Total Pageviews

Sunday 9 September 2018

कर्नाडांचा नक्षलाभिनय महा एमटीबी

गिरीश कर्नाड कलाकार म्हणून सशक्त आणि प्रतिभासंपन्न आहेत. पण ज्यावेळी तुम्ही ‘मी टू अर्बन नक्सल’ची पाटी गळ्यात लटकावता, तेव्हा तुम्हाला टीका-टीप्पणी-आक्षेप-विरोधाला सामोरे जावेच लागेल. तिथे सशक्त-प्रतिभासंपन्न कलाकारामागे तुम्हाला लपता येणार नाही.

गेल्याच महिन्यात पुणे पोलिसांनी राज्यासह देशभरात केलेल्या छापेमारीनंतर पाच नक्षलसमर्थकांना अटक करण्यात आली. वरवरा राव, सुधा भारद्वाज, गौतम नवलखा, वर्नन गोन्साल्विस आणि अरुण परेरा ही त्यांची नावे. शहरी नक्षलवादाच्या आरोपावरून अटक केलेल्या या लोकांच्या हाती जंगली नक्षलवाद्यांसारख्या बंदुका दिसत नसल्या तरी या लोकांची जंगलातल्या नक्षलवाद्यांना नेहमीच साथ-संगत मिळत आली. आपल्या लेखणीच्या, वाणीच्या आणि समाजात मिळणाऱ्या मान-सन्मानाच्या जोरावर या लोकांनी जंगली नक्षलवाद्यांना पुरेपूर मदत केली. चेहऱ्यावर दीन-दुबळ्यांचे कैवारी असल्याचे भाव आणून मिरवणाऱ्या पण प्रत्यक्षात मेंदूत काहीतरी वेगळेच कट-कारस्थान शिजवणाऱ्या या लोकांच्या अटकेनंतर समाजातल्या विशिष्ट वर्तुळात चांगलीच खळबळ उडालीनक्षलसमर्थकांच्या अटकेनंतर लगेचच पुरोगामी, बुद्धिजीवी, लेखक, पत्रकार अशा विशेषणांनी ओळखल्या जाणाऱ्या लोकांनी विरोध दर्शवत ‘मी टू अर्बन नक्सल’ ही मोहीम चालवली. यातून आम्हीही शहरी नक्षली आहोत आणि आम्हालाही अटक कराअसे आव्हान तपास यंत्रणा व सरकारला देण्याचा उद्दामपणा या लोकांनी केलाअशा लोकांतलेच एक नाव म्हणजे गिरीश कर्नाड. गिरीश कर्नाड हे ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त, दिग्गज साहित्यिक, नाटककार, लेखक, कलावंत आणि अभिनेते म्हणून ओळखले जातात. कलेच्या प्रांतात कर्नाडांनी केलेली कामगिरी कौतुकास्पदच नव्हे तर गौरवास्पदही. एका सशक्त, प्रतिभासंपन्न कलाकाराचे सर्वच गुण गिरीश कर्नाडांच्या व्यक्तिमत्वात दिसतात, पण... पण याच गिरीश कर्नाडांच्या व्यक्तिमत्वातील नक्षलसमर्थनाचा अवगुणही गेल्याच आठवड्यात झळकला.  पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त बंगळुरूमध्ये 5 सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच कार्यक्रमात गिरीश कर्नाड यांनी एका विशिष्ट टोळक्यातील बोलभांडांच्या खांद्याला खांदा लावत स्वतःच्या गळ्यात ‘मी टू अर्बन नक्सल’ची पाटी लटकावली. गिरीश कर्नाडांसारख्या एका प्रथितयश कलाकाराने नक्षलसमर्थनाची उघड उघड भूमिका घेतल्याने त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. झाले... गिरीश कर्नाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला अन् तमाम पुरोगामी, बुद्धिजीवी, विवेकवादी वगैरे म्हणवल्या जाणाऱ्या टोळक्याची माथी भडकली. ‘आमच्या’ विरोधात गुन्हा दाखल करण्याची हिंमत होतेच कशी?, अशा आशयाचा सूर आळवत या लोकांनी थेट मोदी सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्या त उभे केले. अर्थात आपण नेमके कशाचे समर्थन आणि विरोध करतोय, याचेही भान नसलेल्या लोकांकडून मोदी, भाजप वा संघविरोधाशिवाय दुसरे काही होऊही शकत नाही, हेही खरेच म्हणा.
 
 
नक्षलसमर्थकांच्या अटकेनंतर एक वर्ग, नक्षल्यांच्या कोणत्या मागण्या देशद्रोहाच्या वर्गात येतात, असे म्हणत नक्षल्यांची बाजू हिरीरीने मांडताना दिसतो. समाजातील वंचित, दीनदुबळ्या, शेतकरी, कष्टकरी, वनवासींच्या हक्क आणि अधिकाराची लढाई दीर्घकाळापासून सुरू आहेनक्षलवादाची चळवळही अशा लोकांचे अधिकार मिळवून देण्यासाठीच सुरू झाल्याचे सांगितले जातेकधीकाळी नक्षल चळवळ तशा प्रकारची असेलही, पण जसजसा काळ पुढे सरकत गेला, तसतसा ज्या गावात नक्षल चळवळीचा जन्म झाला. त्या गावातूनही या चळवळीचे नामोनिशाण मिटलेपुढे देशविघातक शक्तींनी नक्षलवादी चळवळीची सूत्रे हाती घेत आपले मनसुबे तडीस नेण्यासाठी या चळवळीचा वापर सुरू केला. सध्याच्या घडीला नक्षल चळवळीचे नेतृत्व वनवासी, शेतकरी वा कष्टकरी समाजाच्या हाती नसून त्यांचे लागेबांधे थेट चीनपर्यंत पोहोचल्याचे वेळोवेळी उघडही झालेदेशातल्या सर्वच प्रशासकीय व्यवस्था खिळखिळ्या करून अराजक माजवणे, तरुण-तरुणींची माथी भडकावून त्यांना आपल्या गटात सामील करणे, रक्तरंजित क्रांती-सरकार उलथविण्याची षड्यंत्रे रचणे आणि शेवटी माओच्या तत्त्वांना अनुसरून लोकशाही नष्ट करून लालशाही आणणे, हीच नक्षलवाद्यांची योजना असल्याची ढीगभर कागदपत्रे, पुस्तिकाही समोर आल्या.जंगलातले आणि शहरातले असे सगळेच नक्षलवादी याच एका उद्दिष्टपूर्तीसाठी सतत काम करतात. आता ‘मी टू अर्बन नक्सल’चा तमाशा मांडत नक्षलवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या ना ही गोष्ट माहिती नाही का? नक्कीच, नक्षलसमर्थकांना या सगळ्याच गोष्टी पूर्णपणे माहिती आहेतच, तरीही या लोकांना नक्षल्यांना पाठिंबा द्यावासा वाटतो, हे कशाचे लक्षण?
 
 
गिरीश कर्नाड आणि याच माळेतल्या कितीतरी म्होरक्यांनी नक्षल्यांचे समर्थन केलेयाचाच अर्थ त्यांनाही देशातले लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार उलथवण्याची इच्छा आहे, असाच होतो ना? पण ज्या माओची तत्त्वे नक्षल चळवळीचा पाया आहेतत्या माओच्याच देशात या तत्त्वांना फाट्यावर मारल्याचे या लोकांना माहिती नाही काचीनने सुरुवातीला साम्यवादाचा स्वीकार करत जनतेच्या, कामगारांच्या,कष्टकऱ्या च्या हाती सत्तेची चावी राहिल, अशी भूमिका घेतली, पण जसजसा या सगळ्यातलाच फोलपणा लक्षात येत गेला तसतसा चीनने माओची तत्त्वे गुंडाळून ठेवली. कार्ल मार्क्सलाही नक्षलवादी, माओवादी आपला नेताच मानतात. कामगारांचे, कष्टकऱ्याचे, शोषितांचे काही प्रश्न असू शकतात, हा विचारही ज्या काळात कोणी करत नव्हते, त्या काळात मार्क्सने या लोकांचे प्रश्न ओळखून ते जगासमोर मांडले, हे खरेच. पण मार्क्सने या प्रश्नांची कधीही-कोणतीही उत्तरे दिली नाहीत. केवळ विरोधाची भूमिका घेऊन भागत नाही, विरोधानंतर पुढे नेमके काय? याचेही उत्तर द्यावेच लागते! मार्क्सला ते जमले नाही आणि त्याच्या विचारांवर पुढे जाणाऱ्या नाही त्याची उत्तरे देता आली नाही. शिवाय ज्या प्रकारच्या जगाची, देशाची कल्पना मार्क्स आणि माओच्या तत्त्वांना प्रमाण मानणारे करतात, तसा देश वा जग कुठेही अस्तित्वात नाही. उलट जिथे जिथे या तत्त्वांना अनुसरून सरकारे सत्तेवर आलीतिथे तिथे अराजकाशिवाय दुसरे काहीही हाती लागले नाही. समाजातल्या वंचित, पीडितांचे प्रश्न आहेतच. त्यांच्या प्रश्नांकडे पाहून ते सोडविण्याची भावना मनात येणे, हेही स्वाभाविकच. पण हे प्रश्न सोडविण्याचा मार्ग मात्र हिंसेचा असू शकत नाही. देशात लोकशाही आहे आणि लोकशाही मार्गानेच प्रश्नांची सोडवणूक केली जाऊ शकते.नक्षल्यांच्या प्रश्नांबद्दल खरोखर कळवळा असेल तर नक्षल्यांनाही हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पणाचा सल्ला त्यांच्या समर्थकांनी द्यायला हवा. आपले प्रश्न, मागण्या घेऊन लोकांपुढे जायला हवे, लोकशाही मार्गाने निवडणूक लढवायला हवी आणि याच माध्यमातून आपल्या प्रश्नांची सोडवणूकही करायला हवीगिरीश कर्नाड ही गोष्ट करतील का किंवा ही गोष्ट नक्षल्यांना, त्यांच्या संस्था, संघटनांना सांगतील का?  विशेष म्हणजे गिरीश कर्नाड यांची केवळ आताची नक्षलसमर्थनाची कृतीच वादग्रस्त श्रेणीत मोडते, असे नाही. “टिपू सुलतानने फक्त केरळ, तामिळनाडूत कत्तली, बलात्कार आणि धर्मांतर केले, पण त्याने कर्नाटकात आदर्श राज्यकारभार केला. त्यामुळे त्याला धर्मांध म्हणता येणार नाही,” असे तारेही गिरीश कर्नाड यांनीच तोडले होते. सोबतच “टिपू सुलतान हिंदू असता, तर त्यांनाही छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मान मिळाला असता,” असे वक्तव्य करत गिरीश कर्नाडांनीच टिपूची तुलना शिवरायांशी केली होती. लाखो हिंदू स्त्री-पुरुषांवर, लहान मुलांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्या टिपू सुलतानाप्रतीचे गिरीश कर्नाडांचे प्रेमच यातून जगजाहीर होते. आता त्यांनी आपल्या प्रेमाचा परीघ वाढवत त्यात नक्षल्यांनाही सहभागी करून घेतले. टिपू हा भूतकाळात इथल्या समाजाविरुद्ध क्रूरपणे वागला, तर नक्षली वर्तमानात देशातल्याच लोकांविरोधात शस्त्र घेऊन लढत आहेत आणि गिरीश कर्नाड या दोघांच्याही समर्थनाची भूमिका घेतात. गिरीश कर्नाडांनी ‘हयवदन’, ‘नागमंडलम’सारख्या हिंदू संस्कृतीचा भाग असलेल्या कलाकृतींतून आपल्या सकस अभिनयाचा आविष्कार केला. पण सामाजिक वा अन्य प्रश्नांची वेळ येते, तेव्हा गिरीश कर्नाडांचे डावेपण ठसठशीतपणे समोर येते. गिरीश कर्नाडांचा हा दुटप्पीपणा नव्हे काय? अशावेळी कलाक्षेत्रातल्या गुणवत्तेआड लपून गिरीश कर्नाडांनी आपल्यावर कोणी टीका-टिप्पणी वा कारवाई न करण्याची अपेक्षा बाळगू नये. उलट स्वतःच्या कृत्यामुळे समोर येणाऱ्या गोष्टींचा सामना करावा आणि हीच बाब त्यांच्या समर्थकांनीही लक्षात ठेवावी

No comments:

Post a Comment