Total Pageviews

Sunday 26 March 2017

माणुसकी By pudhariजीव वाचविणे हे किती मोलाचे कार्य असते हे भारतीय रेल्वेने दाखवून दिले आहे. रेल्वे रुळ उखडविणे, प्लेटस काढून टाकणे अशा निर्घृण आणि क्रूर कर्म करणार्‍यांना मानवतेचा संदेश यातून मिळाला तर किती बरे होईल?


| Publish Date: Mar 23 2017 12:00AM | Updated Date: Mar 23 2017 12:00AM जिथं प्रचंड गर्दी असते, ज्याला हिंदीमध्ये भीडभाडवाला इलाका म्हटले जाते, तिथं कुठल्याही गोष्टीची दाद ना फिर्याद अशी आपली एक समजूत असते; पण या समजुतीला भारतीय रेल्वेने छेद दिला आहे. नुसता एक मोबाईल कॉल किंवा एसएमएस केला तरी प्रवाशांसाठी जान हथेली पर ले आनेवाली भारतीय रेल्वेची सेवा पाहिल्यानंतर आपुलकीनं वागणारी माणसं म्हणजे भारतीय रेल्वे अशी नवी व्याख्या करावी लागेल. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रवाशांना मदत पोहोचविण्याच्या बाबतीत भारतीय रेल्वेने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. झालं असं की, एक जोडपे आपल्या पाच महिन्याच्या कार्तिकी नावाच्या मुलीसह गुजरातहून तिरुनेलवेलीला ‘हापा तिरुनेलवेली एक्स्प्रेस’ने चालले होते. वाटेत कार्तिकीला भूक लागली. ती रडायला लागली. आईने बॅगेतून दुधाची बाटली काढली. उन्हामुळे दूध नासले होते. ट्रेनच्या कँटीनमध्येही दूध नव्हते. भुकेने व्याकूळ कार्तिकी रडतच होती. ते बघून डब्यातील सहप्रवासी नेहा बापट यांनी सोशल मीडियावर स्टेटस पोस्ट केला आणि मित्रमैत्रिणींकडे मदतीचे आवाहन केले. त्यामुळे फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्अपच्या माध्यमातून मेसेज अनेक लोकांपर्यंत गेला. रेल्वेनेही लगेच प्रतिसाद दिला. ट्रेन मधेच एका स्टेशनवर थांबविण्यात आली आणि रेल्वेचा कर्मचारी दूध घेऊन तेथे हजर झाला. हे बघितल्यानंतर आणि ऐकल्यानंतर आपण काय म्हणणार? आपुलकीनं वागणारी माणसं असंच ना? रेल्वे प्रवासात स्त्रिया, लहान मुले, आजारी माणसं, ज्येष्ठ नागरिक यांच्यावर कधी कोणती वेळ येईल सांगता येत नसते. अशा वेळी मोबाईल आणि संवेदनशील सहप्रवासी यांचा सहयोग महत्त्वाचा! जीव वाचविणे हे किती मोलाचे कार्य असते हे भारतीय रेल्वेने दाखवून दिले आहे. रेल्वे रुळ उखडविणे, प्लेटस काढून टाकणे अशा निर्घृण आणि क्रूर कर्म करणार्‍यांना मानवतेचा संदेश यातून मिळाला तर किती बरे होईल? आपल्याला जरी देवदूत बनता आले नाही तरी चालेल, परंतु मनुष्य बनता आले तर तो मोठा पुरुषार्थ होईल. म्हणूनच एक ठिकाणी म्हटलंय, फरिश्ते से बेहतर है इन्सान बनना! इंडियन रेल्वे इन्सान बनाना सिखाती है!.

No comments:

Post a Comment