Total Pageviews

Saturday, 8 October 2016

सुरक्षित' म्हणायला लाज कशी वाटत नाही?


असुरक्षित' म्हणायला लाज कशी वाटत नाही? - प्रकाश पाटील एक म्हण आहे, "" तोंड बोलते अन्‌ अंग मार खाते‘. आपण माणूस आहोत त्यामुळे इतर सर्व प्राण्यांप्रमाणे आपल्यालाही तोंड दिले आहे.तोंड दिले आहे. जीभ दिली आहे. म्हणून काहीही बोलायचे हे काही लोकांना सवयच असते. आपण बोललो तर बोललो. घाबरायचं काय कारण आहे. तोंड बोलले तर मुकामार नव्हे तर शब्दाचा मार मिळत असेल तर तो खाण्याचा आणि सहन करण्याची शक्तीही असायला हवी. एकतर तोंड वर करून बोलायचे. मग घाबरायचे का ? देशासाठी लढणारे भारतीय जवान पाकिस्तानला घाबरतात का ? ते जर घाबरले असते तर ते लढलेच नसते. मग त्यांनी आपल्या आईवडिलांचा, मुलाबाळांचा विचार करून रणांगणांतून पळ काढला असता. लढायला निघालेल्या माणसाने लढायचंच असत घाबरायच नसतं. मग परिणाम काहीही होवोत. कॉंग्रेसचे महान नेते, थोर पत्रकार, थोर समाजसेवक हभप मा. श्री. संजय निरूपम यांनी भारताने केलेल्या सर्जिकल ऍटक विषयी जे प्रबोधन केले आहे. त्याविषयी प्रत्येक भारतीयाचा उर भरून आला असेल. असा त्यांचा समज झाला असावा. बोलण्याआधी विचार करायचा नाही आणि बोलण्यानंतर पश्चा्ताप करायचा. या देशातील कोणीही मग तो कितीही मोठा असो किंवा पक्षाचा नेता असो त्याने देशाविषयी भाष्य करताना जीभ सैल सोडता कामा नये. भारतीय जवानांच्या कारवाईवर जर संशय घेत असाल तर तुमच्यावर देशभक्त नागरिक तुटून पडणारच. गेल्या बुधवारी ई-सकाळवर संजय निरुपम यांच्या "माथी हाणा काठी‘ हा लेख लिहिला होता. त्याला "ई-सकाळ‘च्या वाचकांनी प्रचंड प्रतिसाद देत निरुपम यांच्यावर टीकेची झोड उठविली आहे. तसेच सोशल मिडियानेही त्यांचा समाजार घेतल्याने ते अस्वस्थ आहे. आता निरूपम यांच्या सौभाग्यवती गीता यांना म्हणे असुरक्षित वाटत आहे. निरूपम हे सार्वजनिक जीवनात आहेत त्यामुळे असे प्रसंग कधी तरी वाट्याला येणारच. यापूर्वी अभिनेता आमिर खानच्या पत्नीलाही म्हणे भारताता असुरक्षित वाटत होते. देश सोडावा वाटत होता. काय झाले इतके असुरक्षित वाटायला. या देशात काय पाकिस्तानप्रमाणे हुकुमशाही आहे की काय? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजवटीत म्हणे सर्वांनाच असुरक्षित वाटू लागले आहे. तुम्हाला येथे सर्वच क्षेत्रात स्वातंत्र्य असताना असला फालतू किडे डोक्याात वळवळतातच कसे ? तुम्हाला बंदुकीचा धाक दाखविला जातो आहे की काय ? सर्जिकल ऍटकविषयी निरूपम बोलले म्हणून तुम्हाला उचलून तुरूंगात टाकले की काय ? तुम्हाला लोकशाहीत बोलण्याचा, व्यक्त होण्याचा अधिकारच आहे. बोला, रोज पाहिजे ते बोला. पण संतप्त लोकांच्या शिव्याशापही घ्यायला तयार राहा. शेवटी लोकांनाही व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे की नाही ? या देशात असुरक्षित वाटते म्हणून तुम्ही पाकिस्तानात जा असे म्हणण्याचा कोणाला अधिकार नाही. मात्र पाक सोडून तुम्ही इतर देशाचाही विचार करू शकता. किरणराव ते गीता निरूपम यांना देशाविषयी काय प्रॉब्लेम आहे हेच कळत नाही. वास्तविक निरूपम पती-पत्नी प्रथम पत्रकार आहेत. त्यांना हे भान तर नक्कीच असेल ना की आपण जे काही बोलतो त्याची प्रतिक्रिया उमटणार आहे. की हे माहित असूनही मुद्दाम बोलला असाल तर घाबरता कसले. देश सोडायला कोणी अडविले आहे तुम्हाला ? अजबच आहे हे सर्व. निरूपम महाशयांनी अभिनेता अक्षयकुमार काय म्हणतो हे तरी लक्षात घ्यावे. "जवान आहेत, म्हणून आपण आहोत.‘‘ हे स्पष्टपणे तो बोलतो. देशासाठी बोलतो, जवानासाठी बोलतो. त्याचे फादरही लष्करी अधिकारी होते. त्यामुळे त्याला जवानांविषयी जो कळवळा आहे. त्यांच्याविषयी आत्मीयता आहे.जवानांसाठी तो धडपडतो. अक्षकुमार जे बोलतो त्याच्याविषयी अंगावर रोमांच उभे राहतात आणि तुम्ही. आपल्याच जवानांची अब्रु काढता. त्यांचे खच्चीकरण करता हा ही देशद्रोह नव्हे का आपले जवान देशाचे संरक्षण करण्यासाठी स्वत:च्या प्राणाची आहुती देत असताना संजय निरुपम यांच्यासारख्या नाठाळांना दळभद्री विचार सूचतातच कसे. कॉंग्रेसचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी "मेरा भारत महान‘ ही घोषणा दिली होती हे निरूपम विसरले. आपण देश म्हणून मोदींच्या मागे उभे रायचे की आपल्याच लष्करावर टीका करायची हे यांना का कळत नाही. यांची डोकी फिरली आहेत की काय? आपल्याकडे वाचाळ नेत्यांची वाणवा नाही. मनात येईल ते काही बोलायचं म्हणजे बोलायचं आणि लोकाचं लक्ष वेधून घ्यायचं. आपण इतरांपेक्षा कसे शहाणे आहोत हे दाखवायचं. मुंबईसह देशभरात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आतापर्यंत बक्कळ दहशतवादी हल्ले करून आपल्या शेकडो निरपराध बांधवांचे आणि जवानांचे जीव घेतले आहेत. काश्मीकर तर रोज जळतंय. रोज आपले जवान मरतायत. हे सगळं भयावह चित्र पाहून आपले लष्कर पेटून उठतंय. पण काय करणार? त्यांना आदेश पाहिजे असतो. उरीतील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी "पीओके‘त घुसून हल्ला केल्याने प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलली. सोनिया गांधींसह सर्वच पक्षांनी मोदींचे अभिनंदन करून सरकारला पाठिंबा दिला. आपलं राजकारण काहीही असेल पण जेंव्हा भारताचा विचार पुढे येतो तेंव्हा आपण सगळे एकच असलो पाहिजे. हाच विचार पुन्हा एकदा पुढे आला. पण, मुंबईतील कॉंग्रेसचा एक वाचाळ नेता संजय निरुपम यांनी शेवटी अकलेचे... जे तोडायचे ते तोडलेच. ते म्हणे, ""पीओके‘त दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केल्याचे केंद्राने पुरावे द्यावेत. ही कारवाईच बनावट आहे!‘ बघा ना, आपले जवान देशाचे संरक्षण करण्यासाठी स्वत:च्या प्राणाची आहुती देत असताना असले दळभद्री विचार या नाठाळांना सूचतातच कसे. कॉंग्रेसचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी "मेरा भारत महान‘ ही घोषणा दिली होती. आपण देश म्हणून मोदींच्या मागे उभे राहायचे की आपल्याच लष्करावर टीका करायची हे यांना का कळत नाही. यांची डोकी फिरली आहेत की काय? प्रत्येक गोष्टीत किती राजकारण करायचे. यालाच लोक कंटाळतात आणि पुढाऱ्यांना शिव्या देतात. जसे निरुपम, तसेच केजरीवाल, तसेच ओम पुरी. हे सगळेच "व्हिलन‘ची भूमिका व्यवस्थित पार पाडत आहेत. या व्हिलनना लोळवण्यास जनता समर्थ आहे. देशाच्या मुद्यावर सर्वच देशभक्त (मोदीभक्त नव्हे) त्यांच्या पाठीशी आहेत हे ठणकावून सांगण्याची गरज आहे. संत तुकाराम महाराजांनी म्हटले होते ना "नाठाळाच्या माथी, हाणा काठी‘ लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयींनी पाकला धडा शिकविला होता. आणि आता मोदीही धडा शिकवत आहेत. याचा आपणास अभिमान वाटला पाहिजे ना? तुम्ही तर शत्रू राष्ट्राचे हिरो होण्यात धन्यता कसली मानता? उगाच आपलं मनात येईल ते बोलता. निरुपम हे मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष. मुंबईत कॉंग्रेसला यश कसं मिळेल ते बघा की राव. इथे पक्षाची बोंब आणि चर्चा करायची देशाची. बरं झालं भाजपपेक्षा कॉंग्रेसवाल्यांनी या नाठाळाला खडसावलं ते. खरं तर लष्कर, लष्कराची कारवाई याविषयी तज्ज्ञ लोक बोलतील ना? आपण काही या विषयातील तज्ज्ञ नाही. पण भारत आणि पाकमध्ये काय चाललंय हे लोकांना कळतं ना. आपल्या महाराष्ट्रातील जे जवान शहीद झाले आहेत त्यांच्या गावात एकदा तरी जाऊन या निरुपम. त्या गावातील लोकांच्या पाकिस्तानविषयीच्या भावना कळतील तुम्हाला. सर्जिकल अटॅकविषयी असे वक्तव्य केल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी तुम्ही त्यांच्याच विजयाला हातभार लावत आहात. तुमच्या वक्तव्याचा कॉंग्रेसलाच अधिक फटका बसणार आहे, हे सांगण्याची गरज नाही. देशाने तुम्हाला सगळे दिले अशा देशाविरुद्ध गद्दारी करणारे लोक म्हणजे निरुपम ,केजरीवाल ,आशिष भोसले कारण ज्या सेनिकांनी देशासाठी रक्त सांडले त्यान्चायकडे हे पुरावे मागत आहेत आणि राहिली गोस्ट सनातन आणि पानसरे हैबद्दल अरे ती आपली अंतर्गत बाब आहे तिथे देशाचा सबंध का लावतो ?कृपा करून वडायचे तेल वांग्यावर घालू नका आणि देशापुढे काहीही नाही हे आम्ही मरेपर्यंत सांगू भले हि तुम्हाला देश प्रिय नसला तरी कारण तुंम्ही देशद्रोही आहात. पुढच्या वेळी जर कुठल्याही प्रकारचे सर्जिकल स्ट्राईक करायचे असेल तर सरकारने त्याची माहिती प्रथम संजय निरुपम आणि अरविंद केजरीवालांना द्यावी आणि संजय निरुपम आणि अरविंद केजरीवाल यांनी भारतीय सैनिक सर्जिकल स्ट्राईक करते वेळी त्यांच्या बरोबर राहावे व विडिओ कॅमेरा आपल्या जवळ ठेवावे आणि त्या सर्जिकल स्ट्राईकची विडिओ शूटिंग घ्यावी व जनतेला व सर्व राजकीय पक्षांना द्यावी. आपल्या देशावर, लष्करावर आणि केंद्र सरकारवर अविश्वास दाखवून पाकिस्तानची तळी उचलणाऱ्या आणि पाकिस्तानची री ओढणाऱ्या तसेच पाकिस्तानसाठी "हिरो" ठरलेल्या या त्रिमुर्तीचा जेवढा धिक्कार करावा तेवढा थोडाच आहे. आमच्या जगद्गुरु संत श्री. तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी अशा लोकांबद्दल काय करावे हे सांगून ठेवले आहे. तुका म्हणें ऐशा नरां, मोजूनी माराव्या पैजारां !!

No comments:

Post a comment