Total Pageviews

Thursday 30 March 2017

काश्मीरच्या बुडगाम जिल्ह्यातील चांदुरा येथे झालेल्या चकमकीत एक जिहादी सुरक्षा दलाच्या सैनिकांनी ठार मारला; पण त्याच्यासाठी झालेल्या चकमकीत आणखी तीन काश्मिरी नागरिक मारले गेले आहेत. तर पन्नासहून अधिक सैनिक जखमी झाले आहेतश्रीलंकेचे अनुकरण हवे. -


By pudhari | Publish Date: Mar 29 2017 7:19PM | Updated Date: Mar 29 2017 7:19PM काश्मीरच्या बुडगाम जिल्ह्यातील चांदुरा येथे झालेल्या चकमकीत एक जिहादी सुरक्षा दलाच्या सैनिकांनी ठार मारला; पण त्याच्यासाठी झालेल्या चकमकीत आणखी तीन काश्मिरी नागरिक मारले गेले आहेत. तर पन्नासहून अधिक सैनिक जखमी झाले आहेत. हे नागरिक अर्थातच चुकीच्या गोळीबारात सापडून मेलेले नाहीत. कारण तेही जिहादींच्या टोळीचाच भाग असल्याने मारले गेले. ही आता काश्मिरात नित्याची बाब बनू लागली आहे. कुठेही जिहादी पाकप्रणीत घुसखोर हिंसा करणार आणि त्याचा सुगावा लागताच तिकडे पोहोचलेल्या सुरक्षा दलांना अडवण्यासाठी स्थानिक दगडफेक्यांची झुंबडही जमा होणार. म्हणजे जिहादींना सुरक्षाकवच देण्याची जबाबदारी आता अशा दगडफेक्यांनी उचलली आहे. किंबहुना त्यामुळेच भारताचे लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी काही दिवसांपूर्वी अशा दगडफेक्यांनाही दहशतवादी समजून कारवाई करावी लागेल, असा इशारा दिला होता. त्याचीच अंमलबजावणी या चकमकीतून सुरू झाली असे म्हणावे लागेल. कारण हा जिहादी अतिशय अभेद्य अशा इमारतीमध्ये लपला होता आणि त्याला चारही बाजूनी घेरलेले असताना, अकस्मात तिथे गर्दी जमू लागली. त्या गर्दीने सुरक्षा सैनिकांवरच दगडफेक सुरू केली. या कृतीचा साधासरळ अर्थ जिहादीला संरक्षण देणे आणि पोलिसी कार्यात व्यत्यय आणणे इतकाच होता. व्यत्यय आणून अशा दगडफेक्यांना काय मिळणार होते? त्यांना काहीही मिळणार नसले, तरी जिहादीला संरक्षण मात्र मिळणार होते. किंबहुना चकमकीत तो जिहादी मारला जाऊ नये, म्हणूनच हे असे गर्दीने दगडफेक करणारे शहीद व्हायला पुढे सरसावलेले होते. याचा अर्थ अशा दगडफेक्यांचाही जिहादी हेतू लपून राहिलेला नाही. हे तरुण निराश व बहकलेले आहेत, अशा युक्तिवादात काडीमात्र तथ्य नाही. हे सर्व नाटक असते. ही अर्थातच पुढली पायरी आहे. यापूर्वी चकमकीत मारल्या गेलेल्या कुणाही जिहादी दहशतवाद्याच्या अंत्ययात्रेत गर्दी केली जायची. पाकिस्तानवादी घोषणा होत आणि पाकचे झेंडेही फडकावले जात होते. आजकाल त्यासोबत ‘इसिस’च्या घोषणा व ध्वज दिसू लागले आहेत. मात्र अशाच चकमकी वा हिंसाचारात मारल्या गेलेल्या कुणाही पोलिसाच्या अंत्ययात्रेला कोणीही फिरकत नव्हता. मग सवाल असा निर्माण होतो, की सैनिकी असो वा पोलिसी कारवाईत असो, मरणारा जवान कोणाचे संरक्षण करीत असतो? कशासाठी आपले बलिदान देण्यापर्यंत लढतो? आपल्याच जीवावर उठलेल्यांना संरक्षण द्यायला पुढे सरसावण्याला बलिदान म्हणतात की आत्महत्या? सरकारने अशा स्थितीत तिथे सैनिक वा पोलिसांना कशाला तैनात केलेले आहे? पाकवादी फुटीर दगडफेके वा त्यांच्या देशद्रोही मानसिकतेच्या शिकारीवृत्तीला बळी जाण्यासाठी अशा सुरक्षा दलांची तिथे तैनाती करण्यात आली आहे काय? जसे अशा घटनांमध्ये काश्मिरी मुस्लिम व पोलिसही मारले जात आहेत, तसेच देशाच्या कानाकोपर्याितून सैन्यात भरती झालेले जवान मारले जात आहेत. त्यात पाकिस्तानच्या हल्ल्यात मारले जाणारे आहेत, तसेच भारतीय काश्मिरातल्या दगडफेक्या टोळ्यांकडून मारले जाणारे आहेत. अशा दगडफेक्या वा फुटीरवादी टोळ्या आपली पाकवादी मानसिकता लपवतही नाहीत. त्यांना चुचकारत बसण्याने स्थिती इथवर बिघडलेली आहे. त्याचे मूळ कारण असे दगडफेके वा फुटीरवादी हुर्रियतवालेही नाहीत. तर त्यांना चुचकारणारे मानवाधिकारी व शांततावादी खरे गुन्हेगार आहेत. कारण त्यांनीच अशा गुन्हेगार मारेकर्यांहना पाठीशी घालत भारतीय सैनिकांना बळीचा बकरा बनवून ठेवलेले आहे. बेकारी वा अन्यायासाठी रस्त्यावर येऊन निदर्शने करणार्यांूची जाळपोळ नवी नाही. ती भारतात व जगात कुठेही होत असते; पण इथे जिहादी दहशतवाद्याचा बंदोबस्त करताना पोलिसांवर हल्ले करण्याचा हेतू साफ आहे. तिथे जिहादला वा पाकिस्तानी हिंसाचाराला प्रोत्साहन देण्यासाठीच दगडफेक केली जात असते. जिहादीला संरक्षण देण्यासाठी पुढे येणार्याद टोळ्या निराश हताश तरुणांच्या नाहीत वा न्यायासाठीचा संघर्ष असू शकत नाही. समोरून जिहादी गोळ्या झाडणार आणि मागून असे दगडफेके हल्ले करणार; ही संयुक्त कारवाई असते. म्हणूनच लपलेला जिहादी व दगडफेक करणारे एकाच कारवाईचे भागीदार असतात. साहजिकच जितक्या नेमबाजीने जिहादीवर गोळीबार करणे आवश्यक आहे, तितकेच टिच्चून दगडफेक करणार्यांीना गोळ्या घालून टिपणे अगत्याचे आहे. फक्त महिनाभर अशा रितीने लष्कराला दगडफेके व तत्सम फुटीरवादी लोकांना धडा शिकवला, तरी काश्मिरात कायमची शांतता निर्माण होऊ शकते. श्रीलंकेने त्याचा पाठच घालून दिला आहे. एका कठोर कारवाईत तामिळी वाघ नावाचे भूत कायमचे श्रीलंकेच्या मानगुटीवरून उतरून गेलेले आहे. जे तीस वर्षांत मानवाधिकारी नाटकाने साधले नव्हते, ते दोन महिन्यांच्या राक्षसी कारवाईने निकालात निघाले. गेल्या सहा वर्षांत श्रीलंकेत कुठेही घातपात झाले नाहीत. अन्यथा मानवाधिकारी खाक्यातून आणखी दोन-चार हजार लोक हकनाक मारले गेले असते. काश्मिरी जनता व एकूणच तिथली प्रशासन व्यवस्था श्रीलंकन पद्धतीनेच प्रभावशाली होऊ शकते. भारतीय लष्करप्रमुखांना त्याचा अवलंब करू देण्याचा धाडसी निर्णय भारत सरकार घेऊ शकले, तर सहा महिन्यात हा विषय कायमचा निकालात निघेल. जो कोणी जिहादचा समर्थक वा पाठीराखा आहे, त्यालाही दहशतवादी ठरवून थेट ठार मारण्यातूनच अशा आजारावर जालीम व परिणामकारक शस्त्रक्रिया होऊ शकेल. अन्यथा हेच नाटक अधिक भयंकर शोकांतिकेच्या दिशेने सरकत जाणार आहे. दगडफेक करण्यासाठी मिळतात दिवसाला ५ हजार रुपये, स्टिंग ऑपरेशनद्वारे खुलासा आंदोलन कुठे करायचे याबाबतच्या सूचना पाकिस्तानमधून येतात श्रीनगर | Updated: March 30 जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कर आणि पोलिसांवर जी दगडफेक होते त्यासाठी आंदोलकांना पैसे दिले जातात असा खुलासा एका स्टिंग ऑपरेशनद्वारे केला गेला आहे. दगडफेक करणाऱ्या आंदोलकांनी ही बाब कॅमेऱ्यासमोर सांगितली आहे. एका आंदोलकाने सांगितले की तो २००८ पासून दगडफेक करण्याचे काम करत आहे. त्याला एका दिवसाला ५०० रुपये ते ५,००० रुपये मिळतात असे देखील त्याने सांगितले. बुरहान वानीच्या मृत्यूनंतरही आपण दगडफेक केल्याचे त्याने सांगितले आहे. Loan Waiver Farmers In Maharashtra Crop Insurance Schemes Banks आज तकने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये त्यांनी ही बाब सांगितली आहे. जाकिर हमद भट या दगडफेक करणाऱ्या आंदोलकाने सांगितले की आम्हाला या कामासाठी पैसे, कपडे आणि बूटही दिले जातात. हे पैसे कुणाकडून येतात या बाबत आम्हाला फारशी माहिती नाही असे त्याने म्हटले. मला असिफ नावाचा एक मित्र पैसे आणून देत असे. मी फेकलेल्या दगडामुळे अनेक पोलीस अधिकारी आणि जवान जखमी झाल्याचे फारुक या आंदोलकाने सांगितले. जर पोलिसांनी आम्हाला पकडले तर आम्ही पैशाबाबत कधीही सांगत नाहीत असे फारुकने म्हटले. या दगडफेक करणाऱ्यांवर प्रशासनाची करडी नजर असते. त्यामुळे दगडफेक झाल्यानंतर आम्ही घरी काही दिवसांसाठी जात नाहीत असे त्यांनी सांगितले. दगडफेकीबाबतच्या सूचना एका व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे दिल्या जातात अशी माहिती पोलिसांनी दिली. हा व्हॉट्सअॅप ग्रुप पाकिस्तानमधून चालवला जातो असे त्यांनी म्हटले. व्हॉट्सअॅप द्वारे पोलीस आणि लष्कर कुठे आहे याबाबत सांगितले जाते. त्यांची स्थिती काय आहे याबाबतची माहिती दगडफेक करणाऱ्या आंदोलकांना आधीच मिळते असे ते म्हणाले. ज्यावेळी संघर्षाला सुरुवात होते. त्यावेळी कोणत्या ठिकाणी जाऊन दगडफेक करायची किती वेळ करायची याचा सूचना व्हॉट्सअॅपवर दिल्या जातात असे पोलिसांनी सांगितले. लष्कर आणि आंदोलकांमध्ये झालेल्या संघर्षात अनेक जण जखमी झाले. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची पोलीसांना लक्ष्य करण्याची नवी रणनीती तुमची पोलिसातील नोकरी सोडा अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा, असा संदेशही प्रत्येकवेळी या दहशवाद्यांकडून March 30, 2017 10:52 AM militants target homes of police officers in Valley : दहशतवाद्यांनी मंगळवारी संध्याकाळी दक्षिण काश्मीरमधील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या घरात घुसखोरी केली होती. यावेळी त्यांनी घरातील सामानाची नासधूस केली. तसेच तेथून पळ काढताना हवेत गोळ्यांच्या फैरीही झाडल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून एक नवा पॅटर्न वापरला जात असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील तीन आठवड्यांमध्ये दहशतवाद्यांनी दक्षिण आणि मध्य काश्मीरमधील पाच पोलीस अधिकाऱ्यांच्या घरांना लक्ष्य केलेय. यावेळी दहशतवाद्यांकडून पोलीस अधिकाऱ्यांच्या घरात घुसून त्यांच्या कुटुंबियांना धमकाविण्याचे आणि घरातील वस्तुंची तोडफोड करण्यात आली होती. तसेच तुमची पोलिसातील नोकरी सोडा अन्यथा परिणाम भोगायला तयार राहा, असा संदेशही प्रत्येकवेळी या दहशवाद्यांकडून देण्यात आला आहे. अशा घटनांमुळे पोलीस अधिकाऱ्यांमधील अस्वस्थता वाढली आहे. विशेषत: दक्षिण काश्मीरमध्ये अशा घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे येथील अधिकारी आपल्या कुटुंबियांना सावध आणि काळजी घेण्यास बजावत आहेत. आमच्यासाठी हा प्रकार नवीन असून ही चिंतेची बाब आहे. मी माझ्या पालकांना रात्र झाल्यानंतर दार उघडू नका, असे सांगून ठेवले आहे. तसेच कोणताही समस्या उद्भवल्यास मी त्यांना महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक देऊन ठेवले आहेत, असे उत्तर काश्मीरमध्ये तैनात असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दहशतवाद्यांनी मंगळवारी संध्याकाळी दक्षिण काश्मीरमधील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या घरात घुसखोरी केली होती. यावेळी त्यांनी घरातील सामानाची नासधूस केली. तसेच तेथून पळ काढताना हवेत गोळ्यांच्या फैरीही झाडल्या होत्या. अतिरिक्त अधिक्षक पदावर असणाऱ्या या अधिकाऱ्याची नुकतीच उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात बदली झाली होती. यापूर्वी शोपियान जिल्ह्यातील रियाझ अहमद आणि दिलबर अहमद यांच्या घरांनाही दहशतवाद्यांकडून अशाचप्रकारे लक्ष्य करण्यात आले होते. गेल्यावर्षी बुरहान वानीच्या खात्म्यानंतर काश्मीर खोऱ्यात उसळलेल्या हिंसाचारावेळी आंदोलकांना स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांविरोधात फलक झळकविण्यात आले होते. या फलकांवर आंदोलकांविरुद्ध कारवाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना इशारा देण्यात आला होता. याशिवाय, हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी झाकीर रशिद भट यानेदेखील व्हिडिओद्वारे पोलीस अधिकाऱ्यांना धमकी दिली होती. दहशतवाद्यांच्या नातेवाईकांना त्रास दिला तर तुमच्यावर हल्ला करू, असे झाकीरने व्हिडिओत म्हटले होते. तुम्ही आमच्या कुटुंबियांना या सगळ्यात ओढून मोठी चूक करत आहात. आमच्या कुटुंबियांना किंचितही धक्का लावला तर तुमच्या कुटुंबालाही आम्ही सोडणार नाही. तुमचे कुटुंब जम्मूत असल्यामुळे ते सुरक्षित आहे, असं तुम्हाला वाटतं. मात्र, ते कन्याकुमारीत राहत असतील तरी त्याठिकाणी जाऊन त्यांना मारण्याची ताकद आमच्यात आहे, असे भट यांनी म्हट

No comments:

Post a Comment