Total Pageviews

Sunday 12 August 2018

जे देशासाठी लढले !-कनाथ आव्हाड


आमच्या स्काऊटचं ब्रीदवाŠयच आहे , `सदैव तय्यार’ आणि आम्ही प्रत्येक स्काऊट असतो स्वावलंबी. स्वतः चं काम स्वतःच करणार. आणि मला येतात बरं शर्टाला बटणं लावायला. तुला आज दाखवतोच बटणं लावून. आई म्हणाली, मग तर छानच झालं…! पण मला सांग, तुझा स्काऊटचा कँप वगैरे जाणार आहे का काय ? बाळू उत्साहाने म्हणाला, नाही गं, आता पंधरा ऑगस्ट जवळ आलाय ना.स्वातंत्र्य दिनाला शाळेत आमच्या स्काऊट पथकाचं संचलन आहे. मी स्काऊट पथकाचा कप्तान आहे. आई म्हणाली, व्वा…! छानच झालं की मग.
आई सकाळचं वर्तमानपत्र शांतपणे वाचत बसली होती. तेवढय़ात बाळू त्याचा स्काऊटचा शर्ट हातात घेऊन आईपाशी आला. आणि घाईनेच त्याने आईला विचारले , ए आई,सुई दोर्याचा डबा कुठाय गं? नेहमीच्या जागी दिसत नाही. कुठे ठेवलाय? . आईने वर्तमानपत्रात घातलेली मान वरती न करताच ती म्हणाली, अरे, आता सकाळीच सुई – दोरा कशाला हवाय आता तुला? आत्ताच बसलेय रे पेपर वाचायला. पेपर वाचू दे मला. बाळू नाराजीच्या सुरात म्हणाला, अगं, हे बघ माझ्या स्काऊटच्या शर्टाची चक्क दोन बटणं तुटलीय. आईने मान वर करुन एकवार त्याच्याकडे आणि त्याच्या स्काऊटच्या शर्टाकडे पाहिलं . आणि ती म्हणाली, दे तो शर्ट इकडे. मी देते लावून बटणं. बाळू म्हणाला, अगं, तू वर्तमानपत्र वाचायला आत्ताच बसलीस ना .तू वाच. त्यात व्यत्यय नको. मला फक्त सुई दोर्याचा डबा कुठे आहे तो सांग. मी करतो माझं काम.अगं, आमच्या स्काऊटचं ब्रीदवाŠयच आहे , `सदैव तय्यार’ आणि आम्ही प्रत्येक स्काऊट असतो स्वावलंबी. स्वतःचं काम स्वतःच करणार.आणि मला येतात बरं शर्टाला बटणं लावायला. तुला आज दाखवतोच बटणं लावून. आई म्हणाली, मग तर छानच झालं…! पण मला सांग, तुझा स्काऊटचा कँप वगैरे जाणार आहे का काय ? बाळू उत्साहाने म्हणाला, नाही गं, आता पंधरा ऑगस्ट जवळ आलाय ना.स्वातंत्र्य दिनाला शाळेत आमच्या स्काऊट पथकाचं संचलन आहे. मी स्काऊट पथकाचा कप्तान आहे. आई म्हणाली, व्वा…! छानच झालं की मग. अरे,काल शमीनेच सुई दोर्याचा डबा घेतला होता.तिनेच तो तिच्या पुस्तकांच्या रॅकवर किंवा तिथेच आजूबाजूला घाईने ठेवला असेल बघ. बाळू लगेच आतल्या खोलीत पळाला. थोडय़ाच वेळात, ‘युरेका…युरेका’ असं शोध लागल्यासारखं बडबडावं तसा तो, ‘मिळाला …मिळाला’ असं म्हणतच सुई दोर्याचा डबा घेऊन बाहेर आला. आणि आईजवळच सुई दोर्याने शर्टाला बटणं लावत बसला.
आई पेपर वाचनात गढून गेली. पेपर वाचता वाचता तिचं एका बातमीने लक्ष वेधून घेतलं.
अतिरेक्यांशी  लढताना कौस्तुभ राणे शहीद… उत्तर काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या मोठय़ा कारवाईत महाराष्टजएाचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आले……ही बातमी वाचताना तिचे डोळे पाणावले. बाळूच्या हे लक्षात आले. काय झालं गं आई ? त्याने आईला विचारले. आईने मग बाळूला संपूर्ण बातमी वाचून दाखवली.आई वडिलांचा एकुलता एक मुलगा. त्यांनी ठरवूनच त्याला देशसेवेसाठी सैन्यात पाठवलेले. आणि आज त्याला लढता लढता वीरमरण आले .बाळूही या बातमीने आतून हळहळला. तेवढय़ात दुकानातून वाणसामान आणण्यासाठी गेलेली शमी घरी आली.सामानाची पिशवी टेबलावर ठेवून ती बाळू आणि आईच्या संवादात सामील झाली.
आई म्हणाली, बाळू, शमू, कविवर्य वि.म.कुलकर्णी यांच्या ओळी आठवल्या मला…..
ते देशासाठी लढले , ते अमर हुतात्मे झाले.’
सोडिले सर्व घरदार , त्यागिला मधुर संसार
ज्योतीसम जीवन जगले, ते देशासाठी लढले
……तुम्हांला माहीत आहे का बाळांनो, आपण आता स्वातंत्जएय दिन मोठय़ा आनंदात साजरा करतो. पण लक्षात ठेवा , आपल्याला हे स्वातंत्जएय काही सहजासहजी इंग्रजांच्या तावडीतून मिळाले नाही. त्यासाठी अनेक लहान,थोर,स्त्री, पुरूष सर्वांनीच इंग्रजांविरूद्ध निकराचा लढा दिला. तन, मन, धन अर्पूण देशसेवा केली. प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती दिली. मला ना, माझ्या लहानपणी वाचलेली एक घटना आता आठवतेय. ‘देश हाच देव’ मानणार्या एका बाईची. स्वातंत्र्यपूर्व काळातील ही हकीकत. त्या बाईचे नाव गाव आठवत नाही. घटना खरी खोटी हेही माहीत नाही. पण त्या घटनेतील तपशील मला खूप महत्त्वाचा वाटतो. ती बाई एक आईच होती.तीन मुलं पदरात तिच्या.पती अकाली वारले.त्या माऊलीने आपल्या तिन्ही मुलांचा सांभाळ मोठय़ा जिद्दीने आणि हिमतीने केला. मुलांना चांगलं शिकवलं. उत्तम संस्कार दिले आणि महत्त्वाचे म्हणजे, इंग्रजांची जुलमी राजवट उलथवून टाकण्याचे बाळकडूही पाजले. मुलं मोठी झाली. कर्तबगार झाली. आईचे कष्ट मुलांनी जाणले.आता आपल्या आईला आपण सुखात ठेवू हीच अभिलाषा त्यांच्या मनी . त्या माऊली हे समजताच ती मुलांना म्हणाली, अरे मला सुखात ठेवण्यापेक्षा , आपल्या सर्वांचीच जी आई आहे ती आपली भारतमाता, तिला सुखात ठेवणं, पारतंत्र्याच्या जोखडातून मुक्त करणं अधिक गरजेचं आहे मुलांनो. मोठा मुलगा म्हणाला, आई मी स्वातंत्जएय संग्रमात सामील होतो.आईने त्याची आनंदाने पाठवणी केली .संशस्त्र क्रांतिकारी संघटनेत मोठा मुलगा सामील झाला.इंग्रजांवर हल्ले करणे.त्यांच्या योजना उध्वस्त करणे.यासारख्या अनेक गोष्टी त्याने निडरपणे केल्या. एका कटात मात्र इंग्रजांच्या हाती तो लागला.इंग्रजांनी त्याला फासावर चढवले. ही बातमी वार्यासारखी जिकडेतिकडे पसरली. त्या मातेपर्यंत आली. आजूबाजूच्या बायका त्या मातेचं सांत्वन करण्यासाठी आल्या.तेव्हा ती माता म्हणाली. देशाला स्वातंत्जएय मिळवण्यासाठी माझा मुलगा इंग्रजांशी लढला. हुतात्मा झाला. याचं मला दुःख नाही. उलट मनात समाधान आहे.तेव्हा माझे सांत्वन करण्याची काहीच गरज नाही. उलट आता माझा मधला मुलगा इंग्रजांशी लढा देईल.त्याच्या मोठय़ा भावाची अर्धवट कामगिरी आता तो पूर्ण करील. व्यर्थ न हो बलिदान. बायका आल्या तशा त्या माउलीचे हे उद्गार ऐकून निघून गेल्या. मधला मुलगा इंग्रजांविरूद्धच्या क्रांतिकारक लढय़ात सामील झाला. नंतरच्या काही महिन्यातच हा मधला मुलगा इंग्रजांच्या बेछूट गोळीबार हल्ल्यात मृत्यूमुखी पडला. देशासाठी शहीद झाला. आजूबाजूच्या बायका पुन्हा त्या मातेचं सांत्वन करण्यासाठी घरी आल्या. ती माता पुन्हा म्हणाली, माझ्या दोन पुत्रांना भारतमातेला स्वतंत्र करताना वीरमरण आले. शेवटच्या oशासापर्यंत ते लढले पण इंग्रजांना शरण गेले नाही, याचा मला आनंद आणि अभिमान वाटतो . मी धन्य झालेय.आणि अजून माझा धाकटा मुलगा आहे की, आता तो उडी घेईल स्वातंत्जएय संग्रामात.तेव्हा माझे सांत्वन करण्याची खरंच गरज नाही. बायका पुन्हा पुढे काही बोलता कुजबुजत निघून गेल्या.
त्या बाईचा सर्वांत धाकटा मुलगा इंग्रजांविरूद्धच्या लढय़ात आता सामील झाला. मात्र वर्षभरातच तो इंग्रजांच्या हाती लागला.गुप्त क्रांतिकारक संघटनेत होता तो. जयहिंद, वंदे मातरम् चा जयघोष करत हसत हसत तो फासावर चढला. त्या मातेला ही गोष्ट कळली. तशी शेजार्यांनाही कळली. आता पुन्हा त्या शेजारच्या बायका आल्या आणि त्या मातेला म्हणाल्या , आता आम्ही आपल्या सांत्वनासाठी आलोय, हे तर ठीक आहे ना?
यावर ती वीरमाता उसासा टाकून म्हणाली, बायांनो, यावेळी मात्र तुम्ही माझे सांत्वन कराच. कारण यावेळी मला खरोखरच खूप दुःख झालेय .पण माझा तिसरा मुलगाही देशासाठी शहीद झाला म्हणून नाही. तर आता यापुढे देशासाठी कामी यायला माझ्याकडे मुलगाच शिल्लक राहिलेला नाही.याचे मला खूप दुःख वाटतेय, म्हणून माझे सांत्वन तुम्ही कराच.आता मात्र त्या बायका एकदम आवाक झाल्या. एकमेकींकडे पाहत राहिल्या त्या मातेशी काय बोलावे त्यांना उमगेनाच.त्या बायांनो त्या वीरमातेला वंदन केले.
शेवटी ती माताच धीराने आणि निश्चयाने म्हणाली. मी हातावर हात ठेवून आता गप्प बसणार नाही. कारण आता तर मला कसलीच अडचण नाही.आता मीच भारतमातेला पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्याच्या आंदोलनात उडी घेणार .देशासाठी काही करण्याची संधी मला मिळतेय हे माझे परमभाग्यच. एवढं बोलून ती वीरमाता निश्चयाने तडक घराबाहेर पडली.
आई त्या थोर मातेची आणि तिची सुपुत्रांची हकिकत मनोभावे सांगत होती आणि बाळू, शमी जीवाचा कान करुन ती हकीकत ऐकत होते. ऐकता ऐकता हृदयात साठवत होते. खरंच धन्य ती वीरमाता आणि धन्य तिचे ते वीर सुपुत्र.


No comments:

Post a Comment