Total Pageviews

Saturday, 22 October 2016

जगातील सर्वात कठीण समजल्या जाणा-या कॅब्रियन पट्रोल सरावात भारतीय सैन्याचे छाप पाडली आहे भारतीय सैन्याचा विजयी डंका, सर्वात कठीण सरावात पटकावले सुवर्ण पदक भारतीय सैन्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे


. नवी दिल्ली | October 22, 2016 5 जगातील सर्वात कठीण समजल्या जाणा-या कॅब्रियन पट्रोल सरावात भारतीय सैन्याचे छाप पाडली आहे. भारतीय सैन्याच्या गोरखा रायफल्सच्या जवानांनी या सराव शिबीरात सुवर्ण पदक पटकावले आहेत. वेल्समध्ये पार पडलेल्या या सराव शिबीरात विविध देशांमधील सैन्याचे पथक सामील झाले होते. त्यामुळे भारतीय सैन्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. ब्रिटीश आर्मी ऑफ वेल्सने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत गोरखा बटालियनच्या आठ जवानांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला आहे. भारताच्या गोरखा रायफल्सच्या दुस-या बटालियनमधील ८ जवानांचे अभिनंदन, त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली असे या ट्विटवमध्ये म्हटले आहे. या कार्यक्रमात गोरखा बटालियनच्या जवानांना कुकरी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. कॅब्रियन पट्रोल सराव मोहीम वेल्समधील कॅब्रियन डोंगररागात पार पडते. या सराव मोहीमेत जगभरातील सैन्याचे पथक सामील होतात. मोहीमेमध्ये जवानांना ५५ किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. हा मार्ग अत्यंत खडतर असतो आणि ४८ तासांमध्ये त्यांनी हे अंतर पूर्ण करणे गरजेचे असते. यामध्ये जवानांना आव्हानांचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे संपूर्ण स्पर्धेदरम्यान त्यांना सोबत दिलेले सामान आणि किट बाळगावे लागते. यातील काही सामान हरवल्यास संघाचे गूण वजा होत जातात. या सराव मोहीमेत जवानांची गुणवत्ता ही गुणांच्या आधारे ठरत नाही. तर टक्केवारीमध्ये मोहीमेतील सुवर्ण पदक विजेता ठरवला जातो. सुवर्ण पदक विजेत्या संघाला ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गूण, रौप्य पदक पटकावणा-या संघाला ६४ ते ७५ टक्के आणि कांस्य पदकासाठी ५५ ते ६४ टक्के मिळवणे गरजेचे असते.

No comments:

Post a comment