Total Pageviews

Wednesday 5 October 2016

बंडलबाजीशी स्पर्धा का करता!


बंडलबाजीशी स्पर्धा का करता! Wednesday, October 05th, 2016 बंडलबाज पाकिस्तानने ‘सर्जिकल हल्ल्या’चे सत्य नाकारले हे त्यांच्या नौटंकी स्वभावास धरूनच झाले. पण अशा सर्जिकल हल्ल्याबाबत आपल्याच देशातील पुढार्यांानी शंका व्यक्त कराव्यात याचे आम्हाला दु:ख होत आहे. पाकिस्तानने बंडलबाजीत अनेक पदके जिंकली आहेत. त्यांच्या बंडलबाजीशी आपल्याकडील लोकांनी स्पर्धा करू नये. काही गोष्टी गोपनीयच राहाव्यात. राष्ट्रीय सुरक्षेचे बिंग फुटले तर गडबड होईल! सर्जिकल ऑपरेशन बंडलबाजीशी स्पर्धा का करता! मनमोहन सिंग यांच्या कारकीर्दीतही सर्जिकल हल्ले झालेच होते, पण त्याचा राजकीय गवगवा कधीच केला नाही, असे आता अरुण शौरी यांनी सांगितले आहे. चिदंबरम यांनीसुद्धा अशा प्रकारचे टोकदार विधान आधीच केले आहे व त्यापाठोपाठ सर्जिकल हल्ल्यास खरे-खोटे ठरविण्याचा विडा उचलून अनेक दीडशहाणे पोपटपंची करू लागले आहेत. हा सर्व प्रकार म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेशी खेळ आहे. आपल्या जवानांचे मनोबल खच्ची करण्याचा डाव आहे. ज्यांना प्रत्यक्ष बंदूक हाती घेऊन सीमेवर जाऊन लढता येत नाही अशा मंडळींनी संकटकाळात तोंड बंद ठेवावे हीसुद्धा देशसेवाच आहे. उरी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने सूड घ्यावा, अशी मागणी देशभरातूनच उठू लागली व सूड किंवा बदला घेतल्यावर जवानांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. मात्र पाकिस्तानने नेहमीप्रमाणेच जाहीर केले की, ‘हिंदुस्थानकडून अशा प्रकारचा कोणताही सर्जिकल हल्ला झाला नसून तसा हल्ला झाल्यास चोख उत्तर देऊ!’ पाकिस्तान हा एक नंबरचा बंडलबाज देश आहे. हिंदुस्थानातील दहशतवादी हल्ल्याशी आपला संबंध नसल्याची त्यांची बंडलबाजी नेहमीच सुरू असते. लादेन आमच्या देशात लपला नसल्याची थाप ते मारतच होते, पण अमेरिकेने पाकिस्तानात घुसून लादेनला मारल्यावर त्यांची बंडलबाजी उघडी पडली. दाऊद इब्राहिम कराची किंवा लाहोरमध्येच उंडारतो आहे, पण पाकिस्तानची बंडलबाजी अशी की, ‘छे, छे, कोण, कुठला दाऊद? आमच्या देशात या नावाची कुणी व्यक्तीच अस्तित्वात नाही!’ काय म्हणावे या बंडलबाजीस? त्या जावेद मियांदादने दाऊदच्या पोरीशी सोयरिक जमवून सत्य उघड करूनही पाकिस्तानने दाऊदबाबत आपली बंडलबाजी सुरूच ठेवली. त्यामुळे अशा बंडलबाज पाकिस्तानने ‘सर्जिकल हल्ल्या’चे सत्य नाकारले हे त्यांच्या नौटंकी स्वभावास धरूनच झाले. पण अशा सर्जिकल हल्ल्याबाबत आपल्याच देशातील पुढार्यांदनी शंका व्यक्त कराव्यात याचे आम्हाला दु:ख होत आहे. अरविंद केजरीवाल यांची जीभ मधल्या काळात डॉक्टरांनी कापल्याची बातमी वाचनात आली होती, पण आता ही कातरलेली जीभ पुन्हा टोकदार झालेली दिसते. केजरीवाल यांनीदेखील शंकेची पाल पंतप्रधानांवर फेकली आहे. पंतप्रधानांनी केलेल्या सर्जिकल कारवाईबाबत त्यांचे अभिनंदन, पण पाकिस्तानचा खोटारडेपणा उघडा करावा यासाठी सर्जिकल कारवाईचा एखादा व्हिडीओ अथवा छायाचित्रे लोकांसमोर आणावीत, अशी मागणी केजरीवाल यांनी करावी हे दुर्दैवच म्हणावे लागेल. बंडलबाज पाकिस्तानला एकप्रकारे बळकटी देणारेच हे विधान आहे. अमेरिकेच्या कमांडोजनी पाकिस्तानात घुसून लादेनला मारले तेव्हा त्या कारवाईची छायाचित्रे आणि व्हिडीओ चित्रण जगासमोर आणले होते हे खरेच. कारण ‘लादेनला खरेच मारले की नाही? जो मारला गेला तो खरोखरच लादेन की त्याचा डुप्लिकेट?’ अशा शंका काढायला लोकांनी कमी केले नसते. त्यामुळे कारवाईचे चित्रीकरण करून सैतानास खतम केल्याचे सत्य समोर आणले होते हे मान्य केले तरी आमच्या जवानांनी केलेली कारवाई तोलामोलाचीच आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर म्हणतात त्याप्रमाणे सर्जिकल कारवाईने पाकिस्तान बेहोश झाले की नाही ते सांगता येत नाही, पण पाकिस्तानला जबर धक्का बसला हे मान्य करायला हवे. सर्जिकल कारवाईचा राजकीय गाजावाजा जास्तच सुरू आहे, तसा तो होणारच. कारण ‘उरी’ घटनेनंतर देशात जो संताप आणि चीड निर्माण झाली त्याचे चटके सरकारला, खासकरून भाजपला बसू लागले. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काय होणार? असा प्रश्नर पडला. त्या सगळ्यांवर सर्जिकल कारवाईची गोळी लागू पडली आहे. निवडणुकांच्या राजकीय फायद्या-तोट्यासाठी युद्ध घडवू नयेत व पंतप्रधान तसे अजिबात करणार नाहीत, पण ज्यांच्या पायाखालची सतरंजी सरकली आहे त्यांनी सर्जिकल कारवाईवर शंका उपस्थित केल्या. केजरीवाल यांच्या वायफळ पोपटपंचीवर इलाज करता येईल. सर्जिकल कारवाईवर शंका उपस्थित करणार्यांेनाही आमचे तेच सांगणे आहे. पाकिस्तानने बंडलबाजीत अनेक पदके जिंकली आहेत. त्यांच्या बंडलबाजीशी आपल्याकडील लोकांनी स्पर्धा करू नये. काही गोष्टी गोपनीयच राहाव्यात. राष्ट्रीय सुरक्षेचे बिंग फुटले तर गडबड होईल! ‘सर्जिकल स्ट्राईक’ झालाच नाही असे म्हणत केंद्र सरकारला ‘टार्गेट’ करणाऱ्यांची बोलती बंद करेल अशी माहिती समोर आली असून थेट प्रत्यक्षदर्शींचीच माहिती पुरावे म्हणून पुढे आणण्यात आली आहे. पाकव्याप्त कश्मीरमधून हिंदुस्थानात शिरण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांचा हिंदुस्थानी सैन्याने खात्मा केल्यानंतर त्यांचे मृतदेह ‘लश्कर-ए-तोयबा’ने ट्रकमध्ये भरून अज्ञातस्थळी दफन केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिल्याचे, इंग्रजी वृत्तपत्र ‘इंडियन एक्स्प्रेस’ने म्हटले आहे. पाकव्याप्त कश्मीरमधून हिंदुस्थानात घुसखोरी करण्याच्या तयारीत असलेले दहशतवादी आणि नियंत्रण रेषेजवळ असलेली त्यांची सात तळं हिंदुस्थानच्या सैन्याने नेस्तनाबूत केली असून पुरावे नष्ट करण्यासाठी ‘लश्कर-ए-तोयबा’च्या दहशतवाद्यांनी ते मृतदेह अज्ञातस्थळी पुरल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी या वृत्तपत्राशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे ‘सर्जिकल स्ट्राईक’ झालाच नाही असा दावा करणाऱ्या पाकिस्तानला जोरदार चपराक बसली आहे. तसेच पाकिस्तान आणि अन्य देशातील हिंदुस्थानच्या टीकाकारांच्या सूरात सूर मिसळणाऱ्या हिंदुस्थानातील काही विरोधकांची बोबडीच वळली आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या प्रतिनिधीने पाकव्याप्त कश्मीरमधील पाच कुटुंबांशी हिंदुस्थानातील त्यांच्या नातलगांच्या माध्यमातून संपर्क साधला असता त्यांनी हिंदुस्थानच्या जवानांनी केलेला पराक्रमाचे वर्णन केले. ‘अल हवाई’ पुलाच्या पलीकडे ‘लश्कर-ए-तोयबा’चे एक ठिकाण आहे. त्याच्या जवळच असलेल्या कम्पाउंडमध्ये अनेक दहशतवादी कायम यायचे. २८ सप्टेंबरच्या रात्री तेथे स्फोटांचे आवाज झाले. काही काळ गोळीबार देखील सुरू असल्याचा आवाज ऐकायला येत होता. पण आम्ही कुणीच घराच्या बाहेर पडलो नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ सप्टेंबर रोजी पहाटे सहा दहशतवाद्यांचे मुडदे त्यांनी ट्रकमध्ये घातले आणि नीलम नदी पलीकडे चल्हाना येथील तोयबाच्या तळाच्या दिशेने नेताना दिसले’, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. तर खैराती बागमधील ‘लश्कर-ए-तोयबा’च्या दहशतवाद्यांची एक इमारतही नेस्तनाबूत झाल्याचे आणखी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. मात्र हिंदुस्थानने ३५-४० दहशतवादी मारल्याचे सांगितले असले तरी हा आकडा थोडा कमी असेल, असे येथील प्रत्यक्षदर्शी सांगत असल्याचे वृत्तात स्पष्ट करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment