Total Pageviews

Saturday 15 September 2018

१०० टक्के नोटा परत आल्या तरी नोटबंदी यशस्वीच!अर्थपूर्ण : यमाजी मालकर-TARUN BHARAT


सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा आपल्या देशातला धोरणात्मक आणि मोठा बदल आहे. त्याची आपल्याला सवय नाही. पण जेव्हा दुर्धर रोग होतो तेव्हा कधीच ऑपरेशन न झालेल्या पेन्शटला जशी ऑपरेशन करून घेण्याची तयारी करावीच लागते, तसे हे देशावर झालेले ऑपरेशन आहे. नागरिकांच्या सवयी बदलण्यास आणि त्याचे परिणाम होण्यास वेळ लागणारच. सरकारने रद्द केलेल्या ५०० आणि १००० रुपयांच्या १०० टक्के नोटा परत आल्या, तरी नोटबंदी यशस्वी झाली. कारण त्यावर आता कर भरला गेला आणि आता ती एका जागी पडलेली रक्कम बँकेत येऊन प्रवाही झाली. नोटबंदीपूर्वीची वाढ ही रोगट सूज होती, ती जाऊन देश सशक्त होतो आहे आणि दमदार वाटचालीला सज्ज होतो आहे, हे आता अधिक महत्त्वाचे !रिझर्व बँकेचा अहवाल आल्यावर नोटाबंदीविरोधातील हेका न सोडणार्‍यांनी पुन्हा उचल खाल्ली आहे. नोटाबंदी फसली, असा निष्कर्ष काढून काही माध्यमे मोकळी झाली आहेत. या देशाचे आर्थिक व्यवहार कधीच शुद्ध होऊ नयेत आणि निरपेक्ष किंवा पारदर्शी व्यवस्था कधीच उभी राहू नये, असे ज्यांना वाटते, तेच नागरिक नोटाबंदीला विरोध करू शकतात. ज्या सरकारकडे आपल्याला दाद मागायची आहे, ते आर्थिकदृष्ट्या सक्षम असले पाहिजे, बँकिंगचा फायदा जसा आपल्याला मिळतो आहे, तसा तो या देशातील सर्व गरिबांना मिळाला पाहिजे, थोडा त्रास झाला तरी चालेल पण आपल्या देशातील व्यवस्था पारदर्शी झाली पाहिजे, असे ज्यांना वाटते, ते नोटबंदीकडे नकारात्मक दृष्टीने पाहणार नाहीत.
नोटबंदीकडे एक वर्ष १० महिन्यांनी तरी वेगळ्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. ती अशी की, समजा आपल्याला नोटबंदी चुकीची वाटली, तरी हा निर्णय आता देशाचा झाला आहे. मागील दोर आता कापले गेले आहेत. आता पुढेच गेले पाहिजे. जसे गूगलचा नकाशा पाहताना आपण चुकलो तर गूगल नकाशा त्या पुढील मार्ग सांगते, तसा नवा मार्ग निवडला पाहिजे. पण ते न करता आपण जेथून निघालो, तेथेच पुन्हा गेले पाहिजे, असा जो सूर दिसतो आहे, तो सर्वथ: चुकीचा आहे.
५०० आणि १००० रुपयांच्या रद्द केलेल्या १०० टक्के नोटा रिझर्व बँकेत परत आल्या असल्या, तरी नोटबंदी यशस्वी झाली आहे, हे समजून घेतले पाहिजे. उदा. नोटबंदीनंतर १० लाखांपेक्षा अधिक रक्कम बँकेत जमा करणार्‍यांची संख्या आहे ३.०४ कोटी! हा जो पैसा बँकेबाहेर रहात होता, तो बँकेत आला. त्यामुळे त्यांना त्या वर्षात इन्कम टॅक्स भरावा लागला. जो पूर्वी भरला जात नव्हता. काळ्या पैशांची व्याख्या आहे- ‘ज्या पैशाच्या माध्यमातून कर चुकविला जातो, तो काळा पैसा!’ याचा अर्थ त्यावर आता इन्कम टॅक्स भरला गेला म्हणजे तो आता शुद्ध झाला, एवढेच अपेक्षित होते. पण नोटबंदी विरोधकांना कोणाला तरी शिक्षा करावयाची आहे. पण ती प्रकरणे वेगळी आहेत, हे समजून घेतले पाहिजे. प्रत्यक्ष करांत १८ टक्के वाढ झाली आहे, यातच सर्व काही आले. त्यात २.०९ लाख नागरिकांनी प्रथमच इन्कम टॅक्स भरला आहे, ही आकडेवारीही बोलकी आहे.
नोटबंदी विरोधकांचा आवडीचा प्रश्‍न म्हणजे ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करून २००० रुपयांची नोट का काढली? याचे थेट कारण असे आहे की ८६ टक्के चलन काढून घेतले तर आर्थिक व्यवहार पूर्णपणे थांबू शकतात, ते थांबू नयेत, म्हणून केलेली ती तात्पुरती व्यवस्था होती. ज्याला बायपास म्हणता येईल. महामार्गाची दुरुस्ती पूर्ण झाली की बायपास जसा बंद केला जातो, तशी २००० रुपयांची नोट आता व्यवहारातून काढून घेतली जाते आहे. गेल्या सप्टेंबरपासून या नोटेची छपाई थांबविण्यात आली आहे. आणि रिझर्व बँकेच्या ताज्या अहवालानुसार २००० च्या नोटांचे जे ३५० कोटी पिसेस होते, त्यातील फक्त १५.१ कोटी पिसेस आता व्यवहारात राहिले आहेत. ५०० आणि २०० च्या नोटा त्याप्रमाणात वाढविण्यात आल्या आहेत, त्यामुळे आर्थिक व्यवहार सुरळीत सुरू आहेत. पण आपला ना आपल्या रिझर्व बँकेवर विश्‍वास आहे, ना सरकार नावाच्या व्यवपथेवरव्ग कारण आपल्याला फक्त राग व्यक्त करून विषय सोडून द्यायचा आहे. हे सर्व समजून घेतल्यावर, तरीही आपले मत वेगळे असूच शकते. अशावेळी सत्तेवर असलेल्या राजकीय पक्षाला मत न देण्याचा आपला अधिकार लोकशाहीत अबाधित आहे. पण सर्वच यंत्रणांवर अविश्‍वास दाखवून कोणतीच व्यवस्था कोणालाच न्याय देऊ शकणार नाही, हे पक्के लक्षात ठेवले पाहिजे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा आपल्या देशातला धोरणात्मक आणि मोठा बदल आहे. त्याची आपल्याला सवय नाही. पण जेव्हा दुर्धर रोग होतो तेव्हा कधीच ऑपरेशन न झालेल्या पेन्शटला जशी ऑपरेशन करून घेण्याची तयारी करावीच लागते, तसे हे देशावर झालेले ऑपरेशन आहे. नागरिकांच्या सवयी बदलण्यास आणि त्याचे परिणाम होण्यास वेळ लागणारच. मोठ्या नोटा आणि रोखीचा अतिरेक झाल्यावर काय वेळ येऊ शकते, हे जगातील काही देश अनुभवत आहेत. अर्थव्यवस्थेला मोठ्या नोटांमुळे जी रोगट सूज आली होती, ती कमी होऊन देश पुढील भविष्यासाठी सशक्त होण्याची प्रक्रिया या बदलामुळे सुरू झाली, हेही समजून घेतले पाहिजे

No comments:

Post a Comment