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय या मागणीची मुख्य सूत्रधार असल्याची काही कागदपत्रे हाती लागली आहे. त्यानुसार, आयएसआय पाकिस्तानसह जगातील इतर काही ठिकाणच्या संघटनांसोबत काम करीत आहे.
दरम्यान, २०१५मध्ये कथित चौधरी साहब हा अधिकारी आयएसआयच्या लाहोर तुकडीचे नेतृत्व करीत होता. गेल्या दोन वर्षांत पंजाबमध्ये झालेल्या हिंदू नेत्यांच्या हत्यांमध्येही या चौधरीचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.आयएसआयने युरोपात सुरू असलेल्या रेफरेंडम २०२०ला ऑपरेशन एक्स्प्रेसअसे नाव देण्यात आले आहे.
चौधरीने आपल्या वरिष्ठांशी झालेल्या चर्चेत ६ जून २०२०मध्ये हे रेफरेंडम २०२० सुरू करण्यात येणार आहे. हा दिवस पंजाबमध्ये माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी राबवलेल्या ऑपरेशन ब्लू स्टारया मोहिमेला ३५ वर्षे पूर्ण होत आहेत. सध्या या रेफरेंडम २०२०चे नेतृत्व अमेरिकेतील शिखांची संघटना सीख फॉर जस्टिसकरीत आहे.
12 ऑगस्ट रोजी लंडनमधील ट्रफाल्गर स्क्वेअरयेथे होत असलेल्या खलिस्तानवाद्यांच्या एकत्र येण्याला भारताने कडाडून विरोध केला आहे. याआधीही भारताने हा प्रस्तावित मोर्चा होऊ नये अशी मागणी इंग्लंडकडे केली आहे. मात्र इंग्लडने तसे करण्यास नकार दिला. यावर भारताने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.
हा मोर्चा म्हणजे भारताच्या प्रादेशिक एकात्मतेला धोका पोहोचेल असे फुटिरतावाद्यांनी केलेले कृत्य आहे अशा शब्दंमध्ये भारताने म्हटले आहे. हे प्रकरण पुन्हा इंग्लंड सरकारकडे लेखी व प्रत्यक्ष भेटून मांडण्यात येईल . ही निदर्शने हिंसा आणि द्वेषाला खतपाणी देण्यासाठी होणार असल्याचेही भारताने म्हटले आहे.

आपल्या दोन्ही देशांच्या संबंधांचा विचार करुन इंग्लंडने अशी प्रकरणे हाताळावीत असे कुमार यांनी म्हटले आहे. याआधीच भारताने इंग्लंडकडे पत्राद्वारे आणि दोन बैठकांमध्ये हा मुद्दा उपस्थित करुन निदर्शनांना परवानगी देऊ नये अशी विनंती केली होती. मात्र इंग्लंड सरकारने कायद्याच्या चौकटीत राहून निदर्शने करण्याचा इंग्लंडच्या नागरिकांना अधिकार आहे असे उत्तर दिले होते. यावर भारताचे समाधान झालेले नाही.

खलिस्तानच्या निर्मितीसाठी जनमताची चाचणी घेण्यात यावी यासाठी अमेरिकेतील सीख फॉर जस्टीस संस्थेने ही रॅली आयोजित केली आहे. त्यांना पाकिस्तानातील काही संस्थांकडूनही पाठिंबा मिळालेला आहे.
सिख फॉर जस्टीसच्या रॅलीमध्ये 2020 साली 
शीखांचे सार्वमत घेण्याबद्दल विचार होणार आहे. या सार्वमतामध्ये 3 कोटी शीख सहभाग घेतील आणि स्वतंत्र खलिस्तानसाठी मतदान करतील असे सीख फॉर जस्टीसने जाहीर केले आहे. भारतातील शीखांनाही यामध्ये सहभाग घेता येईल असे या संघटनेने म्हटले आहे.
80 च्या दशकातील खलिस्तानची चळवळ भारतातून नष्ट करण्यात आली असली तरी इंग्लंड, कॅनडासारख्या देशांमध्ये काही मोजक्या लोकांनी खलिस्तान प्रश्नाचा निखारा जपून कायम धगधगत ठेवला आहे. यामुळे भारत आणि कॅनडा यांच्या परस्परसंबंधांवर अनेकदा परिणाम झाला आहे.
रविवारी 12 ऑगस्ट 2018 रोजी म्हणजे उद्याच एक जंगी सभा लंडनमधील ट्राफल्गार स्क्वेअरया भव्य चौकात भरवली जाणार आहे. ती भरविण्यास परवानगी देऊ नये यासाठी भारताने ब्रिटन (युके)कडे गेला महिनाभर पाठपुरावा चालवला आहे. मात्र हा लेख लिहून होईपर्यंत तरी ब्रिटनने या विनंतीला प्रतिसाद दिलेला नाही. आहे तरी कसली ही सभा?
ब्रिटन, अमेरिका (युनायटेड स्टेट्स) आणि पॅनडा या देशांमधून त्या सभेसाठी विशिष्ट समुदायातील लोकांचे जथेच्या जथे येणार आहेत. कोण असतील हे लोक?
या दोन प्रश्नांची उत्तरे भारतीय स्वातंत्र्योत्तर इतिहासातील दोन अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या हत्या आणि एक अत्यंत कर्तव्य कठोर कायदेशीर सशस्त्र कारवाई यांची स्मृती चाळवणाऱया आहेत. 1984 साली अमृतसर येथील सुवर्णमंदिराच्या प्रांगणात आणि इमारतीच्या तळघरात लष्कर घुसवून भारत सरकारने खलिस्तानया स्वतंत्र शीख राज्याची मागणी करणाऱया फुटीरतावादी दहशतवाद्यांचा पुरता बीमोड केला होता. त्यानंतर त्या कारवाईचा धाडसी निर्णय घेणाऱया पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शीख शरीरक्षकांनीच त्यांची हत्या केली होती. ऑपरेशन ब्लू स्टारया नावाच्या त्या धडक कारवाईचे नेतृत्व करणारे निवृत्त लष्करप्रमुख जनरल वैद्य यांचीही हत्या करण्यात आली होती. मात्र त्यानंतर खलिस्तानने भारतात पुन्हा डोके वर काढले नाही. पण  ‘खलिस्तानच्या फुटीरतावादी मागणीने वाटोळ्या पृथ्वीच्या पश्चिमेकडे जोर धरला आहे. इतकी वर्षे ही भावना मनात जागती ठेवणारे जगभरात विखुरलेले शीख लोक याच मागणीसाठी चलो ट्राफल्गार स्क्वेअरअशा घोषणा देत रविवारी लंडनमध्ये गोळा होऊ पहात आहेत. त्यांना तेथे जमू देऊ नये अशी विनंती आणि आवाहन भारत सरकार गेला महिनाभर करत आहे.
या संबंधातील बातमी काही इंग्रजी वृत्तपत्रांनी या आठवडय़ाच्या प्रारंभी दिली. याचा अर्थ खलिस्तानचा म्होरक्या जर्नेलसिंग भिंद्रनवाले याचे पारिपत्य करून या फुटीर सशस्त्र आंदोलकांच्या नांग्या मोडल्यानंतर आज पस्तीस वर्षांनीही त्या नांग्यांची वळवळ सुरू आहे.
11 सप्टेंबर 2001 रोजी झालेल्या अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यानंतर जगातील सर्वच राष्ट्रांनी दहशतवादाच्या विरोधात कठोर पावले उलचण्यास प्रारंभ केला, त्यानंतर या खलिस्तानवाद्यांनी आपला पवित्रा बदलून स्वतंत्र राज्याची उघड मागणी करण्याचे बाजूला ठेवले. त्याऐवजी ते शीखांवर होणारा अन्याय आणि अल्पसंख्यकांचे अधिकार याबद्दल बोलू लागले. त्यातच पंजाबातील अकाली दलाच्या सरकारच्या कारकिर्दीत बेरोजगारी आणि ड्रग माफियांचा उदय या समस्यांनी गेली दहा वर्षे थैमान घातले. पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यापासून या समस्या काबूत येऊ लागल्याचा दावा पंजाबचे मुख्यमंत्री पॅप्टन अमरिंदरसिंग यांनी केला आहे.
परदेशात विखुरलेल्या शीख समुदायाने आपल्या मनातून स्वतंत्र शीख राज्याची कल्पना चांगलीच जोपासली आहे. खरे म्हणजे ही कल्पना ऑपरनेशन ब्लू स्टारच्या आधीपासून आहे. ब्रिटीशकालीन भारतात स्वतंत्र मुस्लिम राष्ट्रवादाचा उदय झाल्यानंतर बऱयाच वर्षांनी शीखांची प्रतिक्रियावादी मनोभूमिका आकारास आली. शीख राष्ट्रवादाला खतपाणी घालणारे लहान लहान गट ब्रिटन,
पॅनडा आणि अमेरिकेत 1960 च्या दशकात तयार होऊ लागले, त्याचीच परिणती पुढे भारतातील हिंसक खलिस्तान चळवळीत झाली. सुवर्ण मंदिरातील कारवाईनंतर खलिस्तान संपले असे आपल्याला वाटत असले तरी शीख राष्ट्र राज्यही कल्पना उराशी बाळगून भारतविरोधी शीख मंच तयार करण्याचे काम पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये सुरू आहे.  
आकाराने दुसऱया क्रमांकाचा विस्तार असलेल्या ओंटारिओ या पॅनडातील प्रांताच्या विधीमंडळात सुवर्णमंदिरातील कारवाई आणि इंदिराजींच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलया दोन्ही गोष्टी म्हणजे जेनोसाईडअर्थात वंशिक कत्तली होत्या अशी ओळख त्या घटनांना मिळवून देण्यात हे खलिस्तानवादी यशस्वी ठरले.
असले ठराव मंजूर करणाऱया पाश्चात्य देशातील राजकारण्यांना खलिस्तान काय आहे हे माहीत नाही अशातला भाग नाही. पंजाब हे काश्मीरच्या शेजारचे राज्य आहे, आणि स्वतंत्र काश्मीरला सक्रिय पाठिंबा देणारा खलिद आवान हा पकिस्तानी वंशाचा पॅनेडियन नागरिक खलिस्तान कमांडो फोर्सला शस्त्रपुरवठा केल्याचा आरोप सिद्ध होऊन अमेरिकेतील तुरुंगात 14 वर्षांची सजा भोगत आहे. तरीही तेथील सरकारे खलिस्तानवादी लोकांच्या नियोजित सभेला अटकाव करण्याच्या भारताच्या विनंतीचा विचार करत नाहीत. त्या सभेत जोरदार आवाज उठवून 2020 मध्ये स्वतंत्र पंजाबच्या निर्मितीसाठी सार्वमत घेतले जावे असा ठराव संमत करावयाचा आहे आणि तो युनोत पाठवण्यात येणार आहे. भारत व जगातील वीस शहरांत सार्वमत घ्यावे आणि 50 लाख मतांचा त्याला पाठिंबा मिळवावा अशी धडपड सुरु आहे.
पंजाब स्वतंत्र झाल्यास स्वतंत्र काश्मीर निर्माण करणे सोपे जाईल अशी अटकळ बांधून काश्मीर फुटीरतावादी खलिस्तानला पाठिंबा देत आहेत. म्हणून लंडनच्या ट्राफल्गार स्क्वेअरमध्ये भरवण्यात येणाऱया जंगी सभेला अनुमती नाकारावी अशी विनंती भारत सरकार, भारताचे परराष्ट्र मंत्रालय आणि भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त या तिघांनीही स्वतंत्रपणे केली आहे. तरीही त्याकडे ब्रिटन गांभीर्याने पाहत नाही. खलिस्तानवादी आणखी सक्रिय झाले आहेत. भारतीय उच्चपदस्थांवर खटले भरण्याचेही प्रयत्न त्या देशांमधील शीखांनी केले. आपल्या देशातील नवी पिढी मात्र खलिस्तान प्रकरणाला बरीच वर्षे होऊन गेल्यामुळे या सर्वच प्रकरणांबाबत अनभिज्ञ आहे. तिला सजग केले पाहिजे, नाहीतर येणाऱया काळात उत्तरेकडील दोन भयंकर फुटीर शक्ती हातमिळवणी करून भारताचे मोठे लचके तोडतील!





No comments:

Post a Comment